टोमॅटो हा आपल्या स्वयंपाकामधला अगदी महत्त्वाचा घटक आहे. वरण असो, भाजी, भाज्यांचा पराठा असो किंवा मग एखादा सॅलेडचा प्रकार असो... बहुतांश रेसिपीमध्ये टोमॅटो घातला जातोच. एखादी भाजी कमी असेल तर तिच्या जोडीला आपण सहज एक टोमॅटो घालून देतो. त्यामुळे मग भाजीचे प्रमाणही वाढते. असा हा टोमॅटो आपल्या रोजच्या आहारात असला तरी आपल्यापैकी बहुतांश लोकांना त्याबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी माहितीच नाहीत (5 unknown facts about tomato). त्या नेमक्या कोणत्या आणि टोमॅटो खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याविषयी आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितलेली ही माहिती एकदा वाचाच.. (5 important tips about tomato as per ayurved)
टोमॅटोविषयी ५ महत्त्वाच्या गोष्टी
chitchatrajlavi and 2 others या इन्स्टाग्राम पेजवरून टोमॅटोविषयीची काही महत्त्वाची माहिती शेअर करण्यात आली आहे.
मोती- कुंदन लावून दुचाकीला दिला नवा डिझायनर लूक, बघा भन्नाट कलाकुसर असणारा व्हायरल व्हिडिओ
१. यामध्ये सांगितलेला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे टोमॅटो ही भाजी नाही. ते एक ॲसिडिक फळ आहे. त्यामुळे ते अगदी रोज खाऊ नये. खायचंच असेल तर शिजवून खावे. सॅलेड स्वरुपात रोज कच्चे टोमॅटो खाणं टाळावं.
२. जेव्हा केव्हा तुम्ही कच्चा टोमॅटो खाणार असाल तेव्हा त्या टोमॅटोमधल्या बिया काढून टाका आणि मग तो खा. जेणेकरून त्याचा त्रास होणार नाही. कच्चा टोमॅटो दररोज खाल्ल्याने अनेकांना ॲसिडिटीचा त्रास होतो.
३. टोमॅटो त्वचेसाठी मात्र खूप छान आहे. कच्चा टोमॅटो रोज त्वचेवर घासला तर त्वचा तरुण, तजेलदार आणि चमकदार राहण्यास मदत होते.
४. टोमॅटो हे उष्ण आणि आम्लयुक्त फळ आहे. त्यामुळे हिरवा टोमॅटो शक्यतो खाऊ नये.
५. टोमॅटो जर वेगवेगळ्या प्रकारातून शिजवत असाल तर त्यात तूप, ऑलिव्ह ऑईल, लोणी यासारखं कोणतंही हेल्दी फॅट टाकून ते शिजवा. जेणेकरून टोमॅटो खाणं आरोग्यासाठी अधिक पोषक ठरू शकेल.