Join us

गोड खाण्याची इच्छा झाल्यास 'हे' पदार्थ खा! वजन वाढणार नाही, तब्येतही होईल ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2025 16:05 IST

5 Foods That Helps To Reduce Sugar Cravings: कधी कधी गोड खाण्याची खूपच इच्छा हाेते. पण वजन वाढेल म्हणून आपण ते टाळतो. अशावेळी हे गोड पदार्थ आपल्या नक्कीच उपयोगी येऊ शकतात.(how to control sugar cravings?)

ठळक मुद्देकधी ना कधी गोड खाण्याची खूपच तीव्र इच्छा होते. गोड खाण्याची इच्छा झाल्यास पुढे सांगितलेले काही पदार्थ खा

वजन कमी करायचं असेल तर सगळ्यात आधी साखर आणि साखरेपासून तयार केलेले गोड पदार्थ खाणं टाळा असं डॉक्टर नेहमीच सांगतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांना साखर आणि गोड पदार्थ एखाद्या शत्रू सारखेच वाटतात. पण कितीही खाण्याचं टाळलं तरी कधी ना कधी गोड खाण्याची खूपच तीव्र इच्छा होते. थोडंसं का होईना पण गोड खावं असं वाटतंच. पण वजन वाढेल या भीतीने आपण ते खाणं एकतर टाळतो किंवा मग इच्छा झाली तर खाऊन घेतो आणि नंतर स्वत:ला दोष देत बसतो. असं तुमच्या बाबतीत इथून पुढे होऊ द्यायचं नसेल तर गोड खाण्याची इच्छा झाल्यास पुढे सांगितलेले काही पदार्थ खा (how to control sugar cravings?).. यामुळे तुमचं वजन तर मुळीच वाढणार नाही उलट झाले तर आरोग्याला त्याचे फायदेच होतील.(5 Foods That Helps To Reduce Sugar Cravings)

 

गोड खाण्याची इच्छा झाल्यास कोणते पदार्थ खावेत?

१. डार्क चॉकलेट- डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम आणि झिंक चांगल्या प्रमाणात असतं. शरीरातले हार्मोन्सचे संतुलन बिघडू नये, यासाठी हे दोन्ही घटक उपयुक्त ठरतात. त्यामुळे चॉकलेट खाण्याची इच्छा झाल्यास डार्क चॉकलेट खा.

चरबी उतरून सुटलेलं पोट होईल एकदम सपाट, फिटनेस ट्रेनरने सांगितल्या ५ सोप्या ट्रिक्स, करून पाहा

२. फळं- गोड खाण्याची इच्छा झाल्यास द्राक्षं, स्ट्रॉबेरी, आंबा असे कोणतेही हंगामी फळ खा. या फळांमध्ये गोडपणा तर असतोच पण फायबरही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे साखर रक्तात विरघळण्यास वेळ लागतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही.

 

३. रताळे- रताळे खाल्ल्याने शुगर क्रेव्हिंग भरपूर प्रमाणात कमी होते. शिवाय त्यातून भरपूर प्रमाणात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबर मिळतात.

बांधणी ब्लाऊजची नवी फॅशन!! ७ सुंदर डिझाईन्स- असं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमधे हवंच..

४. नारळपाणी- हे एक नॅचरल इलेक्ट्रोलाईट ड्रिंक म्हणून ओळखलं जातं. जर तुम्ही नारळपाणी प्यायलं तर त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. जर तुमचं शरीर व्यवस्थित हायड्रेटेड असेल तर शुगर क्रेव्हिंग किंवा इतर काही खाण्याची इच्छा आपोआपच कमी होते.

कुरळ्या केसांची काळजी कशी घ्यावी? आलिया भट, नीता अंबानींचे हेअर स्टायलिस्ट सांगतात ४ टिप्स

५. दही- गोड खाण्याची इच्छा झाल्यास प्लेन दही खा. त्यातून प्रोटीन्स मिळतात. शरीरात प्रोटीन्सची कमतरता असेल तर गोड खाण्याची इच्छा हाेते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सअन्न