Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > लग्नाची तारीख ठरली? फिटनेससाठी खाणं टाळता? ६ जबरदस्त टिप्स-लग्नात दिसाल फिट-सुडौल

लग्नाची तारीख ठरली? फिटनेससाठी खाणं टाळता? ६ जबरदस्त टिप्स-लग्नात दिसाल फिट-सुडौल

6 Easy Diet Tips for Every Bride-to-be : नको ते फंडे फॉलो करू नका; घरगुती टिप्स फॉलो करूनही वजन घटेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2024 06:11 PM2024-02-28T18:11:24+5:302024-02-28T18:13:28+5:30

6 Easy Diet Tips for Every Bride-to-be : नको ते फंडे फॉलो करू नका; घरगुती टिप्स फॉलो करूनही वजन घटेल..

6 Easy Diet Tips for Every Bride-to-be | लग्नाची तारीख ठरली? फिटनेससाठी खाणं टाळता? ६ जबरदस्त टिप्स-लग्नात दिसाल फिट-सुडौल

लग्नाची तारीख ठरली? फिटनेससाठी खाणं टाळता? ६ जबरदस्त टिप्स-लग्नात दिसाल फिट-सुडौल

काही दिवसात लग्नाचा (Wedding Days) सिझन सुरु होईल. महिलावर्ग तयारीला लागतील. लग्नाची लगबग सुरु असताना नववधूसह इतरही महिला आपल्या फिटनेसकडे बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात करतात. एक्सरसाईज, डाएट, यासह वजन कमी करण्याचे आपण इतरही फंडे अवलंबून पाहतो. पण बऱ्याचदा इतर फंडे अवलंबूनही वजन कमी होईलच असे नाही. नकळत घडणाऱ्या काही चुकांमुळे वजन कमी होत नाही (Weight Loss).

जर आपल्यालाही वजन कमी करण्यात अडचण निर्माण होत असेल तर, डायटीशियन अंजली मुखर्जी यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा (Fitness Tips). लग्नाच्या एक महिना आधी हे टिप्स फॉलो केल्याने वजन कमी करण्यास मदत होईल, शिवाय आरोग्यही सुदृढ राहील(6 Easy Diet Tips for Every Bride-to-be).

छोटे मिल्स खा

आपण दिवसात ५ ते ६ वेळा छोटे मिल्स खाऊ शकता. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होईल आणि तणावही कमी होईल. ज्यामुळे वजन कमी करण्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. शिवाय वॉटर वेटही योग्यरित्या मॅनेज होईल. आपण छोटया मिल्समध्ये हेल्दी पदार्थ खाऊ शकता. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील.

'५' गोष्टी करण्यापूर्वी पाणी प्याल तर राहाल कायम फिट; पण पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? कधी प्यावे?

२ ग्लास भाज्यांचा ज्यूस प्या

आपण भाज्यांचा रस पिऊनही वजन घटवू शकता. टोमॅटो, पालक, पुदिना, कोथिंबीर इत्यादी भाज्यांचे रस प्या. या भाज्या आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते.

४० ते ४५ ग्रॅम प्रथिने घ्या

जेव्हा आपल्या शरीरात प्रोटीनची कमतरता भासते, तेव्हा आपल्याला वारंवार भूक लागते. त्यामुळे आपल्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे आपल्याला लवकर भूक लागणार नाही, शिवाय पोट दीर्घकाळ भरलेले राहील.

कॅल्शियमयुक्त पदार्थ खा

कॅल्शियमयुक्त पदार्थ फक्त हाडांसाठी नसून, स्किनसाठी देखील फायदेशीर ठरते. बऱ्याचदा वजन कमी करताना थकल्यासारखे वाटते, शरीर कमजोर होते. अशावेळी आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.

जिम-डाएट करूनही वजन घटत नाही? मग कोमट पाण्यात मिसळा एक रस-मिळतील फायदेच फायदे

पाणी पीत राहा

शरीर हायड्रेट आणि स्किन कायम तुकतुकीत राहावी असे वाटत असेल तर, पाणी पीत राहा. काही दिवसात उन्हाळा सुरु होईल. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. जर आपल्याला ब्लोटींगचा त्रास असेल तर, आपण दिवसातून २ ते ३ लिटर पाणी पिऊ शकता.

रिफाइंड पदार्थांपासून दूर राहा

मैद्यापासून बनवलेले किंवा जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत. रुमाली रोटी, नान, नूडल्स इत्यादीमुळे पचनक्रियेत अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे ब्लोटींगची समस्या निर्माण होते. त्यामुळे फ्राईड आणि मैद्यापासून तयार पदार्थ खाणं टाळा.

Web Title: 6 Easy Diet Tips for Every Bride-to-be

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.