Join us

बाहेरचे हे ४ पदार्थ खाणं सोडाल तरच कमी होईल वजन, न्यूट्रिशनिस्टनं दिल्या सोप्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:06 IST

Weight Loss Diet : पौष्टिक गोष्टी खाणं महत्वाचं तर आहेच, सोबतच काही गोष्टी टाळणंही तेवढंच महत्वाचं आहे. बरेच लोक असे अनेक पदार्थ रोज खातात ज्यामुळे वजन वाढू लागतं. 

Weight Loss Diet : वजन कमी करायचं म्हटलं म्हणजे केवळ पायी चालून किंवा एक्सरसाईज करून भागत नाही. अनेक गोष्टींचा ताळमेळ साधावा लागतो. त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे खाण्या-पिण्याची काळजी घेणं किंवा खाण्या-पिण्याच्या योग्य गोष्टींची निवड करणं. पौष्टिक गोष्टी खाणं महत्वाचं तर आहेच, सोबतच काही गोष्टी टाळणंही तेवढंच महत्वाचं आहे. बरेच लोक असे अनेक पदार्थ रोज खातात ज्यामुळे वजन वाढू लागतं. 

न्यूट्रिशनिस्ट सिमरन चोप्रा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी खाण्या-पिण्याच्या अशा गोष्टींबाबत सांगितलं, ज्या तुम्ही टाळल्या पाहिजे. त्यांनी सांगितलं की, वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांनी बाहेरचे हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. तरच वजन कमी होईल नाही तर आणखी वाढेल.

न्यूट्रिशनिस्टचं मत आहे की, वजन कमी करण्याच्या प्रयत्नात एक किंवा दोन वेळ खाल्ल्यानंही तुमची मेहनत वाया जावू शकते. त्यामुळे काही फायदा होत नाहीये, असा विचार करण्यापेक्षा काही गोष्टींची काळजी घेतली तर वजन कमी करणं सोपं होऊ शकतं.

फ्री मिळणारे पदार्थ

न्यूट्रिशनिस्टनुसार, जेव्हाही तुम्ही बाहेर जाता तेव्हा फ्रीमध्ये मिळणाऱ्या गोष्टी खाणं टाळलं पाहिजे. इ्व्हेंट्स किंवा रेस्टॉरन्टमध्ये अनेक कोणत्या ना कोणत्या ऑफर सुरू असतात, त्यात ब्रेड बास्केट, चिप्स, वेफर्स किंवा पापर इत्यादी पदार्थ फ्री दिले जातात. या गोष्टी टाळल्या पाहिजे.

डीप फ्राइड फूड्स 

बाहेर काही खायला जात असाल तर आधी हे बघा की, तुम्ही जे काही खात आहात ते डीप फ्राइड नसावं. एक चमचा तेलात ४० कॅलरी असतात. त्यामुळे तेल केवळ वजनच वाढवतं असं नाही तर ते हृदयासाठी देखील घातक असतं.

मॉक्टेल्स किंवा ज्यूस 

मॉक्टेल्स किंवा ज्यूसमध्ये २०० ते ७०० कॅलरी असू शकतात. त्यामुळे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मॉक्टेल्स किंवा ज्यूसऐवजी तुम्ही जल जीरा, लिंबू पाणी, नारळाचं पाणी, ऊसाचा रस पिऊ शकता. काहीच नसेल तर तुम्ही साधं पाणी पिऊ शकता.

डेजर्ट किंवा काही गोड 

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, बाहेर गेल्यावर डेजर्ट खाणं सगळ्यांनाच आवडतं. पण एकट्यासाठी एक डेजर्ट घेण्याऐवजी ते शेअर करून खा. यानं कॅलरी कमी इनटेक होतात. काही गोड खात असाल तर ते कमी प्रमाणात खावं. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स