Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > मखाने दूधात उकळवून खाण्याचे ६ आश्चर्यकारक फायदे; थकवा- अशक्तपणा जराही नाही येणार

मखाने दूधात उकळवून खाण्याचे ६ आश्चर्यकारक फायदे; थकवा- अशक्तपणा जराही नाही येणार

5 Surprising Benefits of Boiling Makhana in Milk : मखान्यांचे सेवन फायदेशीर मानले जाते.  दूध आणि मखाने खाणं उर्जा वाढवण्यासाठीही उत्तम आहे. (Makhana soaked in milk benefits)

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 07:50 PM2023-07-04T19:50:26+5:302023-07-05T10:12:04+5:30

5 Surprising Benefits of Boiling Makhana in Milk : मखान्यांचे सेवन फायदेशीर मानले जाते.  दूध आणि मखाने खाणं उर्जा वाढवण्यासाठीही उत्तम आहे. (Makhana soaked in milk benefits)

5 Surprising Benefits of Boiling Makhana in Milk : Makhana soaked in milk benefits | मखाने दूधात उकळवून खाण्याचे ६ आश्चर्यकारक फायदे; थकवा- अशक्तपणा जराही नाही येणार

मखाने दूधात उकळवून खाण्याचे ६ आश्चर्यकारक फायदे; थकवा- अशक्तपणा जराही नाही येणार

दूध तब्येतीसाठी फायदेशीर मानले जाते. दूधात कॅल्शियम, मिनरल्स यांसारखे गुण असतात. जे शरीराला भरभरून फायदे देतात. दूध आणि मखाने खाणं शरीरासाठी गुणकारी मानले जाते. दूधात मखाने  घालून प्यायल्यास आरोग्याला बरेच फायदे मिळतात. मखाने तब्येतीसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नसतात.(5 Surprising Benefits of Boiling Makhana in Milk)

यात सोडियम, कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण कमी असते. मखान्यांमध्ये एंटी इंफ्लेमेटरी, एंटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रोटीन्स असे गुण असतात. दूधात मखाने उकळून खाल्ल्यानं एनिमियाची समस्या दूर होते. ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते. त्यांच्यासाठी मखान्यांचे सेवन फायदेशीर मानले जाते.  दूध आणि मखाने खाणं उर्जा वाढवण्यासाठीही उत्तम आहे. (Makhana soaked in milk benefits)

ताण तणाव कमी होतो

जर तुम्ही जास्त ताण घेत असाल तर मखान्याचे सेवन करू  शकता. रात्री झोपण्याआधी दूधासह मखान्यांचे सेवन केल्यानं शरीराला भरभरून फायदे मिळतात. यामुळे एनर्जी टिकून राहते. यामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते.

गॅस

बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर दूध आणि मखाने एकत्र घ्या. मखान्यांमध्ये फायबरचे गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळतात. यामध्ये केवळ फायबरच नाही तर लोह आणि कॅल्शियमचे घटक देखील आढळतात, ज्यामुळे पोटातील गॅस, अपचनाची समस्या कमी होण्यास मदत होते.

हाडं

दूध आणि मखाने  या दोन्हीमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते, या दोन्हीचे एकत्र सेवन केल्यास कमकुवत हाडांच्या समस्येपासून सुटका मिळते.

एनर्जी

जर तुम्हाला अशक्तपणा आणि उर्जेची कमतरता वाटत असेल तर तुम्ही याचे सेवन करू शकता. मखाने आणि दुधामध्ये प्रथिने आणि पोषक तत्व चांगल्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

पुरूषांसाठी फायदेशीर

दुधात भिजवलेले मखाने खाणे देखील पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे. मखाना पुरुषांचे लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत करतो. दुधात भिजवलेले मखाने रोज खाल्ल्यास शक्ती आणि ऊर्जा मिळते. यासोबतच शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्याही वाढेल.

डायबिटीक रुग्णांसाठी फायदेशीर

मखाने आणि दूधाचं कॉम्बिनेशन डायबिटीक रुग्णासाठीही फायदेशीर ठरतं. मखान्यांमध्ये हायपोग्लायसेमिक आणि एंटी ऑक्सिडेंट्स गुण असतात. ज्यामुळे ब्लड शुगर कमी करण्यास मदत होते. तुम्ही दूधात भिजवून मखान्यांचे सेवन करत असाल तर डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो.

Web Title: 5 Surprising Benefits of Boiling Makhana in Milk : Makhana soaked in milk benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.