लहान मुलं वरचं खायला लागले की आधी डॉक्टर त्यांना डाळीचं पाणी, वरणाचं पाणी देण्यास सांगतात. आज हाच उपाय आहार तज्ज्ञ मोठ्यांनाही सांगतात. मोठ्यांनी आपल्या आहारात रोज मूग डाळीच्या पाण्याचा समावेश केल्यास वजन कमी होण्यासोबतच आरोग्याचे अनेक प्रश्न सुटतात.
Image: Google
सर्व डाळींमधे मुगाची डाळ ही अधिक पौष्टिक आणि आरोग्यास फायदेशीर असते. त्यामुळेच मुगाच्या डाळीला डाळींमधली राणी म्हटलं जातं. रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम मुगाची डाळ करते. मुगाच्या डळीत प्रथिनं, कबरेदकं आणि फॉस्फरस हे घटक असतात. त्यामुळेच मुगाची डाळ खाणं महत्त्वाचं मानलं जातं. पण मुगाची डाळच नाही तर मुगाच्या डाळीचं पाणी हे देखील आरोग्यास फायदेशीर असून वजन कमी करण्यात मदत करणारा परिणामकारक उपाय आहे.
Image: Google
मुगाच्या डाळीचं पाणी का प्यावं?
1. रोज मुगाच्या डाळीचं पाणी पिल्यास शरीरात जमा झालेले अशुध्द आणि विषारी घटक बाहेर पडतात. शरीर डिटॉक्स करायला मुगाच्या डाळीच्या पाण्याचा उपयोग होतो.
2. मुगाच्या डाळीचं पाणी पिल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते. तसेच शरीरातील पारा, शीशे यासारखे जड धातू बाहेर पडतात.
3. मुगाच्या डाळीच्या पाण्यातून शरीराला कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम मिळतं. तसेच क जीवनसत्त्वं, कबरेदकं आणि प्रथिनंही असतात.
4. मुगाच्या डाळीचं गरम पाणी थोडं साजूक तूप घालून पिल्यास चव तर छान लागतेच शिवाय शरीराचं पोषणही होतं.
Image: Google
5. मूग डाळीचं पाणी शरीराचं तापमान नियंत्रित करतं. शिवाय ऊन लागल्यानं जाणवणारी अस्वस्थता मुगाच्या डाळीचं पाणी पिल्याने जाते. शरीरातला गळवाटा जाऊन ऊर्जा मिळते.
6. वाढलेलं वजन कमी करण्याचा पौष्टिक आणि आरोग्यदायी पर्याय म्हणजे मुगाच्या डाळीचं वाटीभर गरम पाणी रोज प्यावं. या उपायानं शरीरात कमी उष्मांक जातात आणि तरीही पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. वाटीभर मुग डाळीचं पाणी पिल्यास शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळते.
7. सकाळ संध्याकाळ मुगाच्या डाळीचं एक वाटी पाणी पिणं लाभदायक असतं. मूग डाळीचं पाणी पचण्यास हलक असतं. पोटाच्या आणि मेंदुच्या आरोग्यासाठी हे पाणी रोज पिणं उत्तम मानलं जातं.
Image: Google
मुगाच्या डाळीचं पाणी कसं करावं?
मुगाची डाळ धुवून त्यात पाणी घालावं. ही डाळ थोडं मीठ आणि हळद टाकून कुकरमधे शिजवून घ्यावी. कुकर उघडला की डाळीचं पाणी थोड्या डाळीसह बाजूला काढावी. या पाण्यात थोडं साजूक तूप घालावं आणि ते गरम गरम प्यावं.