Join us  

पोट खूपच सुटलं-दंड जाड दिसतात? ५ पदार्थ रोज खा, चटकन घटेल चरबी-व्हाल सडपातळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 1:59 PM

5 Tips For Successful Weight Loss : पोषक तत्वांनी परिपूर्ण लो कॅलरीजयुक्त फूड्स जसं की हिरव्या भाज्या, लीन प्रोटीन आणि फळं खाल्ल्याने वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते

थंडीच्या दिवसांत योग्य लाईफस्टाईल असेल तरी वजन कमी करणं थोडं कठीण असतं. (Weight Loss Tips)  आजकाल लोक पोट कमी करण्यासाठी सतत उपाय करत असतात. तुम्ही सुद्धा पोट कमी करण्याासाठी उपाय शोधत असाल तर लाईफस्टाईलमध्ये सोपे बदल करून तुम्ही वजन कमी करू शकता. (How to Lose Weight Fast) पोषक तत्वांनी परिपूर्ण लो कॅलरीजयुक्त फूड्स जसं की हिरव्या भाज्या, लीन प्रोटीन आणि फळं खाल्ल्याने वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. (5 Tips For Successful Weight Loss)

याव्यतिरिक्त तुम्ही सूप आणि हर्बल चहा यांसारख्या गरम पदार्थांचा समावेश करू शकता. ज्यामुळे कॅलरी कंट्रोल करण्यासही मदत होते. (Easy Ways To Weight Naturally) हिवाळ्यात तुम्ही अशा काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होईल. 

१) सूप

मेन कोर्सच्या आधी सूपचे सेवन करायला हवे. सूपमध्ये कमीत कमी कॅलरीज असतात. यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वजन वाढत नाही आणि तुम्ही कमीत कमी प्रमाणात खाता.  बीटरूट, गाजर, मूग डाळ कसलेही सूप तुम्ही  आहारात घेऊ शकता.

२) हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये कमीत कमी कॅलरीज आणि जास्त फायबर्स असतात. ज्यामुळे जास्तवेळ तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं. हिवाळ्यात बाजारात बऱ्याच ताज्या भाज्या उपलब्ध असतात. पालक, मेथी, कोलार्ड ग्रीन्स, ब्रोकोली या भाज्यांचे सेवन तुम्ही करू शकता.  जर तुम्हाला चपाती किंवा भाकरीबरोबर भाज्या खायला आवडत नसतील तर तुम्ही सॅलेड्सच्या स्वरूपात भाज्या खाऊ शकता.

हिवाळ्यात ‘हा’ १ लाडू रोज खा, हाडं होतील बळकट-कॅल्शियमच्या गोळ्यांची गरजच पडणार नाही

३) आंबट फळं

व्हिटामीन सी आणि फायबर्सने परिपूर्ण संत्री, द्राक्ष आणि लिंबू यांसारख्या फळांच्या सेवनाने मेटाबॉलिझ्म  वाढते. पचायला मदत होते. या फळाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्तीसुद्धा वाढते. 

4) हर्बल चहा

ग्रीन टी, आल्याचा चहा किंवा दालचिनीचा चहा मेटाबॉलिझ्म वाढवतो.  ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी करण्यासही मदत होते. दिवसाच्या सुरूवातीला  चहा, कॉफी घेण्यापेक्षा या प्रकारच्या ड्रिंक्सचा आहारात समावेश करू शकता. 

सकाळी की संध्याकाळी कधी चालल्याने वजन लवकर कमी होतं? बारीक होण्यासाठी तज्ज्ञ सांगतात....

5) दलिया

एक वाटी दलिया खाल्ल्याने बराचवेळ तुमचं पोट भरलेलं राहील. यातील हाय फायबर्समुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. यातील  कार्बोहायड्रेट्स वजन कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे पूर्ण दिवस शरीर एनर्जेटिक राहतात आणि तब्येतीला धोका उद्भवत नाही. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स