Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात गोकर्णाचं निळंशार पाणी पिण्याचे ६ फायदे, बघा कसा करायचा गोकर्णाचा उपयाेग

आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात गोकर्णाचं निळंशार पाणी पिण्याचे ६ फायदे, बघा कसा करायचा गोकर्णाचा उपयाेग

Magical Health Benefits Of Drinking Gokarn Tea: बघा आयुर्वेदानुसार सांगण्यात आलेले गोकर्णाचे आरोग्यदायी फायदे आणि त्याचा वापर करण्याची योग्य पद्धत... (How to make gokarn tea or gokarn kadha?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2024 02:42 PM2024-07-15T14:42:57+5:302024-07-15T16:20:14+5:30

Magical Health Benefits Of Drinking Gokarn Tea: बघा आयुर्वेदानुसार सांगण्यात आलेले गोकर्णाचे आरोग्यदायी फायदे आणि त्याचा वापर करण्याची योग्य पद्धत... (How to make gokarn tea or gokarn kadha?)

6 amazing benefits of having gokarn kadha or aparajita water every day, magical health benefits of drinking gokarn tea as per ayurveda | आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात गोकर्णाचं निळंशार पाणी पिण्याचे ६ फायदे, बघा कसा करायचा गोकर्णाचा उपयाेग

आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात गोकर्णाचं निळंशार पाणी पिण्याचे ६ फायदे, बघा कसा करायचा गोकर्णाचा उपयाेग

Highlightsआयुर्वेदानुसार तर गोकर्णाच्या फुलाचे अनेक फायदे सांगण्यात आलेले आहेत. ते नेमके कोणते आणि गोकर्णाच्या फुलांचं सेवन आपण कशा पद्धतीने करू शकतो, ते पाहा...

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे आपल्या आजुबाजुला अनेक रोपं मोठ्या जोमाने वाढताना दिसत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे गोकर्णाचा वेल. यालाच काही ठिकाणी अपराजिता असं म्हणूनही ओळखलं जातं. विशेष काही मेहनत न घेता गोकर्णाचा वेल भराभर वाढत जातो. त्याला येणारी निळीशार फुलं बघताक्षणीच आपलं लक्ष वेधून घेतात. ही फुलं दिसायला जेवढी मोहक असतात, तेवढीच ती आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात (6 amazing benefits of having gokarn kadha or aparajita water every day). आयुर्वेदानुसार तर गोकर्णाच्या फुलाचे अनेक फायदे सांगण्यात आलेले आहेत. ते नेमके कोणते आणि गोकर्णाच्या फुलांचं सेवन आपण कशा पद्धतीने करू शकतो, ते पाहा...(magical health benefits of drinking gokarn tea as per ayurveda)

 

गोकर्णाचं निळं पाणी पिण्याचे ६ जबरदस्त फायदे

१. गोकर्णाचं पाणी दररोज नियमितपणे प्यायल्यास बुद्धीमत्ता वाढण्यास मदत होते.

२. एकाग्रता वाढण्यासाठी गोकर्णाचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं.

सलग १ महिना रोज १६ तास पेंटींग करून तयार झाला राधिका मर्चंटचा सुंदर लेहेंगा... बघा त्याचं सौंदर्य

३. गोकर्णाचा काढा नियमितपणे पिणे हा जॉईंट पेन किंवा संधीवातासाठी एक उत्तम आयुर्वेदिक उपाय मानला जातो.

४. दृष्टी कमकुवत झाली असेल तर गोकर्णाचा काढा दररोज नियमितपणे प्या. नजर वाढण्यास मदत होईल.

५. त्वचेच्या अनेक तक्रारी कमी करण्यासाठी गोकर्ण अतिशय उपयोगी आहे.

६. स्ट्रेस कमी करण्यासाठी देखील गाेकर्णाचा काढा उपयुक्त ठरतो. 

 

कसा तयार करायचा गाेकर्णाचा काढा?

गोकर्णाचा काढा किंवा गोकर्णाचं पाणी पिण्याचे फायदे तसेच तो काढा कसा तयार करायचा याविषयीची माहिती dr.manisha.mishra या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

बघा आलिया भटने नेसलेली चांदीचे काठ- सोन्याची बुटी असणारी १६० वर्षे जुनी 'आशावाली' साडी.. 

यामध्ये सांगण्यात आलेली पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी एका कपामध्ये गोकर्णाची ५ ते ६ ताजी फुलं घ्या. त्यामध्ये १ कप कडक पाणी टाका. हे पाणी वारंवार हलवा. काही मिनिटांनी गोकर्णाची फुलं त्यांचा रंग सोडतील आणि तो रंग पाण्याला येईल. जेव्हा पाणी निळसर रंगाचं होईल, तेव्हा गोकर्णाची फुलं त्या पाण्यातून काढून टाका आणि पाणी पिऊन घ्या.. 

 

Web Title: 6 amazing benefits of having gokarn kadha or aparajita water every day, magical health benefits of drinking gokarn tea as per ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.