Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > हिवाळ्यात रोज खजूर खाण्याचे ५ फायदे; ही 'डेट' चुकवू नका, २ पौष्टिक रेसिपी

हिवाळ्यात रोज खजूर खाण्याचे ५ फायदे; ही 'डेट' चुकवू नका, २ पौष्टिक रेसिपी

Winter food: डिंकाचे लाडू, सुकामेवा हिवाळ्यात खाणं जसं गरजेचं आहे, तसंच थंडीच्या या दिवसांत आवर्जून खजूर खायला पाहिजेत.. वाचा हिवाळ्यात खजूर खाण्याचं महत्त्व (benefits of eating dates)..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 06:13 PM2022-01-27T18:13:47+5:302022-01-27T18:20:28+5:30

Winter food: डिंकाचे लाडू, सुकामेवा हिवाळ्यात खाणं जसं गरजेचं आहे, तसंच थंडीच्या या दिवसांत आवर्जून खजूर खायला पाहिजेत.. वाचा हिवाळ्यात खजूर खाण्याचं महत्त्व (benefits of eating dates)..

5 reasons to eat dates in your daily diet specially in winter season, 2 special recipe of dates | हिवाळ्यात रोज खजूर खाण्याचे ५ फायदे; ही 'डेट' चुकवू नका, २ पौष्टिक रेसिपी

हिवाळ्यात रोज खजूर खाण्याचे ५ फायदे; ही 'डेट' चुकवू नका, २ पौष्टिक रेसिपी

Highlightsथंडीच्या दिवसांत सुकामेवासोबत दररोज एक किंवा दोन खजूरही खायलाच पाहिजेत. 

थंडीच्या दिवसांत संसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढलेलं असतं. कोरोनामुळे तर संसर्गजन्य आजार, त्यापासून स्वत:चा आणि कुटूंबाचा बचाव, त्यासाठी इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती (immunity) वाढविण्याची गरज यासगळ्या गोष्टी आपण अगदी जवळून अनुभवतो आहोत. इम्युनिटी वाढविण्यासाठी हिवाळ्यात आपल्याकडे डिंक, सुकामेवा, उडीद, मेथ्या अशा पदार्थांचा वापर करून पारंपरिक लाडू बनविण्यात येतात. हे लाडू खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, शिवाय आपले शरीरही आतून उबदार होण्यास मदत होते. अशाच पद्धतीचं काम खजूर देखील करतात. म्हणूनच थंडीच्या दिवसांत (benefits of eating dates in winter season) सुकामेवासोबत दररोज एक किंवा दोन खजूरही खायलाच पाहिजेत. 

 

थंडीच्या दिवसांत खजूर खाण्याचे ५ फायदे
१. प्रोटीन्सचा उत्तम पर्याय

शाकाहारी लोकांना प्रोटीन्स मिळण्याचे खूप मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. यापैकीच एक पर्याय म्हणजे  खजूर. खजूरामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळे प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी दररोज खजुराच्या १- २ बिया खाणं गरजेचं आहे. शरीराचे स्नायू मजबूत होण्यासाठी प्रोटीन्स खूप जास्त गरजेचे असते. 

 

२. हाडे होतात मजबूत
खजूरांमध्ये सेलेनियम, मँगनीज, कॉपर, मॅग्नेशियम ही खनिजे खूप मोठ्या प्रमाणावर असतात. हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमप्रमाणेच ही सगळी खनिजेही अतिशय गरजेची आहेत. त्यामुळेच हाडे ठिसूळ होऊ नयेत, यासाठी खजूर आपल्या आहारात नियमितपणे असायला पाहिजेत. हाडांच्या संबंधित असणारा osteoporosis या आजाराचा धोकाही खजूर खाण्यामुळे कमी होतो. 

 

३. व्हिटॅमिन्ससाठी उत्तम
खजूर खाल्ल्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन B1, B2, B3, B5, A1 आणि C मिळते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नियमितपणे खजूर खाणं गरजेचं आहे. खजूर खाल्ल्यामुळे शरीराला ग्लूकोज, सुक्रोज, फ्रुक्टोज या natural sugar मिळण्यास मदत होते. त्यामुळे तुमची उर्जा वाढते. 

 

४. पचनसंस्थेसाठी उपयुक्त
पचन संस्थेचे कार्य मजबूत करण्यासाठी खजूर खाणे अतिशय फायदेशीर ठरते. ज्यांना अपचन, ॲसिडीटी असा त्रास वारंवार होत असेल त्यांनी खजूर नियमितपणे खावा. यामुळे पचन शक्ती चांगली होऊन पचन संस्थेचे कार्य उत्तम होते. 

 

५. वेटलॉसासाठी उपयुक्त
जे लोक वेटलॉससाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनी आवर्जून खजूर खायला हवेत. कारण खजूर हे एक लो फॅट डाएट म्हणून ओळखले जाते. तसेच खजूरामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्टरॉलची पातळी संतूलित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाचे कार्य चांगले ठेवण्यासाठीही खजूर उपयुक्त ठरतात. 

 

खजूराच्या या दोन सोप्या रेसिपी करून बघा.. (2 recipe using dates)
१. खजूर मिल्क शेक (khajoor milk shake)

सकाळी नाश्त्यानंतर खजूर मिल्क शेक घेणे उत्तम ठरते. एका व्यक्तीसाठी खजूर मिल्क शेक करायचा असेल तर दोन खजूर वाटीभर दूधात भिजत घालावे. खजूर तीन ते चार तास भिजल्यानंतर त्यातील बिया काढून टाकाव्या आणि भिजलेले खजूर आणि दूध एकत्रितपणे मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. यानंतर यात आणखी वाटीभर दूध आणि चवीनुसार साखर टाकावी. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे. खजूर मिल्क शेक झाला तयार. साखर नको असल्यास यात मधही टाकू शकता किंवा साखर, मध असे काहीही न टाकताही पिऊ शकता.. 

 

२. खजूर ड्रायफ्रुट लाडू (khajur laddoo)
या प्रकारात खजूर बिया काढून सोलून घ्या. यासाठी कडक खजूर नको. अतिशय मऊ आणि गर असलेले जे खजूर मिळतात, ते वापरावे. खजूराचा गर काढून घ्यावा. काजू, बदाम, अंजीर, अक्रोड, पिस्ते असे तुमच्या आवडीचा सुकामेवा घेऊन त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. खजूराचा गर, हे तुकडे आणि साजूक तूप हे मिश्रण एकत्र करून व्यवस्थित कालवून घ्यावे आणि त्याचे पेढ्याच्या आकाराचे छोटो छोटे पौष्टिक लाडू बनवावे. 

 

Web Title: 5 reasons to eat dates in your daily diet specially in winter season, 2 special recipe of dates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.