Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > 5 प्रकारच्या पौष्टिक पोळ्या; वजन कमी करताना पोळी बंद करायची नसेल तर हा पर्याय परफेक्ट 

5 प्रकारच्या पौष्टिक पोळ्या; वजन कमी करताना पोळी बंद करायची नसेल तर हा पर्याय परफेक्ट 

आहे त्या आहाराचा पुर्नविचार करुन, त्यात थोडे बदल केले तर वजन कमी होण्यास मदत होते. आपल्या रोजच्या पोळीमधे पाच प्रकारे बदल करता येतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 11:00 AM2021-09-29T11:00:00+5:302021-09-29T11:00:02+5:30

आहे त्या आहाराचा पुर्नविचार करुन, त्यात थोडे बदल केले तर वजन कमी होण्यास मदत होते. आपल्या रोजच्या पोळीमधे पाच प्रकारे बदल करता येतात.

5 types of nutritious Roti; This option is perfect if you want to loose weight | 5 प्रकारच्या पौष्टिक पोळ्या; वजन कमी करताना पोळी बंद करायची नसेल तर हा पर्याय परफेक्ट 

5 प्रकारच्या पौष्टिक पोळ्या; वजन कमी करताना पोळी बंद करायची नसेल तर हा पर्याय परफेक्ट 

Highlightsकोंड्याच्या पोळीमुळे शरीराचं पोषण होतं आणि वजन कमी होण्यास मदत करणारं फायबर मिळतं.पोळी ही चविष्ट आणि पौष्टिक करायची असल्यास गव्हाच्या पिठात एक मूठ बेसन घालावं. शरीरावर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी सोयाबीनची पोळी आहारात अवश्य असावी.

 वजन कमी करण्यासाठी आपण जो नेहेमी घेतो तो आहार एकदम बदलून वेगळं काही सुरु करण्याची आवश्यकता नसते. आहे त्या आहाराचा पुर्नविचार करुन, त्यात थोडे बदल केले तर वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करताना अनेकजण पोळी सोडतात. पण आहारतज्ज्ञ म्हणतात की वजन कमी करण्यासाठी पोळी किंवा भात सोडण्याची गरज नसते. उलट हेच पदार्थ वजन कमी करण्यासाठी कसे परिणामकारक ठरतील याचा विचार करायला हवा.

पोळी खाऊनही वजन कमी होतं. त्यासाठी पाच प्रकारच्या पोळ्या मदत करतात.

Image : Google

1. कोंड्याची पोळी

अनेकजण पोळी मऊ आणि पांढरी दिसावी म्हणून कणिक मळण्यआधी पीठ चाळून कोंडा काढून टाकतात. अशी पोळी वजन वाढीस कारणीभूत ठरते. कारण त्यातलं सगळं फायबरच निघून जातं. त्यामुळे आपण खातो त्या पोळीत कणकेपेक्षाही कोंडा जास्त असेल याची काळजी घ्यावी. कोंड्याच्या पोळीमुळे शरीराचं पोषण होतं. गव्हाच्या पिठात कबरेदकं, लोह, नियासिन, ब6 जीवनसत्त्व, थायमिन आणि कॅल्शिअम असतं. तर कोंड्यात फायबर असतं. कोंड्यातील हे फायबर पचनक्रिया सुधारतं आणि वजन कमी करण्यास मदत करतं.

 2. मल्टीग्रेन पोळी
 पोळी ही चविष्ट आणि पौष्टिक करायची असल्यास गव्हाच्या पिठात एक मूठ बेसन घालावं. बेसन पिठात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. अशी पोळी खाल्ल्यानं रक्तातील साखर लगेच वाढत नाही. तसेच कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे शरीरातील उष्मांक जास्त जळतात. गव्हाच्या पिठात बेसन मिसळून मल्टीग्रेन पोळी करता येते. ही पोळी वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते.

3. सत्तूची पोळी
 उन्हाळ्यात सातुचं पीठ गुळ घालून पितात. पण गव्हाच्या पिठात सत्तूचं पीठ घालून केलेली पोळी आरोग्यास लाभदायक ठरते. सातूयुक्त पोळी वजन नियंत्रित ठेवण्यासोबतच आपल्या शरीराला अँक्टिव्ह ठेवते.

Image : Google

4. सोयाबीन पोळी
शरीरावर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी सोयाबीनची पोळी आहारात अवश्य असावी. सोयाबीनमधे ओमेगा 3 हे फॅटी अँसिड असतं. शिवाय जीवनसत्त्व आणि खनिजांचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे गहू दळताना त्यात सोयाबीन घालून दळावेत. किंवा कणिक मळताना त्यात सोयाबीनचं पीठ मिसळून ती मळावी.

5. बार्लीची पोळी
बार्लीचं पीठ कणकेत मिसळून त्याची पोळी केल्यास ही पोळी पौष्टिक तर होतेच शिवाय ही पोळी खाल्ल्यानं पोट भरपूर वेळ भरल्यासारखं राहातं. बार्लीयुक्त पोळीत प्रथिनं आणि फायबर दोन्हींचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ही पोळी खाल्ल्यास वजन कमी होतं.

Web Title: 5 types of nutritious Roti; This option is perfect if you want to loose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.