आजकाल वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाएट ट्रेंड फॉलो करतात. (Weight Loss Tips) काहीजण इंटरमिटेंट फास्टिंगही करतात तर काहीजण फक्त ७५ दिवसांचे चॅलेंन्ज फॉलो करतात. या दोन्ही गोष्टी वेट लॉससाठी परिणामकारक ठरू शकतात. (What's The 80-20 Rules Diet And Does It Work) या लेखाच्या माध्यमातून वजन कमी करण्याचा सोपा उपाय पाहूया. ८०-२० चा फॉर्म्यूला सुटलेली चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. डाएट क्लिनिकच्या आहारातज्ज्ञ शिवाली गुप्ता यांनी ओन्ली इंस्टाग्रामवर बोलताना याबद्दल सविस्तर सांगितले आहे.(How to Use the 80/20 Rule for Weight Loss)
काय आहे ८० -२० चा फॉर्म्यूला? (What's The 80-20 Rules Diet)
युएस डिपार्टमेंटच्या रिपोर्टनुसार भाज्या, होल ग्रेन, डेअरी उत्पादनांचा आहारात समावेश करा.
शिवाली यांच्यामते ८०-२० चा वेट लॉस फॉर्म्यूला एक प्रकारचा वेट लॉस फॉर्म्यूला आहे. वजन कमी करण्यासाठी हा फॉर्म्यूला फॉलो केला जातो. (ref)या अंतर्गत डाएटमध्ये ८० टक्के हेल्दी फूड्सचा समावेश करावा लागतो. तर २० टक्के इतर आहार घ्यावा लागतो.
रात्रीचं जेवण सोडल्यानं वजन कमी होतं? जेवणात १ छोटा बदल करा, कितीही खा-स्लिम राहाल
वजन कमी करण्यासाठी ही सर्वात हेल्दी पद्धत आहे. ८०-२० चे डाएट विंकेड डाएटच्या नावानेही ओळखले जाते. या डाएटमध्ये २० टक्के गोष्टी तुम्ही तुमच्या मनाने निवडाव्या लागतात तर ८० टक्के गोष्टी तुम्हाला नियमानुसार कराव्या लागतात.
आहारतज्ज्ञांच्यामते ८० ते २० च्या रूलमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याशी संबंधित कोणत्याच गोष्टींचे बंधन नसते. पण यात तुम्ही हेल्दी फुड्सचा समावेश करू शकता. रोजच्या आहारात सूप, सॅलेड अशा पदार्थांचा समावेश करा. याऐवजी तुम्ही चपाती, भाजी, भात या पदार्थांचाही आहारात समावेश करू शकता. आहारात २० टक्के आपल्या आवडत्या वस्तू ठेवा. वेट लॉस जर्नीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. आहारात तुम्ही फळं, भाज्या, ड्रायफ्रुट्सस, राजमा, डाळी यांचे सेवन करू शकता.
रात्रीचं जेवण सोडल्यानं वजन कमी होतं? जेवणात १ छोटा बदल करा, कितीही खा-स्लिम राहाल
८०-२० च्या नियमात काय खायला हवं?
या नियमांत अधिकाधिक फळं आणि भाज्यांचा समावेश असावा. अन्नातून तुम्हाला योग्य प्रमाणात पोषक तत्व मिळतील याची काळजी घ्या. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म चांगला राहतो आणि वजनही कमी जास्त होत नाही. यात फायबर्ससचे प्रमाण चांगले असते. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं आणि भूकेची जाणिव होत नाही.