Join us  

लगेच थकवा येतो, पाठ- कंबर गळून जाते? तज्ज्ञ सांगतात, महिलांनी भरपूर एनर्जीसाठी खावे ५ पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2024 5:14 PM

5 Superfood For Every Woman: नेहमीचंच ठरलेलं काम केलं तरी बहुसंख्य महिलांना लगेच थकवा येतो. अशक्तपणा जाणवतो. असं होऊ नये म्हणून बघा काय करायचं.... (5 food that improves energy level)

ठळक मुद्देमहिलांनी काही पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजेत, जे त्यांना भरपूर एनर्जी देतील.. असे पदार्थ नेमके कोणते ते पाहा...

काही मोजके अपवाद सोडले तर प्रत्येक महिलेची सकाळ मोठी धावपळीची असते. मुलं, नवरा, घरातले इतर सदस्य यांच्या वेळा पाळणे, त्यांच्या नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था बघणे, घरातली इतर कामं करणे आणि ते सगळं झालं की मग स्वत:चं धावपळीत आवरून घाई- गडबडीत ऑफिस गाठणे. ऑफिसमध्ये पोहाेचलं की पुन्हा तिथले ताणतणाव, कामं सांभाळणे.. हे सगळं करताना स्वत:च्या तब्येतीकडे अनेकजणी दुर्लक्ष करतात. काही जणी तरी गडबडीत खाणंही विसरतात. तर काहीजणी मिळेल ते तोंडात कोंबून पोट भरतात. पण असं वारंवार केल्याने शरीरात अनेक पोषणमुल्यांची कमतरता निर्माण हेाते आणि मग तब्येतीच्या वेगवेगळ्या तक्रारी सुरू होतात. म्हणूनच महिलांनी काही पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजेत (5 superfood for every woman), जे त्यांना भरपूर एनर्जी देतील.. असे पदार्थ नेमके कोणते ते पाहा...(5 food that improves energy level)

प्रत्येक महिलेने खायलाच पाहिजेत हे ५ पदार्थ

 

१. पालक

पालकामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असतं. त्यामुळे पाळी येण्याच्या आधी अनेक महिलांना जो त्रास होतो, तो टाळण्यासाठी पालक योग्य प्रमाणात खायला पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी तसेच हाडांच्या मजबुतीसाठीही पालक उपयुक्त ठरतो.

कमी वयातच डोळ्यांभोवती सुरकुत्या? १ खास फेसपॅक लावा, १५ दिवसांत त्वचा होईल टाईट-दिसेल तरुण

२. मसूर डाळ

मसूर डाळीमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात. त्यामुळे आठवड्यातून एक ते दोन वेळा तरी वरण, उसळ अशा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तरी मसूर डाळ तुमच्या आहारात असायलाच पाहिजे. 

 

३. दूध

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक महिलांना पाठ, कंबर दुखण्याचा त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी महिलांनी नियमितपणे दूध प्यायला हवे. दुधामध्ये कॅल्शियम तर असतेच पण त्यातून प्रोटीन्स, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, व्हिटॅमिन डी हे पदार्थही मिळतात.

फक्त ६ पदार्थ रोज आठवणीने खा! केसांचे सगळे प्रॉब्लेम जातील, केस गळणार नाहीत- वाढतील भराभर

४. बीटरुट

बीटरुटमधून फायबर भरपूर प्रमाणात मिळतात. ते पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच रक्ताभिसरण क्रिया तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही बीटरुटमधले घटक उपयुक्त आहेत. 

 

५. बदाम

 बदाम हे प्रीबायोटीक फूड म्हणून ओळखले जाते. म्हणजेच ते पचनक्रिया उत्तम ठेवण्यासाठी मदत करते. प्रोटीन्स आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत म्हणून बदाम ओळखले जातात, अशी गायनॅकोलॉजिस्ट प्रियांका गुप्ता यांनी सांगितलेली माहिती एनडीटीव्हीने प्रकाशित केली आहे.   

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नमहिलाहेल्थ टिप्सआरोग्य