Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > फिट व्हायचं तर रोज काय खाल? वाचा विराट कोहलीचा खास सल्ला, त्याच्यासारखा फिटनेस आणि एनर्जी हवी तर..

फिट व्हायचं तर रोज काय खाल? वाचा विराट कोहलीचा खास सल्ला, त्याच्यासारखा फिटनेस आणि एनर्जी हवी तर..

Fssai And Virat Kohli Eat Fortified Foods To Increase Vitamin : +F म्हणजचे फोर्टिफाईड खाद्य पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 03:26 PM2024-05-29T15:26:28+5:302024-05-29T17:22:09+5:30

Fssai And Virat Kohli Eat Fortified Foods To Increase Vitamin : +F म्हणजचे फोर्टिफाईड खाद्य पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात.

According To Fssai And Virat Kohli Eat Fortified Foods To Increase Vitamin 12 Calcium And Iron | फिट व्हायचं तर रोज काय खाल? वाचा विराट कोहलीचा खास सल्ला, त्याच्यासारखा फिटनेस आणि एनर्जी हवी तर..

फिट व्हायचं तर रोज काय खाल? वाचा विराट कोहलीचा खास सल्ला, त्याच्यासारखा फिटनेस आणि एनर्जी हवी तर..

तुम्ही किती  फिट आणि निरोगी आहात हे  डाएटवर अवलंबून असते. जेवणाचा एक सिंपल फॉर्म्यूला आहे. तांदूळ, पीठ, तेल आणि मीठ विकत घेताना +F  हे चिन्ह लक्षात घ्या. भारताय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहोली (Virat Kohli) याबाबत आपल्या इंस्टाग्राम पेजवरून अधिक माहिती दिली आहे. फूड सेफ्टी एंडी स्टॅण्डर्ड  अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (FSSAI) एका जाहिरातीत विराटने सांगितले की +F म्हणजचे फोर्टिफाईड खाद्य पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. (According To Fssai And Virat Koli Eat Fortified Foods To Increase Vitamin 12 Calcium And Iron) 

फोर्टिफाईड खाद्यपदार्थ का खायला हवेत?

विराट सांगतो की रोजच्या जेवणातील तांदूळ, दूध, तेल आणि मीठ हे खाद्य पदार्थ फोर्टिफाईड असल्याने पोषण आणि ताकद दोन्ही वाढते. याचा अर्थ असा की याच्या सेवनाने शरीराला भरपूर पोषण मिळते. 
तूप, तेल  आणि साखरयुक्त पदार्थ जास्त खाऊ नका. विराट सांगतात की रोज खाल्ले जाणारे पदार्थ  आपल्या आहारातून कमी करायला हवेत. त्यांनी सांगितले की तूप, तेल किंवा मीठासारख्या पदार्थांचा कमीत कमी वापर करावा.

फोर्टिफाईड का केले जाते?

एफएसएसआय नुसार फोर्टिफिकेशन ही प्रक्रिया गहू, तेल, दूध, मीठ यांसारख्या प्रमुख खाद्यपदार्थांमध्ये पोषण सामग्रीचा सुधार करण्यासाठी केला जातो. या प्रक्रियेत आयर्न, आयोडीन, जिंक, व्हिटामीन ए आणि प्रमुख व्हिटामीन्स आणि मिनर्लस एड केले जातात.

कार्यालयात आता महिलांना मासिक पाळीची सुटी जाहीर, महिला आता हक्काने सुटी घेऊ शकणार...

फोर्टिफाईड फूड

एफएसएसआयच्या रिपोर्टनुसार गव्हाचे पीठ, मीठ, तेल, दूध यांसारखे रोज खाल्ले जाणारे पदार्थ फोर्टिफायईड असतात. ज्यामुळे शरीराला पूर्णपणे पोषण मिळते +F असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

फोर्टिफाईड फूड खाण्याचे फायदे

फोर्टिफाईड फुड्स खाल्ल्याने शरीराला व्हिटामीन्स, मिनरल्स मिळतात. याशिवाय आयर्न, कॅल्शियम, व्हिटामीन डी सुद्धा मिळते.  शरीरात व्हिटामीन आणि मिनरल्सची कमतरता भासत  नाही. आयर्नच्या कमतरतेने एनिमिया होऊ शकतो. फोर्टिफाईड खाद्यपदार्थांतून पोषक तत्व मिळतात. ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.  फॉर्टिफाईड खाद्यपदार्थांच्या सेवनाना हाडांची ताकद वाढते आणि इम्युनिटी स्टाँग होऊन मेटाबॉलिझ्म वाढतो.  

Web Title: According To Fssai And Virat Kohli Eat Fortified Foods To Increase Vitamin 12 Calcium And Iron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.