Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > उपवास आणि पोषणाचे फायदे एकत्रच देणारा एक जादूई पदार्थ! राजगिरा खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

उपवास आणि पोषणाचे फायदे एकत्रच देणारा एक जादूई पदार्थ! राजगिरा खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

Why To Eat Rajgira/Amaranth On Fast: उपवासाच्या पदार्थातूनही पोषण मिळू शकते... पण त्यासाठी तुमच्या उपवासाच्या डाएटमध्ये हा एक पदार्थ आवर्जून सहभागी करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2022 05:50 PM2022-10-04T17:50:06+5:302022-10-04T17:50:42+5:30

Why To Eat Rajgira/Amaranth On Fast: उपवासाच्या पदार्थातूनही पोषण मिळू शकते... पण त्यासाठी तुमच्या उपवासाच्या डाएटमध्ये हा एक पदार्थ आवर्जून सहभागी करा.

A magical food that combines the benefits of fasting and nutrition! 5 Amazing Benefits of Eating Amaranth | उपवास आणि पोषणाचे फायदे एकत्रच देणारा एक जादूई पदार्थ! राजगिरा खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

उपवास आणि पोषणाचे फायदे एकत्रच देणारा एक जादूई पदार्थ! राजगिरा खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

Highlights उपवासाचा त्रास होऊ नये, शिवाय उपवासाच्या पदार्थातून भरपूर पोषण मिळून त्याचा तब्येतीला फायदाच व्हावा, या उद्देशाने उपवासाच्या दिवशी राजगिरा अवश्य खा.

मंजिरी कुलकर्णी, आहारतज्ज्ञ
नवरात्र, श्रावणी सोमवार, आठवड्याचे उपवास, चतुर्थी, एकादशी असे वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच उपवास केले जातात. अर्थातच उपवास करणाऱ्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण अधिकच असते. एरवीही अनेक जणी त्यांच्या आहाराकडे दुर्लक्ष करतात. मग त्यात जेव्हा उपवास (fast) असतो, तेव्हा तर विचारायलाच नको. मग अशक्तपणा, उष्णता वाढणे, ॲसिडिटी असा त्रास होतो. म्हणूनच उपवासाचा त्रास होऊ नये, शिवाय उपवासाच्या पदार्थातून भरपूर पोषण (Benefits of eating Rajgira) मिळून त्याचा तब्येतीला फायदाच व्हावा, या उद्देशाने उपवासाच्या दिवशी राजगिरा अवश्य खा.

 

उपवास म्हटलं की सगळ्यांना आठवतो तो साबुदाणा आणि बटाटा. कित्येक जण अगदी साबुदाणा खिचडी खायला मिळेल म्हणून उपवास करतात.

डोक्यावर मातीचा कलश घेऊन सायकल चालवत करतेय डौलदार डान्स, बघा तरुणीचा व्हायरल व्हिडिओ

साबुदाणा शरीराला किती घातक आहे हे एव्हाना सर्वांनाच माहिती आहे. तरीही साबुदाणा खिचडीचा मोह सुटत नाही. पण उपवास आणि पोषण या दोन्ही गोष्टी एकत्र साधता आलं तर कधीही उत्तम. आणि ते राजगिऱ्याच्या माध्यमातून शक्य आहे. राजगिऱ्यामध्ये भरपूर पोषणमुल्ये असतात. म्हणूनच उपवासाच्या दिवशी राजगिरा का खावा, त्यामागची ही काही कारणं..

 

राजगिरा खाण्याचे ५ फायदे 
१. राजगिरा हळू- हळू पचतो. त्यामुळे भूक लागत नाही.

गल्लीतल्या मॅचमध्ये ‘तो’ करतोय संस्कृतमध्ये क्रिकेट कॉमेण्ट्री! अशी कॉमेण्ट्री तुम्ही कधी ऐकली-पाहिलीच नसेल..

२. त्यामुळे आपोआपच वजन कमी होण्यास मदत होते.

३. संधिवात, सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी राजगिरा लाभदायी ठरतो.

४. राजगिऱ्यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात.

५. फायबर, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हृदय आणि पचनक्रिया यासाठी राजगिरा फायदेशीर ठरतो.

 

हे पण लक्षात ठेवा
१. राजगिरा हा भाकरी किंवा उपम्याचा स्वरुपात खाऊ शकता.

२. मुळव्याधीचा त्रास असणार्‍यांनी राजगिरा खाऊ नये.

३. किडनी स्टोन, पित्ताशयातील खडे असा त्रास असेल तरीही राजगिरा खाणे टाळावे.  

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत. Themindfuldiet इथे त्यांच्याशी 9518538993 या क्रमांकावर संपर्क करता येईल.)

 

Web Title: A magical food that combines the benefits of fasting and nutrition! 5 Amazing Benefits of Eating Amaranth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.