Join us  

कितीही डाएट करा, व्यायाम करुन घाम गाळा वजन कमीच होत नाही ? ‘असं’ वागणं तातडीने थांबवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2023 8:16 PM

5 Mistakes That Slow Down Your Metabolism : अनेकजण व्यायाम करतात पण वजनाचा काटा हलत नाही असं कशाने होतं ?

कितीही एक्सरसाइज केले तरीही वजन कमी होत नाही... डाएट फॉलो केले तरीही वजनकाटा पुढेच जातो, असे अनेक संवाद आपल्याला ऐकायला मिळतात. आपल्यापैकी काहीजण सहसा तक्रार करतात की त्यांचे वजन कमी होत नाही किंवा ते कमी झाले तरी ते पुन्हा वाढते. खरंतर आपले वजन कमी न होण्याला आपल्या शरीरातील मेटाबॉलिज्म हे जबाबदार असते. मेटाबॉलिज्म म्हणजे चयापचय क्रियेचा थेट आपल्या फिटनेसशी संबंध येतो. व्यायाम न करणे हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहेच, यासोबतच चयापचय क्रियेचा वेग मंद असल्यामुळे देखील आपले वजन अधिक वेगाने वाढू शकते(6 Things That Slow Your Metabolism).

आपली सध्याची बिझी लाइफस्टाइल, ताण - तणाव, चुकीची आहार पद्धती यांसारख्या कारणांमुळे देखील आपले वजन वाढत आहे. आपण रोजच्या डेली रुटीनमध्ये अशा काही चुका करतो की ज्यामुळे, आपला मेटाबॉलिज्म रेट हा कमी होतो. आपला मेटाबॉलिज्म रेट कमी होण्यामागे आपल्या डेली रुटीनमधील काही चुकीच्या सवयी (5 Triggers That Will Slow Your Metabolism) कारणीभूत ठरतात. डायटीशियन शीनम.के. मल्होत्रा यांनी मेटाबॉलिज्म रेट कमी होण्यामागे आपल्या डेली रुटीनमधील कोणत्या सवयी कारणीभूत ठरतात हे सांगितले आहे(5 Things That Slow Down Your Metabolism).

मेटाबॉलिज्म रेट कमी असण्यामागील प्रमुख कारण कोणती ? 

१. प्रोटिन्सची कमतरता :- तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जर आपल्या शरीरात प्रोटिन्सची कमतरता असेल तर आपला मेटाबॉलिज्म रेट कमी होऊ शकतो. जर आपल्या शरीरात प्रोटीनचे प्रमाण खूप कमी आहे आणि आपण जर प्रमाणांत कार्ब्स घेत असाल, म्हणजेच जर तुम्ही जास्त गहू व गव्हाचे पदार्थ जसे की चपाती  खात असलात तर तुमचा मेटाबॉलिज्म रेट कमी होऊ शकतो. त्यामुळे दररोज वेगवेगळे प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे गरजेचे असते. 

नारळ पाण्यात १ चमचा घाला हे इटूकलं बी, वजन कमी करायची एकदम सोपी युक्ती...

२. गरजेपेक्षा कमी कॅलरीज घेणे :- काहीजण वजन कमी करण्याच्या नादात अतिशय कमी कॅलरीज असलेले अन्नपदार्थ खाण्याला प्राधान्य देतात. आपल्या या चुकीमुळे देखील आपले वजन लवकर कमी होऊ शकत नाही. दिवसभरात खूपच कमी कॅलरीज घेतल्यामुळे आपल्या शरीरात न कळतच हंगर हार्मोन्सचे प्रमाण वाढते. हंगर हार्मोन्सचे प्रमाण अचानक वाढल्यामुळे आपल्याला वेगवेगळे गोड, तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होते. यामुळे देखील आपला मेटाबॉलिज्म रेट कमी होतो आणि शरीरात अनेक प्रकारच्या कमतरता निर्माण होतात व आपले वजन वाढते. 

वजन कमी करण्यासाठी सतत गरम पाणी प्यायल्याने वजन खरंच कमी होतं का ? तज्ज्ञ सांगतात...

३. बैठी जीवनशैली :- आपण कितीही संतुलित आहार घेतला तरीही जर आपली बैठी जीवनशैली असेल तर यामुळे देखील मेटाबॉलिज्म रेट कमी होतो. जसे की कोणत्याही प्रकारचा एक्सरसाइज न करणे, सतत एकाच जागी बसून राहणे, सुस्त राहणे यामुळे देखील तुमचा मेटाबॉलिज्म रेट कमी होतो. 

भात खा बिंधास्त पोटभर ! ऋजुता दिवेकर सांगतेय, राइस इज नाइस, भीती विसरा-भात खा कारण...

४. पुरेशी झोप न घेणे :- जर आपण ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घेत नसाल तरी देखील मेटाबॉलिज्मचा वेग हा कमी होऊ शकतो. जे लोक फक्त ४ ते ५ तास झोपतात त्यांचा मेटाबॉलिज्म रेट हा खूपच कमी असतो. यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्या शरीरातील मेलाटोनिन हार्मोन त्याचबरोबर झोपेचे हार्मोन्स यात व्यत्यय आणला जातो, यामुळे आपले आरोग्य बिघडते. पुरेशी झोप न घेतल्याने आपले थायरॉईड हार्मोन्स, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन प्रभावित होतात. यामुळे देखील वजन कमी होत नाही.

वजन कमी करण्यासाठी दिवसभरात थोडे थोडे खाता ? ५ गोष्टी विसरू नका, नाहीतर होईल उलटेच...

५. स्ट्रेंथ ट्रेनिंगचा अभाव :- काहीजण फक्त कार्डिओ एक्सरसाइज करतात जसे की, ट्रेडमिलवर धावणे, यामुळे देखील त्यांच्या चयापचय क्रियेचा वेग मंदावतो. मेटाबॉलिज्म रेट सुधारण्यासाठी तज्ज्ञांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग वर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. मेटाबॉलिज्म रेट मंदावण्यापासून रोखण्यासाठी वेट ट्रेनिंग सोबतच स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे देखील तितकेच गरजेचे असते.

मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स