Join us  

५ पदार्थ आजपासून खाणं बंद करा; डाएट - व्यायामाशिवाय वजन घटेल; दिसाल सुडौल - फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2024 3:07 PM

5 Foods and Drinks To Avoid for Weight Loss : वजन वाढण्यामागे 'हे' ५ पदार्थ ठरू शकतात कारणीभूत..

वजन वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात (Weight loss). खाण्याच्या सवयींमध्ये बदल, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव यासह इतर कारणांमुळेही वजनामध्ये वाढ होते (Fitness). वजन कमी करण्यासाठी आपण जिम, झुंबा, वर्कआऊट, वॉक, योग यासह इतर गोष्टी करतो (Foods for Weight loss). मुख्य म्हणजे डाएटकडे बारकाईने लक्ष देतो. पण तितकेच डाएटकडेही लक्ष द्यायला हवे. पण अशावेळी वेट लॉस दरम्यान काय खावे? काय टाळावे? या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. असे देखील काही पदार्थ आहेत, जे दिसायला हेल्दी पण ते खाल्ल्यानंतर वजन वाढू शकते.

यासंदर्भात फिटनेस ट्रेनर, सुशील धनावडे सांगतात, 'वजन कमी करण्यासाठी डाएटकडे विशेष लक्ष द्यायला हवे. यादरम्यान, चुकूनही ५ पदार्थ खाऊ नये. हे ५ पदार्थ खाल्ल्याने वजन कमी करण्याच्या प्रक्रीयेमध्ये अडथळे येऊ शकतात. शिवाय वेट लॉस करणं कठीण होऊ शकतं'(5 Foods and Drinks To Avoid for Weight Loss).

वेट लॉस दरम्यान कोणते ५ पदार्थ खाऊ नये?

पोट, मांड्या-दंड थुलथुलीत दिसतात? 'इवल्याशा' बिया कमी करू शकतात तुमचं वजन..पण कसे?

प्रोसेस्ड फूड

सध्या लोकांमध्ये प्रोसेस्ड फूड खाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये साखर, सॅच्युरेटेड फॅट्स इत्यादींव्यतिरिक्त त्यात प्रिझर्व्हेटिव्ह्जही मोठ्या प्रमाणात मिसळलेले असतात. जे शरीरासाठी हानिकारक मानले जाते. ज्याचा थेट परिणाम शरीरावर आणि मेंदूवर दिसून येतो. त्यामुळे वेट लॉसदरम्यान प्रोसेस्ड फूड खाणं टाळणे उत्तम ठरू शकते.

हाय शुगरी ड्रिंक्स

तहान लागल्यावर बरेच जण कोल्डड्रिंक्स पितात. पण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. बऱ्याचदा फ्रुट ज्यूसमध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वजन तर वाढतेच शिवाय रक्तातील साखरेचीही पातळी वाढते. त्यामुळे हाय शुगरी ड्रिंक्स पिणं टाळावं.

रिफाईंड फूड

बहुतांश पदार्थांमध्ये मैद्याचा वापर होतो. फास्ट फूडमध्ये देखील मैद्याचा वापर होतो. मैदा फक्त वजन वाढवत नाही तर, पचनशक्तीही बिघडवते. त्यामुळे मैदा आहारातून वजा करणं हेच उत्तम ठरू शकतं.

पोट - दंड आणि सीटचा भाग वाढला? दुपारी जेवताना ३ चुका टाळा; सुडौल व्हाल

फास्ट किंवा फ्राईड फूड

वजन कमी करण्यासाठी फास्ट फूड, गाड्यावर मिळणारे पदार्थ किंवा फ्राईड फूड खाणं टाळावे. यामुळे वजन वाढू शकते. शिवाय हाय कॅलरी डेझर्ड ज्यात आईसक्रीम, जेलीबी, गुलाब जाम या पदार्थांमध्ये समावेश आहे. हे पदार्थ देखील आहारातून वगळावे, किंवा खाणं कमी करावे.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स