वजन वाढीच्या समस्येने अनेक लोकं त्रस्त आहेत. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे सध्या ही समस्या वाढत चालली आहे. बैठी जीवनशैली, आहार-व्यायामाकडे दुर्लक्ष, फास्ट फूड खाणे यासह इतर कारणांमुळे वजन झपाट्याने वाढत जाते. जे काही केल्या लवकर कमी होत नाही. बऱ्याचदा तिशीनंतर वजन कमी करणं अवघड होऊन जाते. बहुतांश लोकं वजन कमी करण्याच्या नादात नाश्ता किंवा डिनर स्किप करतात (Super Foods for Weight Loss). पण यामुळे खरंच वजन कमी होते का?
जर आपलं काही केल्या वजन कमी होत नसेल तर, रिकाम्या पोटी स्वयंपाकघरातील ५ गोष्टी खा (Weight Loss Tips). यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटेल(5 Superfoods that Burn Belly Fat and Help With Weight Loss).
मेथी दाणे
मेथी दाणे फक्त वजन कमी करण्यासाठी नसून, केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. मेथी दाण्यांमध्ये फायबर, लोह, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डीचे प्रमाण अधिक असते. नियमित मेथी दाण्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. यासाठी उकळत्या पाण्यात एक चमचा मेथी दाणे घाला. ५ मिनिटानंतर गाळणीने गाळून सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्या. यामुळे वेट लॉस, ब्लड शुगर कण्ट्रोल, यासह केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरेल.
बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल
एलोवेरा जेल
बरेच जण एलोवेरा जेलचा वापर फक्त केस आणि त्वचेसाठी करतात. पण याचा वापर वेट लॉससाठी देखील उपयुक्त ठरू शकते. कोरफडीच्या गरात व्हिटॅमिन ए, सी, ई, फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम, क्रोमियम, सेलेनियम, सोडियम, लोह यासह इतर घटक आढळतात. याचा ज्यूस किंवा गरम पाण्यात कोरफडीचा गर मिक्स करून रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होईल.
काकडी
रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यामध्ये काकडी खाल्ल्याने शरीराला अधिक फायदा होतो. काकडी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. शिवाय त्यात भरपूर प्रमाणात फायबर आढळते. ज्यामुळे चयापचय क्रिया बुस्ट होते. यासह वेट लॉससाठी मदत होते.
पपई
पौष्टिकतेने समृद्ध पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते. जे पचनक्रिया सुरळीत ठेवते. पपई हे नैसर्गिक फॅट बर्नर म्हणून ओळखले जाते. नियमित वाटीभर पपईचे फोडी खाल्ल्याने पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते.
कार्तिक आर्यनने सोडली वर्षभरासाठी साखर, साखर सोडल्याने खरंच ब्लड शुगर आणि वजन कमी होते की..
गाजर आणि बीटरूटचा ज्यूस
गाजर आणि बीटरूटच्या रसाने दिवसाची सुरुवात केल्याने शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. त्यात पुरेशा प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. आपण रिकाम्या पोटी नियमित एक ग्लास गाजर आणि बीटरूटचा ज्यूस पिऊ शकता.