Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी केले की परत झटपट वाढते ? करा ६ गोष्टी, वजन परत वाढणारच नाही...

वजन कमी केले की परत झटपट वाढते ? करा ६ गोष्टी, वजन परत वाढणारच नाही...

Gaining Back the Weight You Lose ? Use These 6 Tips to Stop gaining back again : वजन कमी करण्यासोबतच कमी केलेलं वजन टिकवून ठेवणे देखील तितकेच गरजेचे असते, हा कठीण टास्क सोपा करण्यासाठीच्या टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2023 08:03 PM2023-10-23T20:03:32+5:302023-10-23T20:31:20+5:30

Gaining Back the Weight You Lose ? Use These 6 Tips to Stop gaining back again : वजन कमी करण्यासोबतच कमी केलेलं वजन टिकवून ठेवणे देखील तितकेच गरजेचे असते, हा कठीण टास्क सोपा करण्यासाठीच्या टिप्स...

6 Easy Ways to Stop Weight Gain Again, What to Do if You've Regained the Weight You Worked So Hard to Lose | वजन कमी केले की परत झटपट वाढते ? करा ६ गोष्टी, वजन परत वाढणारच नाही...

वजन कमी केले की परत झटपट वाढते ? करा ६ गोष्टी, वजन परत वाढणारच नाही...

वाढते वजन झटपट कमी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. वजन कमी करण्यासोबतच कमी केलेलं वजन टिकवून ठेवणे देखील तितकेच गरजेचे असते. कारण वेट लॉस करणाऱ्या व्यक्तीसाठी हा सर्वात मोठा टास्क असतो. वेगवेगळ्या प्रकारचे डाएट व एक्सरसाइज करून मोठ्या मेहनतीने आपण आपले वजन कमी तर करतो. परंतु हे कमी केलेले वजन कायम तसेच ठेवणे हे काहीजणांना फार कठीण वाटते. वाढलेले वजन एकवेळ कमी करता येऊ शकते, परंतु कमी केलेल्या वजनाचा आकडा कायम स्थिर ठेवणे थोडे अवघड असते(How Do I Maintain My Weight After Losing It?).

वाढलेले वजन कमी करणे आणि कमी केलेले वजन कायम नियंत्रणात ठेवणे फारसे ( 6 simple techniques to avoid weight regain) कठीण नाही. वजन कमी करणे हे बरेचजणांसाठी एक मोठे आव्हान असते. काही डाएट प्लॅनने आपले वजन नक्कीच कमी होते, पण नंतर हा डाएट (How to prevent weight regain) प्लॅन फॉलो न केल्याने पुन्हा वजन वाढते. यासोबतच इतरही अशी काही करणे आहेत ज्याने कमी केलेले वजन पुन्हा वाढते. काहीवेळा आपण अगदी काटेकोरपणाने डाएट (How can I stop gaining weight back?) व एक्सरसाइज फॉलो करून वजन (6 WAYS TO BOUNCE BACK FROM WEIGHT GAIN) कमी करतो. परंतु पुन्हा काही दिवसानंतर वजन आधी जेवढे होते त्याच स्थितीत येते. अशावेळी नेमके काय करावे हे समजत नाही. परंतु आपण काही सोप्या टिप्स फॉलो करून कमी केलेले वजन कायम नियंत्रणात ठेवू शकतो(What to do when you start gaining weight back).

कमी केलेले वजन कायम नियंत्रणात ठेवण्यासाठी टिप्स :- 

१. पौष्टिक अन्नपदार्थ खाण्याला प्राधान्य द्यावे :- अनेकदा आपण आपले वजन कमी करण्याचे ध्येय गाठल्यानंतर स्थिर होतो आणि पुन्हा अस्वास्थ्यकर अन्नपदार्थ  खाण्यास सुरुवात करतो. असे करणे टाळावे. अशावेळी खाण्यावरचा ताबा सोडून अवास्तव खाऊ नये. नेहमी संतुलित आहाराचा समावेश करावा ज्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, प्रोटिन्स, फळे यांचा आहारात समावेश केला जाईल. असे केल्याने आपले वजन व्यवस्थित नियंत्रणात राहते.

२. पॅकेज फूड टाळा :- जास्त साखर, फॅट्स आणि कार्ब्स असलेले पदार्थ खाणे टाळा, जसे की जंक फूड, फास्ट फूड, साखरयुक्त पेये आणि प्रक्रिया केलेले स्नॅक्स.   

उपवास करुन वजन कमी करायचं मग खा भरपूर शिंगाडा, शिंगाड्याची फळं म्हणजे तर तब्येतीसाठी वरदान...

३. एक्सरसाइज करणे सोडू नका :-  एकदा का आपले वजन कमी झाले की बहुतेक लोक एक्सरसाइज करणे सोडून देतात, हे टाळले पाहिजे. आपल्या डेली रुटीनमध्ये नियमित एक्सरसाइजचा समावेश करावा. रोज एक्सरसाइज केल्याने कॅलरीज बर्न करण्यास मदत होते आणि पचनक्रियेचा वेग देखील वाढतो.  आपल्याला खूप तीव्र व्यायाम करण्याची आवश्यकता नाही. आपण मध्यम प्रकारचा एक्सरसाइज देखील आपल्या रोजच्या रुटीनचा एक भाग बनवू शकता. 

४. नेहमी हायड्रेटेड रहा :- दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्या. अनेकवेळा आपल्याला भूक लागते कारण आपले शरीर डिहायड्रेटेड होते. परंतु लोक अनेकदा भूक समजून अन्न खातात आणि वजन वाढवतात. जेव्हा तुम्ही हायड्रेटेड राहाल, तेव्हा तुमचे पोट भरलेले राहील आणि तुम्ही जास्त खाणे टाळाल. तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटण्यासाठी भरपूर पाणी प्या. साखरयुक्त पेय टाळा, जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात.

कितीही प्रयत्न केला तरी वजन कमीच होत नाही? पाहा हमखास करताय या ३ चुका...

५. पुरेशी झोप घ्या :-  दररोज ७ ते ८ तासांची योग्य झोप घ्या. नीट झोप न मिळाल्याने भुकेच्या हार्मोनला त्रास होतो आणि त्यामुळेही आपले वजन वाढू शकते. झोपेच्या कमतरतेमुळे आपली पचन क्रिया विस्कळीत होऊ शकते आणि वजन कमी करणे कठीण होऊ शकते.

६. तणावापासून दूर राहा :- ध्यान, योग किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम यासारखे तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी निरोगी मार्ग शोधा. तणावामुळे वजन वाढू शकते.

वजन कमी करता करता केसांना गळती लागली ? ५ सोप्या टिप्स, केस गळणं बंद...

हळुहळु वजन कमी करणे हा दीर्घकाळ वजन नियंत्रणात ठेवण्याचा एक सोपा व योग्य मार्ग आहे. एका वर्षाच्या कालावधीत ५ ते १० % वजन कमी करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. म्हणून, जर तुमचे वजन ७० किलो असेल, तर तुम्ही एका वर्षाच्या कालावधीत केवळ ३.५ किलो ते ७ किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशाप्रकारे, तुमचे वजन कमी होईल आणि तुम्ही तुमचा आहार सोडल्यानंतरही ते सहजासहजी परत वाढणार नाही.

Web Title: 6 Easy Ways to Stop Weight Gain Again, What to Do if You've Regained the Weight You Worked So Hard to Lose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.