Join us  

पोट सुटले, टायर दिसतात ? ५ सोपे उपाय, पोट होईल कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2023 9:00 AM

5 easy ways to melt belly fat, as per Ayurveda : पोटावरची वाढलेली चरबी कमी करून पोट सपाट दिसण्यासाठी ५ सोपे उपाय...

वाढलेलं वजन कमी करणं म्हणजे बहुतांश लोकांसाठी ही मोठी समस्या असते. डाएट कोणतं फॉलो करावं, वर्कआऊट काय करावं असे असंख्य प्रश्न अनेकांच्या मनात असतात. मग अशावेळी आपण वजन कमी करण्यासाठी विविध मार्ग निवडतो. वजन कमी करत असताना एक समस्या सतत भेडसावते ती म्हणजे पोटावरची वाढलेली चरबी. पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागतो. दिवसेंदिवस पोटावरच्या वाढत्या चरबीमुळे मधुमेह, हृदयविकार, फॅटी लिव्हर अशा समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठीच पोटावरच्या वाढत्या चरबीकडे अजिबात दुर्लक्ष करु नये आणि ती कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.

वाढलेल पोट हे अनेक आजारांचे घर बनून जाते. सध्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्याच वयोगटातील व्यक्तींचे पोट चरबीमुळे अति फुगलेले दिसते. हे चरबी वाढलेलं पोट कमी करण्यासाठी आपल्यापैकी काहीजण अथक प्रयत्न करताना दिसून येतात. पोटावरील वाढलेली चरबी अशी सहजासहजी कमी होणे शक्य नसते. यासाठी योग्य आहार आणि व्यायाम याची उत्तम सांगड घालावी लागते. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. चैताली राठोड यांनी पोटावरची वाढती चरबी कमी करण्यासाठी आपल्या आहाराविषयी काही महत्वाच्या टिप्स इंस्टाग्राम व्हिडिओमार्फत शेअर केल्या आहेत. आपल्या रोजच्या जीवनशैलीत फक्त ५ सोप्या गोष्टी करून आपण वाढलेल्या पोटावरची चरबी झपाट्याने कमी करू शकता. या उपायांनी टायरसारखे दिसणारे पोट पूर्णपणे सपाट होण्यास मदत होईल(5 easy ways to melt belly fat, as per Ayurveda).

पोटावरची अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी सोपे ५ उपाय :- 

१. बडीशेप खावी :-  जेवल्यानंतर काही लोकांना बडीशेप खाण्याची सवय असते. या बडीशेपमध्ये आपण काळे - पांढरे तीळ, ओवा, जिरे असे घालून देखील खाऊ शकता. मुखवास म्हणून अशा प्रकारची बडीशेप खाल्ल्याने आपण जेवलेले अन्न पचनास मदत होते. बडीशेपमध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस चयापचयाच्या क्रियेत मदत करतात. त्यामुळे शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि नकळत वजनावर नियंत्रण येण्यास मदत होते. त्यामुळे पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ब़डीशेप आवर्जून खायला हवी. 

रोज मॉर्निंग वॉकला जाता पण वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी करा, वजन आणि होईल कमी...

२. दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करा :- पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन करावी. सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ होईल, बद्धकोष्ठता दूर होईल आणि पचनशक्ती वाढेल आणि पोट हलके होईल. लक्षात ठेवा की एक ग्लासपेक्षा जास्त कोमट पाणी पिऊ नका.

घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...

३. आहारात मूग डाळीचा समावेश करावा :- हिरवी मूग डाळ आहारात समाविष्ट करणे आरोग्यासाठी उत्तम आहे. हिरव्या मूग डाळीत प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. यामुळे हिरवी मूग डाळ ही खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असते. हिरवी मूग डाळ पौष्टिक असण्याबरोबरच ही पचायला देखील हलकी असते. त्यामुळे आपण जर वजन कमी करत असाल किंवा पोटावरची वाढलेली चरबी कमी करायची असल्यास आहारात नेहमी हिरव्या मूग डाळीचा समावेश करावा. 

४. हर्बल ग्रीन टी :- आपल्यापैकी बऱ्याचजणांना दिवसभरात सतत कोणत्याही वेळेस चहा - कॉफी पिण्याची सवय असते. परंतु हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चुकीचे आहे. चहा - कॉफी पिण्याऐवजी हर्बल ग्रीन टी पिण्याची सवय लावून घ्यावी. एक कप ग्रीन टीमधे मोठ्या प्रमाणावर कॅफिनचं प्रमाण आढळून आलं आहे. वजन घटवण्यासाठी ग्रीन टी चा विचार केला जातो तेव्हा प्रामुख्यानं एक बाब लक्षात ठेवायला हवी की ग्रीन टीचा वजन घटण्यावर थोडा परिणाम होतो. हा परिणाम वजन घटवण्याच्या आरोग्यदायी आहार, व्यायाम या इतर आरोग्यदायी पर्यांयापेक्षा तुलनेनं कमी आहे. रोज नियमित व्यायाम करणं, भरपूर भाज्या, फळं यांचा समावेश असलेला आहार घेणं ही वजन घटवण्याची प्रभावशाली पध्दत आहे. या पध्दतीला एक प्रकारचं सकारात्मक पोत्साहन ग्रीन टी देतं. म्हणून वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी घ्या असं म्हटलं जातं. 

एखाद्या दिवशी खा खा खाल्ले तर वजन वाढण्याची भीती वाटते ? ९ गोष्टी - खा आनंदात...

५. मैदा खाण्याचे टाळावे :-  पोटावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी मैदा खाणे संपूर्णपणे टाळावे. मैदा आणि मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाणे कायमचे बंद करावे. पोटावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मैदा न खाण्याचा सल्ला दिला जातो.

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा ‘उशीचे व्यायाम’! फिट होण्यासाठी पिलो एक्सरसाइजचा पाहा खास प्रयोग...

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स