बेली फॅट असो किंवा कोणत्याही भागाचं फॅट कमी करायचं (Belly fat loss tips) असो लोक जिम आणि डायटिंगवरच अडकतात. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्यापेक्षा योग्य खाद्यपदार्थ खाणं जास्त गरजेचं असतं. आहारात दुधीचा समावेश करूनही वजनावर नियंत्रण मिळवू शकता. पण ही भाजी खाण्याआधी तुम्हाला छोटसं काम करावं लागेल. दुधीची भाजी चवीला पौष्टीक असते. यामुळे वजन कमी करणं सहज सोपं होतं. (Top Health Benefits of Bottle Gourd)
दुधीची भाजी बनवताना कमी तेल आणि मसाल्यांचा वापर करा. यात जिरं घालायला विसरू नका. जिऱ्यामुळे वजन कमी करणं सहज सोपं होऊ शकतं. दुधीमध्ये फायबर्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. एनसीबीआयवर प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानसार वेटलॉस आणि डायटरी फायबर्स यामध्ये घनिष्ट संबंध आहे. हे पोट जास्तवेळ भरलेलं ठेवतात. यामुळे एकूण कॅलरीज इन्टेक कमी होतो.
१) जास्त कॅलरीजयुक्त पदार्थ खाल्ल्यानं लठ्ठपणा, चरबी वाढते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कमी कॅलरीजयुक्त पदार्थ खायला हवेत. १०० ग्राम दुधीमध्ये केवळ १५ कॅलरीज असतात.
२) दूधी खाल्ल्यानं अन्नपचन व्यवस्थित होते आणि चरबी कमी प्रमाणात तयार होते. यामुळे पोट हलकं राहतं. गॅस, अपचनाचा त्रासही दूर राहतो. ज्यामुळे पोट कमी होण्यास मदत होते.
३) पचन सुधारण्याव्यतिरिक्त मेटाबॉलिज्मसुद्धा वेगात होतो. जितका जास्त मेटाबॉलिझ्म वेगानं असेल तितकंच शरीर जास्त प्रमाणात चरबी घटवेल.
४) दूधी एक ग्लो ग्यासेमिक इंडेक्स फूड आहे. याचा अर्थ असा की दूधी खाल्ल्यानं ब्लड शुगर वाढत नाही.
5) डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी आणि वाढतं वजन वजन रोखण्यासाठी रोज दूधी खायला हवी.
दुधीचा रस कसा बनवायचा? (How to make bottle gourd juice)
दुधीचा तयार करण्यासाठी प्रथम दूधी सोलून त्याचे काप करा. आता कुकरमध्ये दूधीचे काप आणि थोडे पाणी टाकून शिजवून घ्या. जेणेकरून दूधी मऊ होईल. शिजवलेली दूधी मिक्सरच्या भांड्यात घाला. आता बरणीत पुदिन्याची पानं, जिरेपूड, काळी मिरी पावडर, आलं, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घाला. यानंतर त्यात थंड पाणी टाका आणि बारीक वाटून घ्या. यानंतर एका ग्लासमध्ये हा रस घाला. त्यात २-३ बर्फाचे तुकडे टाका आणि मिक्स करा. पुदिन्याच्या पानांनी दुधीचा रस सजवा.