बदलत्या जीवनशैलीमुळे कोलेस्टरॉल, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह असे अनेक आजार वाढू लागले आहेत. कमी वयातच असे आजार होणाऱ्यांची संख्याही आता वाढते आहे. हे आजार नियंत्रित (how to control cholesterol level) ठेवण्यासाठी जेवढा वैद्यकीय सल्ला आणि व्यायाम महत्त्वाचा असतो, तेवढाच आहारातला (diet or food for controlling cholesterol level) बदलही गरजेचा असतो. म्हणूनच कोणत्या आजारासाठी कोणता पदार्थ किती प्रमाणात खावा, याचा अचूक गणित माहिती असायला पाहिजे. म्हणूनच कोलेस्टरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातले कोणते पदार्थ किंवा मसाले उपयुक्त ठरतात, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ मेहविश खान यांनी एचटी लाईफस्टाईलशी बोलताना दिली.
कोलेस्टरॉल नियंत्रित ठेवणारे पदार्थ
१. हळद
हळदीमध्ये असणारे curcumin नावाचे ॲक्टिव्ह कम्पाऊंड LDL म्हणजेच बॅड कोलेस्टरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तसेच हळदीतील ॲण्टीऑक्सिडंट्स आणि ॲण्टीइन्फ्लामेटरी घटक फफ्फुस, पँक्रिया तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
२. दालचिनी
हृदयासाठी दालचिनी हा मसाल्यांमधला सर्वोत्तम प्रकार मानला जातो. रक्तप्रवाह सुरळीत चालू रहावा, यासाठी दालचिनी अतिशय उपयुक्त ठरते. त्यातील ॲण्टीऑक्सिडंट्स आणि ॲण्टी मायक्रोबियल घटकांमुळे इन्सुलिन निर्मिती व्यवस्थित होते आणि त्यामुळे रक्तातील कोलेस्टरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.
मासिक पाळीत खूप पोट दुखतं? मत्स्यासन करा, वाचा मत्स्यासन करण्याचे ५ जबरदस्त फायदे
३. मिरे
फॅट सेल्सचं ब्रेकडाऊन करण्यासाठी मिरे उपयुक्त ठरतात. त्यामुळे कोलेस्टरॉलची पातळी नियंत्रित राहण्यासही मदत होते. शिवाय त्यातील piperine हा घटक पचन, श्वसन या क्रिया उत्तम होण्यासाठी मदत करतो.
४. मेथ्या
मेथी दाण्यांमध्ये असणारे काही घटक लिव्हर आणि आतड्यामध्ये कोलेस्टरॉल शोषून घेण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठीही मेथ्यांची मदत होतेच.
बघा ही स्टंटबाजी!! पत्नी मागे बसलेली आणि गाडी चालवता चालवता हा माणूस चक्क..... व्हिडिओ व्हायरल
५. ओवा
ओव्यामध्ये असणारे फॅटी अॅसिड आणि डाएटरी फायबर्स चांगल्या कोलेस्टरॉलची पातळी वाढविण्यासाठी आणि वाईट कोलेस्टरॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात.