Join us  

एखाद्या दिवशी खा खा खाल्ले तर वजन वाढण्याची भीती वाटते ? ९ गोष्टी - खा आनंदात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2023 9:06 PM

9 TIPS TO RECOVER FROM A CHEAT DAY : वजन कमी करण्यासाठी, लोक बऱ्याच काळापासून हेल्दी डाएट फॉलो करतात, परंतु काही वेळा चीट मिलमुळे सर्व डाएटिंग बिघडते. अशा परिस्थितीत चीट मिलनंतर तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता.

आजकाल आपण सगळेच आपल्या आरोग्याच्या बाबतीत फिट राहण्यासाठी जिमिंग आणि डाएटकडे आवर्जून लक्ष देतो. सध्याच्या काळात वाढते वजन ही एक मोठी समस्या झाली आहे. हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण अनेक नानाविविध उपाय करून बघतो. या उपायांपैकी डाएट हा एक सर्वसामान्य व सगळेच करणारा उपाय मानला जातो. आपण डाएट सुरु केल्यानंतर रोज काटेकोरपणे डाएट पाळतोच. परंतु संपूर्ण आठवडाभर डाएट पाळल्यानंतर एखाद दिवस असा येतो की आपल्याला डाएट मोडून आपल्या आवडीचे पदार्थ खाण्याची इच्छा होतेच. अशावेळी संपूर्ण डाएट मोडू नये परंतु आपल्याला आपला आवडीचा पदार्थ देखील तितक्याच आवडीने खाता यावा यासाठी 'चीट डे' या संकल्पनेचा उदय झाला. 

'चीट डे' या संकल्पनेत आपण आपल्या डाएटच्या संपूर्ण आठवडाभरातील एक दिवस 'चीट डे' म्हणून धरू शकतो. या दिवशी आपण आपले डाएट मोडून आपल्याला हवे ते आपल्या आवडीचे पदार्थ खाऊ शकतो. परंतु काहीजण 'चीट डे' च्या दिवशी आपल्या आवडीचे भरपूर पदार्थ खातात यामुळे आपले वजन तर वाढणार नाही ना ? किंवा आठवडाभर जे डाएट फॉलो केले त्यावर पाणी तर फेरले जाणार नाही ना? अशी शंका मनात निर्माण होते. अशावेळी आपण नेमकं काय करावे हे सुचत नाही? 'चीट डे' केल्यानंतर आपले वजन वाढू नये किंवा डाएट रुटीन पुन्हा फॉलो करण्यासाठीच्या काही महत्वाच्या टिप्स. डायटीशियन राधिका गोयल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. नक्की काय आहेत त्या टिप्स पाहूयात(9 simple ways in which you can balance your cheat meals and not feel guilty).

'चीट डे' नंतर वजन वाढू नये म्हणून नेमकं काय करता येऊ शकत ? 

१. 'चीट डे' नंतर आपले संपूर्ण शरीर डिटॉक्स करण्यावर जास्त भर द्यावा. 

२. चीट मिल नंतर आपण डाएटला पुन्हा सुरुवात केल्यानंतर आपल्या जेवणातील मीठ संपूर्णपणे वगळावे. 

३. चीट मिल नंतर आपण जे काही खाणार असाल त्यातून साखर संपूर्णपणे वगळावी. 

रोज किती चमचे साखर खाणं योग्य? साखर खाणं पूर्णच बंद करुन टाकलं तर तब्येत सुधारते, तज्ज्ञ सांगतात...

दिवसभर उपाशी राहून रात्री 'ओव्हरइटिंग' करताय, खूप जास्त खाताय? ६ टिप्स, जीवावर बेतणारी सवय सोडा...

४. चीट मिल खाल्ल्यानंतर किमान २० ते ३० मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. 

५. चीट मिल खाण्यापूर्वी, भरपूर फायबरयुक्त आहार घेणे आवश्यक असते. फायबरयुक्त आहार घेतल्याने आपले पोट अधिक काळासाठी भरलेले रहाते त्यामुळे आपल्याला जास्त भूक लागत नाही तसेच पोट भरलेले असल्यामुळे आपण ओव्हरइटिंग करत नाही. 

६. चीट मिल नंतर एका तासाने भरपूर पाणी प्या. हे आपल्या शरीरातून सोडियम, साखर आणि इतर विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते. 

कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

७. जर आपण चीट मिल घेणार असाल तर दुपारच्या जेवणासाठी किंवा न्याहारीसाठी चीट मिल घ्यावे. रात्रीच्या जेवणात चीट मील घेऊ नये. रात्रीच्या वेळी अन्न  पचन अधिक कठीण होते. तसेच यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.

८. चीट मिल खाण्यासाठी संपूर्ण एक दिवस ठरवण्यापेक्षा एका वेळच्या जेवणाची वेळ ठरवावी. जेणेकरून एक दिवस संपूर्ण आवडीचे पदार्थ खाण्यापेक्षा एका वेळचे खाल्लेले केव्हाही उत्तम ठरेल.

९. जर आपण सतत योग्य आहार घेत असाल, तर एक वेळच्या चीट मिल्ने तुमच्या वजनात विशेष फरक पडणार नाही. त्यामुळे 'चीट डे' केल्यावर तणाव घेऊ नका आणि मनात अपराधीपणा वाटून घेऊ नका.

टॅग्स :वेट लॉस टिप्स