Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > शरीर सडपातळ पण पोट खूप सुटलं? दिवसभरात होणाऱ्या ५ चुका टाळा; पोट होईल कमी

शरीर सडपातळ पण पोट खूप सुटलं? दिवसभरात होणाऱ्या ५ चुका टाळा; पोट होईल कमी

5 Mistakes That Are Slowing Your Weight Loss Journey : वजन कमी करण्यासाठी निरोगी खाण्यापिण्याच्या सवयींचे पालन करणे देखील खूप महत्वाचे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 08:35 AM2023-07-05T08:35:00+5:302023-07-05T15:27:34+5:30

5 Mistakes That Are Slowing Your Weight Loss Journey : वजन कमी करण्यासाठी निरोगी खाण्यापिण्याच्या सवयींचे पालन करणे देखील खूप महत्वाचे आहे.

5 Unhealthy eating habits that stop weight loss journey know simple tips | शरीर सडपातळ पण पोट खूप सुटलं? दिवसभरात होणाऱ्या ५ चुका टाळा; पोट होईल कमी

शरीर सडपातळ पण पोट खूप सुटलं? दिवसभरात होणाऱ्या ५ चुका टाळा; पोट होईल कमी

जगभरातील अनेकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे.  व्यायाम, डाएट करून लोक वजन कमी करण्यास यशस्वी होतात पण याचा परीणाम तात्पुरता असतो.  सगळं खायला सुरूवात केली आणि व्यायाम बंद केला की पुन्हा तसंच होतं. लाख प्रयत्न करूनही लोकाचं वजन कमी होत नाही. शरीरावर चरबी जमा होते. अशा स्थितीत तुमचा वजन कमी करण्याचा प्रयत्न फोल ठरू शकतो. कमी झालेलं वजन मेंटेन ठेवण्यासाठी कोणत्या चुका टाळायच्या ते समजून घेऊया. (5 unhealthy eating habits that stop weight loss journey know simple tips)

वजन कमी करण्यासाठी निरोगी खाण्यापिण्याच्या सवयींचे पालन करणे देखील खूप महत्वाचे आहे. वजन कमी करण्याच्या प्रवासात जंक फूडचे सेवन करू नये आणि अन्नाचे प्रमाण नियंत्रित करणे आवश्यक आहे. यादरम्यान, आहारात अधिक फळे आणि भाज्यांचा समावेश करावा, जेणेकरुन पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही हे. काही लोक वजन कमी करण्यासाठी जेवण सोडतात किंवा भात, साखर खाणं पूर्णपणे बंद करतात असं न करता योग्य पद्धत समजून घ्यायला हवी. जास्तीत जास्त लोक ५ चुका करतात. (5 Mistakes That Are Slowing Your Weight Loss Journey)

सकाळचा नाश्ता

मोठ्या संख्येने लोक वजन कमी करण्यासाठी न्याहारी सोडतात, पण ही सर्वात मोठी चूक आहे. सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हेल्दी ब्रेकफास्ट शरीराला दिवसभरासाठी आवश्यक पोषक आणि ऊर्जा देते. नाश्ता वगळल्याने वजन कमी करण्याच्या प्रवासावर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत लोकांनी न्याहारी कधीही सोडू नये.

जंक फूड  खाऊ नका

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक निरोगी आहार घेण्याऐवजी जंक फूड खातात. त्यामुळे त्यांचे वजन कमी होईल असे त्यांना वाटते, पण हा गैरसमज आहे. वजन कमी करण्यासाठी अधिकाधिक फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. जंक फूड पूर्णपणे टाळावे. जंक फूडमध्ये मीठ आणि साखर जास्त असते, त्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते. अशा परिस्थितीत जंक फूड पूर्णपणे टाळा.

जास्त लिक्वीड घेणं

वजन कमी करण्यासाठी काही लोक रोटी-भाज्यांसह घन पदार्थ खाणे बंद करतात आणि अधिकाधिक साखरयुक्त पेये खातात. त्यांना असे वाटते की द्रव आहार घेतल्यास वजन वेगाने कमी होऊ शकते, परंतु असे केल्याने आपण अधिक कॅलरी वापरता. या ज्यूस आणि पेयांमध्ये साखरेचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे अनेक आजारांचा धोकाही वाढतो.

एकाचवेळी जास्त खाणं

तीन ते चार वेळा खाण्यापेक्षा लोक एकाचवेळ जास्त खातात. असे करणे फायदेशीर नसते. यामुळे लोक आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी घेतात. याशिवाय मधेच स्नॅक्स खाल्ल्याने तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात अडचणी येऊ शकतात. म्हणूनच आहारतज्ज्ञांना भेटून बनवलेला डाएट चार्ट तुम्ही फॉलो करायला हवा. 

प्रोटीन्सयुक्त पदार्थ खाणं टाळू नका

प्रोटिन्समुळे मसल्स मजबूत होण्यास मदत होते. असं केल्यानं तुम्ही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वजन कमी करू शकाल. वजन कमी करण्यसाठी रोज २ ते ३ लिटर पाणी प्या.  चांगला आहार, चांगली लाईफस्टाईल आणि फिजिकली एक्टिव्ह राहून तुम्ही वाढलेलं वजन वेगानं कमी करू शकता. 

Web Title: 5 Unhealthy eating habits that stop weight loss journey know simple tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.