वजन वाढू लागलं की अनेक जणं पॅनिक होऊ लागतात. आरोग्याच्या, फिटनेसच्या आणि स्वत:च्या दिसण्याबाबत अशी चिंता वाटणं साहजिक आहे. पण त्यामुळे काही जणं वेटलॉस (avoid these mistakes during weigh tloss process) करताना खूपच अतिरेक करतात. कडकडीत डाएट आणि अतिशय हेवी वर्कआऊट (heavy diet and heavy workout), असं सगळं एकदमच सुरू करतात. यात बऱ्याचदा तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला नसतोच. यामुळे मग वजन तर खूप वेगात कमी होतं. पण तब्येतीवर मात्र विपरित परिणाम होतो. प्रचंड अशक्तपणा येतो. शरीरामध्ये अनेक पौष्टिक घटकांची कमतरता (deficiency of nutrients) निर्माण होते. आणि त्यामुळे मग त्याचा परिणाम त्वचेवर, केसांवर, बॉडी लँग्वेजवर होऊन अनेक जण अकालीच वयस्कार दिसू लागतात. म्हणूनच वेटलॉस करताना या अशा चुका मुळीच करू नका..
वेटलॉस करण्याच्या या सवयी तुम्हाला बनवतील लवकरच वयस्कर
१. कॅलरीची चिंता
काही लोक कॅलरीचा इनटेक किती आहे, याबाबत खूपच जास्त काळजी करतात. कमी कॅलरी पोटात जाण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. पण असं करण्याच्या नादात अनेकदा ओमेगा ३ फॅटी ॲसिड, अनसॅच्युरेटेड फॅट्स, फायबर असणारे हाय कॅलरी परंतू पोषणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे पदार्थही त्यांच्या खाण्यात येत नाही. त्यामुळे आहारात या काही घटकांची असणारी कायमची कमतरता तब्येतीवर नकारात्मक परिणाम करू लागते.
२. प्रोटीन्सकडे दुर्लक्ष
वजन कमी करण्याच्या नादात काही जणांच्या डोक्यात केवळ कॅलरीचा हिशोब असतो. मग प्रोटीन्सच्या बाबतीत आपण काय काळजी घेतोय, योग्य प्रमाणात प्रोटीन्स आपण खात आहोत की नाही, याकडे त्यांचं दुर्लक्ष हाेतं. प्रोटीन्स असणारे पदार्थ योग्य प्रमाणात घेतले नाहीत तर त्याचा सगळ्यात पहिला परिणाम तुमच्या केसांवर आणि त्वचेवर दिसून येतो.
३. जेवण टाळणं
लवकर वजन कमी व्हावं म्हणून अनेक जण असेही प्रयोग करतात. जेवणाच्या वेळा टाळणं आणि त्याऐवजी प्रोटीन बार, शेक, ज्यूस असे पदार्थ घेतले जातात. पण जेवण न करता अशा पदार्थांवर वेळ मारून नेणं अतिशय चुकीचं आहे. हे पदार्थ जेवण टाळून घ्यायचे नसतात तर दोन जेवणांच्या मध्ये भूक लागलीच तर खायचे असतात. अनेकदा या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. जेवण टाळून अशा पद्धतीने साखर पोटात जाणंही तब्येतीच्या दृष्टीने हानिकारकच आहे.
४. कार्बोहाड्रेट्स न खाणं
काही जणांना कार्ब्स म्हणजे जणू वजनाच्या दृष्टीने शत्रू वाटू लागतात. त्यामुळे काही डाएटनुसार कार्ब्स खाणं पुर्णपणे टाळलं जातं. पण शरीरात दररोज ठराविक प्रमाणात कार्ब्स जाणं खूप गरजेचं आहे. रिफाईन कार्ब्स टाळणं ठिक आहे. पण ताजी फळ, स्टार्च असणाऱ्या भाज्या, धान्य यातून मिळणारं कॉम्प्लेक्स कार्ब्स शरीरासाठी गरजेचं आहे. कारण त्यातून भरपूर प्रमाणात फायबर आणि अनेक पौष्टिक घटक मिळतात जे आरोग्य आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टी टिकविण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात.
५. फॅट्सही महत्त्वाचे
सगळ्याच प्रकारचे फॅट्स खायचे टाळणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. सुकामेवा, फळांच्या बिया, चांगलं तूप, अव्हाकॅडो, ऑलिव्ह ऑईल या माध्यमातून काही फॅट्स पोटात जाणं गरजेचं आहे.