Join us  

जेवण करताना पाणी प्यावं की नाही? काय नेमकं खरं- आरोग्यावर काय होतात परिणाम? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2022 4:26 PM

Drinking Water Along With Meal: जेवण करताना मध्ये- मध्ये पाणी पिण्याची सवय अनेकांना असते. ही सवय चांगली की वाईट? बघा तज्ज्ञ काय सांगतात. 

ठळक मुद्देलहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेक जणांना जेवताना मध्ये- मध्ये पाणी  पिण्याची सवय असतेच. पण ही सवय चुकीची की बरोबर, तेच नेमकं कळत नाही..

जेवताना काही जणांना पाण्याचा पेला नेहमी बाजूला भरून ठेवलेला पाहिजेत असतो. काही जणं तर जेवढं जेवतात, तेवढंच जेवताना पाणीही संपवतात. काही जणांना तर पहिला घास घेतला की लगेच पाणी पाहिजे असतं. जी लहान मुलं जेवताना सारखं पाणी पितात, त्यांना तर त्यांच्या घरातली मोठी माणसं एवढं पाणी प्यायलं तर जेवणार काय असं विचारत हमखास रागवतात. म्हणजेच काय तर लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेक जणांना जेवताना मध्ये- मध्ये पाणी  पिण्याची सवय (Drinking water along with meal is good or bad?) असतेच. पण ही सवय चुकीची की बरोबर, तेच नेमकं कळत नाही..

 

याविषयीचा एक व्हिडिओ gunjanshouts या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जेवताना पाणी प्यायचं की नाही, त्याबाबत नेमकं खरं काय आणि खोटं काय, याविषयी सांगण्यात आलं आहे.

तिशी येताच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या? आल्याचा फेसपॅक लावून पाहा.. पिंपल्सही होतील कमी

हा व्हिडिओ ज्यांनी शेअर केला आहे, त्या डिजिटल क्रियेटर असून हेल्थ, फिटनेस आणि डाएट याविषयी त्यांनी अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्यांनी जेवताना मध्ये मध्ये पाणी पिण्याची सवय योग्य की अयोग्य, याविषयी माहिती दिली आहे.

 

जेवताना पाणी प्यावं का?१. या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार आयुर्वेदात असं सांगितलं आहे की जेवताना पाणी पिणं ही सवय आरोग्यासाठी निश्चितच चांगली नाही. यामुळे पीएच लेव्हल खराब होते आणि त्यामुळे ॲसिडिटी, अपचन असे त्रास होतात. त्यामुळे ज्यांना नेहमीच ॲसिडिटी किंवा अपचनाचा त्रास होतो त्यांनी जेवताना पाणी पिणं टाळावं.

डोसा तव्यावर चिकटतो आणि सगळाच पचका होतो? ५ टिप्स, डोसा होईल हॉटेलसारखा कुरकुरीत

२. दुसरा मुद्दा म्हणजे एक तर जेवणाच्या आधी अर्धा तास किंवा जेवण झाल्यानंतर एका तासाने पाणी पिणं योग्य मानलं गेलेलं आहे.

३. काही लोकांना पाणी प्यायल्याशिवाय जेवण जातच नाही. अशा लोकांनी जेवताना खूप घटाघट पाणी पिणं टाळावं. त्याऐवजी एखादा घोट पाणी पिऊन तहान भागविण्याचा प्रयत्न करावा. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सपाणीआरोग्यहेल्थ टिप्स