अभिनेत्री आलिया भट सध्या विविध गोष्टींमुळे चांगलीच चर्चेत असते. आपल्या दमदार अभिनयाने कमी वयात बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलेली आलिया रणबीर कपूरशी लग्न, मग तिला झालेली मुलगी यामुळे गेल्या काही वर्षात चांगलीच चर्चेत आली. आलिया तिचा फिटनेस, डाएट, स्कीन केअर या बाबतीतही बरीच जागरुक असल्याचे दिसते. त्यामुळेच बाळ झाल्यावरही तिच्या फिगरमध्ये फारसा फरक पडला नसल्याचे आपण सगळेच पाहत आहोत. कपड्यांची फॅशन आणि ती कॅरी करण्याची तिची पद्धत यामुळेही आलिया नेहमी चर्चेत असते (Actress Alia Bhatt Eat Zucchini vegetable for Weight Loss benefits and recipe).
डाएट हा तुमच्या रुटीनमधला महत्त्वाचा भाग असून त्यामुळे तुमचे आरोग्य आणि फिटनेस दोन्हीही चांगले राहण्यास मदत होते. म्हणूनच अभिनेत्रींचे डाएट कायम चर्चेचा विषय असते. आलिया खात असलेल्या बीटरुट सॅलेडचीही बरीच चर्चा झाली. त्याचप्रमाणे आता ती खात असलेली एक भाजीही सध्या चर्चेत आहे. या भाजीचे नाव झुकीनी असून ती काकडीसारखी वेलाला येते. काकडी आणि दुधी भोपळा यांचे कॉम्बिनेशन असलेली ही भाजी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. वजन कमी करण्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी उपयुक्त असेलली ही भाजी खाण्याचे फायदे समजून घ्यायला हवेत.
झुकीनी भाजी खाण्याचे फायदे...
१. या भाजीमध्ये फायबर, प्रोटीन, कार्बोहायड्रेटस, व्हिटॅमिन बी आणि सी हे घटक भरपूर असतात. यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाणही चांगले असते.
२. आपल्या शरीराला पाण्याची भरपूर आवश्यकता असते. त्वचा, केस आणि एकूण आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात पाण्याचे प्रमाण भरपूर असायला हवे. झुकीनीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
३. सध्या डायबिटीस आणि रक्तदाब या अतिशय सामान्य समस्या आहेत. हे दोन्ही नियंत्रणात राहण्यासाठी या भाजीचा आहारात समावेश करायला हवा.
४. या भाजीत अँटीऑक्सिडंटस जास्त असतात तसेच ती वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर मानली जात असल्याने फिटनेसच्या दृष्टीने ही भाजी खाणे उपयुक्त ठरते.
भाजी करण्याची पद्धत...
१. दुधी किंवा इतर भाज्या आपण ज्याप्रमाणे चौकोनी तुकडे करुन चिरतो त्याप्रमाणे ही भाजी चिरुन घ्यावी.
२. इतर भाज्यांना आपण ज्याप्रमाणे जीरं-मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी देतो त्याप्रमाणे फोडणी करावी.
३. फोडणीमध्ये कडीपत्ता, मिरचीचे तुकडे घालून ही भाजी घालावी.
४. वरुन धणेजीरे पावडर, बडीशेप पावडर, मीठ, खोवलेले खोबरे आणि कोथिंबीर घालून झाकण ठेवून वाफ आणावी.
५. ही भाजी पोळीसोबत, भातासोबत किंवा अगदी नुसतीही छान लागते.