Join us  

पोट सुटलंय-मागून कंबर जाड दिसते? कोमट पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या; पोट सपाट-वजन कंट्रोलमध्ये येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 11:56 AM

5 Natural Drinks That Reduce Belly Fat (Pot Kami Karnyasathi Upay) : पोटाच्या आजूबाजूला जमा होणारी चरबी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या डायबिटीस,  कॅन्सर यांसारख्या आजारांसाठी कारणीभूत ठरते.

आजकाल सगळीकडेच लठ्ठ्पणाची समस्या दिसून येते. (Weight Gaining Issue)  सतत एकाचजागी बसून फॅट्स वाढण्याचे, पोटाची चरबी वाढण्याचे त्रास अनेकांना जाणवतात.  (Belly Fat Loss Tips) पोटाच्या खालच्या भागात जेव्हा चरबी जमा होते तेव्हा त्याला सबक्युटेनियस फॅट असं म्हणतात. हे फॅट फार नुकसानकारक असते. (How To Lose Belly Fat )कारण  हे एब्डोमिनल कॅव्हिटी, आतड्या, पॅनक्रियाज, लिव्हर आणि हार्टच्या विकारांसाठी कारणीभूत ठरते. (Weight Loss Drink)

पोटाच्या आजूबाजूला जमा होणारी चरबी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या डायबिटीस,  कॅन्सर यांसारख्या आजारांसाठी कारणीभूत ठरते.  पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणताही मॅजिक फॉम्यूला नसून जास्तीत जास्त मेहनत करण्याची आवश्यकता असते.  यासाठी व्यायाम, हेल्दी डाएट, पुरेशी झोप असायला हवी.  सकाळच्यावेळी जर तुम्ही नॅच्युरल ड्रिंकचे सेवन केले तर पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. (How to loss Belly Fat Faster)

पोट सुटलंय, व्यायामासाठी वेळ नाही? रात्री १० नंतर गरम पाण्यात हा पदार्थ मिसळून प्या, झरझर घटेल वजन

ग्रीन टी

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुससार ग्रीन टी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरते. यात एंटीऑक्सिडेंट्स आणि बरीच पोषक तत्व असतात.  ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. एका अभ्यासानुसार १२ आठवडे रोज सकाळी ग्रीन टी चे सेवन केल्यास ३ ते साडे तीन किलो वजन कमी होऊ शकते. ग्रीन टी व्यतिरिक्त  तुम्ही ब्लॅक कॉफीसुद्धा घेऊ शकता. 

सद्गगुरू सांगतात जेवताना कसं, किती खावं याचे ५ नियम; वजन कंट्रोलमध्ये राहील-आजारही दूर

लिंबू आणि मध

पोटाची थुलथुलीत चरबी कमी करण्याासठी रोज सकाळी उठून सगळ्यात आधी गरम पाण्याचे सेवन करा. त्यात लिंबू आणि मध मिसळून प्या. काही दिवसांतच चांगला फरक दिसून येईल. लिंबू व्हिटामीन सी चा एक चाांगला स्त्रोत आहे.  यात पेक्टिन फायबर्स असतात. ज्यामुळे चरबी कमी करण्यास मदत होते. अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. 

बडीशेपेचं पाणी

जेवल्यानंतर लोक बडिशेप खातात. यामागचं कारण हेच असते की मेटाबॉलिज्म वेगाने व्हावा. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. बडिशेपेत अनेक प्रकारचे एंटीऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते. बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी  हलकं करून या पाण्याचे सेवन करा. 

व्हेजिटेबल सूप

साखरयुक्त फ्रुट ज्यूस प्यायल्याने वजन  वाढते तर व्हेजिटेबल ज्यूस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. एका अभ्यासानुसार लो सोडियम युक्त व्हिजेटेबल ज्यूस  प्यायल्याने वजन वेगानं कमी होण्यास मदत  होते. यात कॅलरीजसुद्धा कमी असतात.  हिरव्या पालेभाज्या, पालक, कारले यांसारख्या भाज्यांच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात. याव्यतिरिक्त रोज योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने वजन कमी होऊ शकते. 

आल्याचा चहा 

आलं भाज्यांची आणि चहाची चव वाढवते.  आल्याचा चहा प्यायल्याने अनेक आजारांपासूनही बचाव होतो. सर्दी, खोकला, आर्थरायटिस  या आजारांवर आल्याचा चहा फायदेशीर ठरतो. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.  अभ्यासानुसार २ ग्राम आल्याच्या पावडरमध्ये गरम पाणी मिसळून घातल्याने पोटाचे चरबी पोटाची चरबी वेगाने कमी होण्यास मदत होते. तुम्ही आलं किसून पाण्यात उकळून घ्या. रोज सकाळी या चहाचे सेवन करा. काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसून येईल.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स