Join us  

वयाच्या ६८ व्या वर्षी बोनी कपूर यांनी घटवलं १४ किलो वजन; वजन कमी करण्याची खास टेक्निक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 8:06 PM

Boney Kapoor Sheds 14 Kilos Tips To Reduce Weight : जास्त वयात वजन कमी करणं  कठीण असतं कारण तेव्हा मेटाबॉलिझ्म प्रक्रिया मंदत होते.

बॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्म मेकर बोनी कपूर अलिकडे बरचे चर्चेत आहेत. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी  तब्बल १४ किलो वजन कमी केलं आहे. १४ किलो वजन कमी करून ते सगळ्यांसाठीच एक उत्तम उदाहरण बनले आहेत. त्यांनी आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. (Boney Kapoor Sheds 14 Kilos Tips To Reduce Weight) ज्यात त्यांनी बॉडी ट्रांसफॉर्मेशनबद्दल सांगितले आहे. बोनी इतकं वजन कमी करूनसुद्धा थांबलेले नाहीत. त्यांना ८ किलो वजन अजून कमी करायचं आहे. फोटोजमध्ये ते खूपच फिट आणि निरोगी दिसत आहेत.श्री देवी त्यांचे इन्पिरेशन असल्याचे सांगितले. ( 68 Year Old Boney Kapoor Sheds 14 Kilos Tips To Reduce Weight In Old Age)

बोनी यांनी आपल्या पोस्टमध्ये श्री देवी यांची आठवण काढत लिहिले की, 'हे सर्व मेरी जान  म्हणजेच श्री देवीमुळे संभव झाले आहे.'  पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की आता माझे  केससुद्धा लांब आणि दाट होत चालले आहेत. त्यांचे हे ट्रांसफॉर्मेशन पाहून फॅन्ससुद्धा हैराण झाले आहेत. 

जास्त वयात वजन कसे कमी करावे (Weight Loss Tips) 

वजन कमी करण्यासाठी  शारीरिक हालचाली कमी करतात. ज्यामुळे वजन वाढू लागतं. म्हणून व्यायाम आणि ब्रिस्क वॉक करा. जास्त वयात वजन कमी करण्यासाटी तुम्ही आहारात पोषक तत्व प्रोटीन्स, फायबर्सयुक्त पदार्थांचा समावेश करा. जास्त साखर खाणं टाळा. ताण-तणाव कमी करून जंक आणि प्रोसेस्ड फूड खाणं टाळा. जास्त वयात वजन कमी करण्यासाठी स्वत:ला हायड्रेट ठेवा. जेवणाच्या  वेळा पाळा, आहारात असलेली अनियमितता गंभीर आाजारांचे कारण ठरू शकते. 

शिळं खाल्लं की तब्येत बिघडेल असं वाटतं? शिळी चपाती खाण्याचे ५ भन्नाट फायदे; निरोगी राहाल

जास्त वयात वजन कमी करणं  कठीण असतं कारण तेव्हा मेटाबॉलिझ्म प्रक्रिया मंदत होते. याशिवाय शरीराल जास्तीतजास्त कॅलरीजची आवश्यकता असते. वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहहे. याव्यतिरिक्त एरोबिक्स, ब्रिस्क वॉकिंग, चेअर स्क्वॅट्स, पुशअप्स, सायलकिंग, जपिंग यासोबतच प्राणायम करायला हवेत. आपली जीवनशैली सुधारायला हवी. वजन कमी  करण्यासाठी एक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवा.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य