Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ८ कारणांमुळे व्यायाम- डाएटींग करूनही वजन कमी होत नाही; पाहा तुमच्याही बाबतीत हेच होतंय का

८ कारणांमुळे व्यायाम- डाएटींग करूनही वजन कमी होत नाही; पाहा तुमच्याही बाबतीत हेच होतंय का

How To Control Weight: व्यायाम करूनही, योग्य आहार घेऊनही वजन का वाढत असावं बरं? (Weight Loss Tips) बघा आहारतज्ज्ञांनी सांगितलेली त्यामागची महत्त्वाची कारणं...(8 reasons of weight gain instead of dieting and exercise)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 12:21 IST2024-12-16T12:20:15+5:302024-12-16T12:21:09+5:30

How To Control Weight: व्यायाम करूनही, योग्य आहार घेऊनही वजन का वाढत असावं बरं? (Weight Loss Tips) बघा आहारतज्ज्ञांनी सांगितलेली त्यामागची महत्त्वाची कारणं...(8 reasons of weight gain instead of dieting and exercise)

8 reasons of weight gain instead of dieting and exercise, major reasons for constant weight gain | ८ कारणांमुळे व्यायाम- डाएटींग करूनही वजन कमी होत नाही; पाहा तुमच्याही बाबतीत हेच होतंय का

८ कारणांमुळे व्यायाम- डाएटींग करूनही वजन कमी होत नाही; पाहा तुमच्याही बाबतीत हेच होतंय का

Highlightsवजन काही केल्या कमी होत नाही. असं का होत असावं यामागची आहारतज्ज्ञांनी दिलेली ही काही कारणं पाहा...

आहे ते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच वाढणारे वजन कमी करण्यासाठी अनेक जण नियमितपणे व्यायाम करतात (Weight Loss Tips). शिवाय आहारावरही त्यांचा बराचसा कंट्रोल असतो. मोजूनमापून खातात. किंवा कुठला ना कुठला डाएट प्लान फॉलो कटाक्षाने पाळतात. पण तरीही त्यांच्या वजनामध्ये मात्र म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही (major reasons for constant weight gain). वजन काही केल्या कमी होत नाही. असं का होत असावं यामागची आहारतज्ज्ञांनी दिलेली ही काही कारणं पाहा...(8 reasons of weight gain instead of dieting and exercise)


डाएट आणि व्यायाम करूनही वजन का कमी होत नाही?

याविषयी माहिती सांगणारी एक पोस्ट आहारतज्ज्ञ क्षितिजा यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. वजन वाढीसाठी त्यांनी सांगितलेली १० कारणं पुढील प्रमाणे..

तरुणाईमध्ये वाढते आहे 'या' कॅन्सरचे प्रमाण! कॅन्सरचा हा कोणता प्रकार, कशी ओळखायची लक्षणं?

१. रात्रीच्या जेवणात कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ जास्तीतजास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे वजन लवकर वाढते. 

२. जर तुम्ही खूप जास्त ताण घेत असाल, सतत कोणत्या ना कोणत्या तणावाखाली असाल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरातल्या हार्मोन्सवर होतो. हार्मोन्सचे संतुलन बिघडले की वजन वाढते. 

३. योग्य प्रमाणात व्यायाम केल्याने शरीराला फायदा होतो. पण वजन कमी करण्याच्या नादात अनेकजण गरजेपेक्षा जास्त व्यायाम करतात. त्यामुळेही वजन वाढते. 

 

४. रोज रात्री खूप उशिरा जेवण करत असाल आणि त्यानंतर लगेच झोपत असाल तरीही वजन वाढते. 

५. बऱ्याच महिलांच्या बाबतीत मासिक पाळीच्या काळात हार्मोन्सच्या बिघडणाऱ्या संतुलनाचा परिणामही वजन वाढीवर होऊ शकतो. 

करिना कपूर म्हणते डाएटच्या नादात लोकं जगणं विसरून गेले, मला आता डाएटिंग शक्य नाही कारण.... 

६. पुरेशी झोप न घेणे हे देखील वजनवाढीचे एक कारण आहे. 

७. पोट साफ न होणे, पचनक्रिया व्यवस्थित न होणे यामुळेही वजन वाढू शकते. 

८. सोडीयमयुक्त पदार्थ आहारात गरजेपेक्षा जास्त असतील तर त्यामुळेही वजन वाढण्याचा त्रास होऊ शकतो. 


 

Web Title: 8 reasons of weight gain instead of dieting and exercise, major reasons for constant weight gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.