सकाळच्या सुरूवातीला नाश्त्याला प्रोटीन्सनी परीपूर्ण पदार्थांचा समावेश करायला हवा. प्रोटीनमुळे वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते (Foods For Weight Loss) मसल्स बिल्ड होण्यासाठी प्रोटीन्सचं सेवन फायदेशीर ठरते. प्रोटीन्सयुक्त पदार्थांचे सेवन तुम्ही नाश्त्यालाही करू शकता. नाश्त्याला हे पदार्थ खाल्ल्यानं वजन कमी होण्यापासून पचनक्रिया चांगली होण्यापर्यंत बरेच फायदे मिळतात. (7 foods are perfect for breakfast)
प्रोटीन्सयुक्त नाश्त्याचे पर्याय
1) व्हेजिटेबल उपमा
रवा, भाज्या आणि डाळी घालून तयार केलेला व्हेजिटेबल उपमा सकाळच्या नाश्त्याला तुम्ही खाऊ शकता. यातून भरपूर प्रोटीन मिळते. हा उपमा तुम्ही १ कप चहासोबत खाऊ शकता.
2) मूग डाळ चिला
मूग डाळ आणि बेसनापासून बनवलेला प्रोटीनयुक्त चिला खाऊन तुमचं पोट बराचवेळ भरलेलं राहील. हा चिला बनवायला अगदी सोपा असतो, खायला चविष्ट लागतो. हे बॅटर तुम्ही रात्रीच तयार करून ठेवू शकता. सकाळी काही मिनिटांत चिला बनून तयार होईल.
3) पनीर पराठा
नाश्त्याला पनीरचा पराठा खाणं एक कमालीचा पर्याय आहे. पनीरचा पराठा तुम्ही चटणी किंवा एक वाटी दह्यासोबत खाऊ शकता. तेलाऐवजी तुपाचा वापर करून तुम्ही हा पराठा खाऊ शकता.
घरात रात्री बारीक झुरळं खूप होतात? १ सोपा उपाय करा, कानाकोपऱ्यात लपलेली झुरळं नष्ट होतील
4) चना चाट
चना चाट बनवून तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता. चना चाट खाल्ल्यानं वजन कमी करण्यास मदत होते. हा एक उत्तम पर्याय आहे. चना चाट बनवण्यासाठी उकळलेले चणे, छोले, भाज्या, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा. लिंबाचा रस आणि चाट मसाला घालून खा.
5) पनीर बुर्जी
पराठ्यासोबत तुम्ही पनीरची बुर्जी खाऊ शकता. पनीरच्या बुर्जीत बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घाला. कमीत कमी तेलात शिजवून ते खा. पनीरची बुर्जी खाल्ल्यानं शरीराला अमिनो एसिड्स मिळतात.
शुगर सतत वाढते? नाश्त्याला हा खास डोसा खा, कंट्रोलमध्ये राहील शुगर-डायबिटीसचा धोका टळेल
6) मूगाची भजी
भिजवलेली मूग डाळ दळून तुम्ही त्याची भजी बनवू शकता. ही भजी खायला एकदम चांगली लागते. मूगाची भजी खाल्ल्यानं बराचवेळ पोट भरलेलं राहतं आणि वजनही फार वाढत नाही. तुम्ही कमीत कमी तेलात मूग भजी फ्राय करू शकता.
७) काळ्या चण्यांची उसळ
सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही काळ्या चण्यांची उसळ खाऊ शकता. ही भाजी खाल्ल्यानं शरीर निरोगी राहील आणि तुम्हाला ताजंतवानं वाटेल. याशिवाय शरीराला आयर्न, प्रोटीन यांसारखे महत्वाचे घटक मिळतील.