Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घाईघाईने ५ गोष्टी करताय? वाट्टेल ते कराल तर जीवावर बेतेल

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घाईघाईने ५ गोष्टी करताय? वाट्टेल ते कराल तर जीवावर बेतेल

5 mistakes must avoid if you are on weight loss : वजन कमी करण्यासाठी आपल्याकडून सामान्यपणे केल्या जाणाऱ्या चुकांविषयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2024 01:28 PM2024-02-08T13:28:11+5:302024-02-08T15:39:37+5:30

5 mistakes must avoid if you are on weight loss : वजन कमी करण्यासाठी आपल्याकडून सामान्यपणे केल्या जाणाऱ्या चुकांविषयी

5 mistakes must avoid if you are on weight loss : Doing something with your mind to lose excess weight, avoid 5 mistakes, otherwise... | वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घाईघाईने ५ गोष्टी करताय? वाट्टेल ते कराल तर जीवावर बेतेल

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घाईघाईने ५ गोष्टी करताय? वाट्टेल ते कराल तर जीवावर बेतेल

वजनवाढ ही सध्या सर्वच वयोगटातील एक महत्त्वाची समस्या झाली आहे. हे वाढलेले वजन विविध आजारांना कारणीभूत तर ठरतेच. पण वाढलेल्या वजनामुळे आपण लठ्ठ दिसतो. त्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व चांगले दिसत नाही, आपल्याला फॅशन करता येत नाही आणि मग याचा कालांतराने आपल्या आत्मविश्वासावर परीणाम होतो. पण ही सगळी सायकल मोडायची तर वजन नियंत्रणात आणायला हवे. वजन नियंत्रणात आणण्यासाठी आपला आहार, व्यायाम, झोप, ताणतणाव अशा सगळ्या गोष्टींचे योग्य पद्धतीने नियोजन करायला हवे ( mistakes must avoid if you are on weight loss). 

जीवनशैलीतील या गोष्टी नीट नसतील तर त्याचा वजनावर नकळत परीणाम होतो आणि मग आपण कितीही प्रयत्न केले तरी वाढलेले वजन कमी होत नाही. अनेकदा वजन कमी करायचे म्हणून बरेच जण मनानेच काहीतरी व्यायाम आणि आहारात बदल करतात. पण असे करणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. यामुळे वाढलेले वजन तर कमी होत नाहीच पण आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होण्याची शक्यता असते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता शहा पांचाळ वजन कमी करण्यासाठी आपल्याकडून सामान्यपणे केल्या जाणाऱ्या चुकांविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, त्या कोणत्या पाहूयात...

१. खूप कमी खाणे 

वजन कमी करायचं म्हणून आपण खाणं एकाएकी कमी केलं की शरीराचा मेटाबॉलिझम कमी होतो. यामध्ये शरीर फ्लाईट आणि फाईट अशा मोडमध्ये जाते आणि ऊर्जा साठवण्यासाठी शरीराला जास्त कष्ट पडतात. अनेकदा लोकांना उपासमार आणि उपवास यातला फरक लक्षात येत नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडून अशाप्रकारच्या चुका होतात. 

२. झोप कमी होणे 

आपण दिवसभरात ८ तास झोपलो नाही तर शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन म्हणजेच कॉर्टीसॉलची पातळी वाढते. ज्यामुळे शरीरात चरबी वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर न चुकता ८ तास किमान झोप घ्यायला हवी हे लक्षात ठेवा. 

३. प्रोटीनचे प्रमाण

काही जण आहारात खूप जास्त प्रमाणात प्रोटीन घेतात तर काही जण अजिबातच प्रोटीन्स घेत नाहीत. पण याचा मध्य गाठणे गरजेचे असून आहारतज्ज्ञांच्या मदतीने आपल्या शरीराला किती प्रमाणात प्रोटीन्सची गरज आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे आहारात त्याचा समावेश करायला हवा. 

४. अदृश्य फॅटस 

पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात तेल, तूप, बटर या गोष्टींचा वापर केल्यास ते दिसून येत नाही. पण त्याचा वजन वाढण्यावर परीणाम होतो आणि त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात. 

५. शारीरिक व्यायाम

तुम्ही पूर्ण दिवस लॅपटॉपवर घालवत असाल आणि १ तास जिमिंग करत असाल तर त्याचा म्हणावा तसा परीणाम होत नाही. तुम्ही दर काही वेळाने शारीरिक हालचाली करत नसाल तर तुम्ही फिजिकली अॅक्टीव्ह आहात असे म्हणू शकत नाही आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत हे अडचणीचे ठरु शकते. 


 

Web Title: 5 mistakes must avoid if you are on weight loss : Doing something with your mind to lose excess weight, avoid 5 mistakes, otherwise...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.