सतत वाढत जाणारे वजन ही सध्या एक फार मोठी कॉमन समस्या आहे. आजकाल प्रत्येकजण वाढत जाणाऱ्या वजनाने हैराण आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय (5 morning drinks that melt fat & shrink the waist) करून पाहतो. कुणी जिमला जातात तर कुणी डाएट फॉलो करतात. कुणी खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात तर कुणी योगा सुरु करतात. वजन वाढू नये म्हणून आपण जमतील तितके सगळे उपाय करतोच. योग्य डाएट आणि एक्सरसाइज (5 morning drinks to burn fat fast : Morning drinks for weight loss) सोबतच वजन कमी करण्यासाठी आपण इतरही फायदेशीर असे छोटे - मोठे घरगुती उपाय देखील करतो(Top 5 Morning Drinks That Melt Body Fat Like Butter Backed By Research).
वजन कमी करण्यासाठीच्या घरगुती उपायांमध्ये बरेचजण वेगवेगळ्या औषधी पदार्थांचे पाणी पिणे पसंत करतात. वजन कमी करण्यासाठी आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या नैसर्गिक पदार्थांचे पाणी करून प्यायलयास त्याचा आपल्याला फायदाच होतो. या काही नैसर्गिक पेयांमुळे तुमच्या चयापचय क्रियेचा वेग वाढतो, शरीरातील साठवलेली चरबी हळूहळू वितळवण्यास देखील सुरुवात होते. यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाएट आणि एक्सरसाइजसोबतच कोणत्या प्रकारची नॅचरल ड्रिंक पिऊ शकता ते पाहूयात.
नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्यासाठी खास ड्रिंक्स...
१. ओव्याचे पाणी :- बेलीफॅट्स कमी करण्यासाठी :- ओव्यामध्ये थायमॉल नावाचा घटक असतो, जो आपल्या शरीरातील पाचक रसांचा स्राव वाढवतो. ओव्याचे पाणी प्यायल्याने फक्त पचन सुधारत नाही तर शरीरातील साठलेली चरबी देखील कमी करण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी प्यायल्याने पोटाची चरबी आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ओव्याच्या पाण्यांत लिंबू किंवा मध मिसळून देखील पिऊ शकता.
फराह खान इतकी कशी काय बारीक झाली? फराह सांगते बिनपैशाचा सोपा उपाय, वजन घटले सरसर...
२. ब्लॅक कॉफी :- चरबीचे थर कमी करण्यासाठी :- ब्लॅक कॉफी प्यायल्याने आपल्या शरीरातील चरबीचे साचून राहिलेले थर कमी करण्यास मदत होते. ब्लॅक कॉफीमध्ये असलेले कॅफिन शरीराची ऊर्जा वाढवते आणि चरबीचे थर वितळवण्याचे काम करते. सकाळी साखर न घालता एक कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने तुम्हाला अॅक्टिव्ह वाटेल आणि तुमचे चयापचय देखील सुधारेल. ब्लॅक कॉफी दिवसातून एक किंवा दोन कप पेक्षा जास्त पिऊ नका. वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी योग्य पद्धतीने प्यायल्यास नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि फरक दिसेल.
३. कोमट लिंबू पाणी :- वजन कमी करण्यासाठी :- सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने चयापचय क्रिया अॅक्टिव्ह होते. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन 'सी' आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात, ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगवान होते. तसेच, हे पेय पचनसंस्था सुधारते. जर त्यात चिमूटभर दालचिनी किंवा थोडे मध घातला तर ते आणखी फायदेशीर ठरते. हे सोपे आणि स्वस्त उपाय केवळ चरबी जाळण्यास मदत करत नाही तर दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यास देखील फायदेशीर ठरतात.
एक चूक आणि वजन वाढेल भराभर, तज्ज्ञ सांगतात वेटलॉससाठी खाण्याची योग्य पद्धत - वजनात दिसेल फरक...
४. मेथी दाणे पाणी :- चरबी जाळण्यासाठी :- रात्रभर भिजवून ठेवलेली मेथी उकळून सकाळी त्याचे पाणी प्यायल्याने चरबी चयापचय गतिमान होते. मेथीमध्ये आढळणारे फायबर पोट बराच काळ भरलेले ठेवण्यास मदत करते, त्यामुळे उगाचच जास्त खाण्याची इच्छा होत नाही. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत जे पचन सुधारतात आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात. विशेष म्हणजे हे पाणी पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
५. दालचिनीचे पाणी :- वाढलेले पोट आणि चरबी कमी करण्यासाठी :- दालचिनी आणि मध वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते आणि मधातील एंजाइम चरबी लवकर जाळण्यास मदत करतात. अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा मध एका ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्या. हे पेय शरीराला डिटॉक्स करते, चयापचय वाढवते आणि दीर्घकाळ वजन कमी करण्यास मदत करते.