Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वाढत्या वजनाला कंटाळलात, मस्त बारीक व्हायचंय? आहारात ४ प्रकारचे पदार्थ खाणं टाळा, व्हा स्लीम-फिट

वाढत्या वजनाला कंटाळलात, मस्त बारीक व्हायचंय? आहारात ४ प्रकारचे पदार्थ खाणं टाळा, व्हा स्लीम-फिट

5 fattening foods combinations you should avoid : आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आहाराबाबत योग्य ती काळजी घ्यायलाच हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2023 04:53 PM2023-03-05T16:53:43+5:302023-03-06T12:08:33+5:30

5 fattening foods combinations you should avoid : आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आहाराबाबत योग्य ती काळजी घ्यायलाच हवी

5 fattening foods combinations you should avoid : Want to be slim? Avoid 4 food combinations in diet; Look slim-fit | वाढत्या वजनाला कंटाळलात, मस्त बारीक व्हायचंय? आहारात ४ प्रकारचे पदार्थ खाणं टाळा, व्हा स्लीम-फिट

वाढत्या वजनाला कंटाळलात, मस्त बारीक व्हायचंय? आहारात ४ प्रकारचे पदार्थ खाणं टाळा, व्हा स्लीम-फिट

आपण छान बारीक असावं असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी आपला आहार-विहार चांगला असणं अतिशय गरजेचं असतं. जंक फूड, तेलकट-मसालेदार पदार्थ यांचा आहारात समावेश असेल तर चरबी वाढायला वेळ लागत नाही. मग वजन नियंत्रणात ठेवायचे असेल आणि कायम बारीक राहायचे असेल तर आहारात कोणते पदार्थ घ्यावेत आणि कोणते घेऊ नयेत याबाबत आपल्याला योग्य माहिती असणं अतिशय गरजेचं असतं. काही पदार्थ, विशेषत: काही पदार्थांचे कॉम्बिनेशन्स आपल्याला जाड करणारे असू शकतात. हे पदार्थ कोणते आणि ते आहारात का घेऊ नयेत याविषयी (5 fattening foods combinations you should avoid)...

१. भात आणि बटाटा 

भातामध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे भात जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढते. भात पटकन पचतो मात्र तरीही तो किती प्रमाणात खावा यावर आपले नियंत्रण असायला हवे. तसेच भात आणि बटाटा हे दोन्ही पदार्थ आपले वजन वाढवणारे आहेत. तसेच बटाट्यामध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणात असल्याने कॅलरीज वाढण्यासाठी बटाटा कारणीभूत असतो. त्यामुळे हे पदार्थ एकत्र खाणे शक्यतो टाळायला हवे. 

(Image : Google)
(Image : Google)

२. ब्रेड आणि फ्रोजन योगर्ट 

अनेकदा आपण घाईच्या वेळी झटपट काहीतरी हवे म्हणून ब्रेड आणि फ्रोजन योगर्ट खातो. ब्रेडमध्ये हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतो. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, तसेच तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर हे कॉम्बिनेशन उपयोगी नाही. त्यामुळे व्हाईट ब्रेडपेक्षा मल्टीग्रेन ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेड केव्हाही चांगला. तसेच फ्रोजन योगर्टमध्येही साखरेचे प्रमाण जास्त असल्याने वजन कमी करणाऱ्यांसाठी हे चुकीचे कॉम्बिनेशन आहे.

३. प्रोसेस्ड फूड आणि चहा-कॉफी

अनेकदा आपण दुपारी ४ किंवा ५ च्या वेळी चिप्स, बिस्कीटे किंवा नमकीन काहीतरी खातो आणि त्यासोबत चहा-कॉफी घेतो. यामुळे अॅसिडीटीसारख्या समस्या तर उद्भवतातच. पण यामुळे आपले वजनही वाढण्याची शक्यता असते. तसेच यातील काही पदार्थ हे तळलेले असू शकतात जे आरोग्यासाठी घातक असतात.

४. दूध आणि केळं 

अनेकदा आपण लहान मुलांना केळं खायला देतो आणि त्यावर दूध प्यायला देतो. शिकरण हा तर आपल्यापैकी अनेकांच्या अतिशय आवडीचा पदार्थ असतो. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने त्यातील पोषण शरीराला मिळत नाही असे नाही तर त्यामुळे आपले वजन खूप जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळे तुम्हाला हे दोन्ही खायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये २० ते ३० मिनीटांचा गॅप ठेवायला हवा. 
 

Web Title: 5 fattening foods combinations you should avoid : Want to be slim? Avoid 4 food combinations in diet; Look slim-fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.