जगभरातील लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. अनियंत्रित खाण्यापिण्याच्या सवयी आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे लोकांचं वजन कमी होत होत नाही आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अडथळे येतात. (5 Foods to avoid during weight loss know how to control weight) वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना काही चुका करणं टाळायला हवं तरच तुम्ही फिट राहू शकाल. (Do not eat these thing while weight loss)
१) हाय कॅलरीजयुक्त डेजर्ट- उच्च कॅलरीजयुक्त डेसर्ट जसं की केक्स, कुकीज आणि आईस्क्रीम अतिरिक्त साखर आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. ज्यामुळे वजन वाढू शकतं. तुम्ही गोड पदार्थांऐवजी फळं, डार्क चॉकलेट्स खाऊ शकता.
नवरात्राच्या ९ दिवसात भराभर घटेल पोटाची चरबी; फराळाचे हे पदार्थ खा-फिगर दिसेल मेंटेन
२) ब्रेड, पास्ता आणि भात यांसारखे कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीजयुक्त पदार्थ अजिबात खाऊ नका. कार्ब्स एक महत्वपूर्ण मॅक्रोन्युट्रिएंट आहे. याचे सेवन केल्यानं वजनही वाढू शकते. याशिवाय ब्राऊन राईस, क्विनोआ, गव्हाची चपाती खा. आहारात जास्तीत जास्त फळं, भाज्या, प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
३) फास्ट फूड आणि तळलेल्या पदार्थांमध्ये कॅलरीज असतात. हे खाद्यपदार्थ खाल्ल्याने हृदयाचे आजार वाढण्याची शक्यता असते. ताजे पदार्थ खाल्ल्याने आजारांचा धोका टाळण्यास मदत होते.
४) हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार वाढलेलं वजन कमी करण्यासाठी फ्रेंच फ्राईस, पोटॅटो चिप्स यांसारख्या पदार्थांचे सेवन करू नका. अभ्यासानुसार फ्रेंच फ्राईज किंवा पोटॅटो चिप्स खाल्ल्याने वजन अधिकच वाढू शकतं.
रोज चालता तरी पोट १ इंचही कमी होत नाही? ५ चुका टाळा, वजन पटापट कमी होईल-फिट दिसाल
५) शुगरी ड्रिंक्स तब्येतीसाठी नुकसानकराक ठरतात. जर तुमचं वजन जास्त असेल तर चुकूनही सॉफ्ट ड्रिंक्स किंवा आर्टिफिशियल फ्रुट ज्यूसचे सेवन करू नका. यामुळे वजन अधिक वाढतं. गोड पदार्थ, सोडा, हायड कॅलरीजयुक्त शुगर ड्रिंक्स वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात.
वजन कमी करण्यासाठी साखर घालून चहा न पिता गुळाचा चहा प्या. जास्तीत जास्त व्यायाम करून किंवा चालण्याचा व्यायाम करून कॅलरीज बर्न करा. जेवणात चपाती न खाता भाकरी खा. रात्रीचे जेवण संध्याकाळी ८ च्या आधीच करा. जर तुम्ही रात्री उशीरा झोपत असाल तर झोपण्याच्या अर्धा तास आधी हळदीचं लो फॅट दूध पिऊ शकता.