Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली तिच्या आईची खास आठवण; म्हणाली राजगिऱ्याचे लाडू खा कारण...

अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली तिच्या आईची खास आठवण; म्हणाली राजगिऱ्याचे लाडू खा कारण...

Benefits Of Eating Rajgira: अभिनेत्री भाग्यश्री हिने राजगिऱ्याचे लाडू खाण्याचे ५ जबरदस्त फायदे तर सांगितले आहेच, पण त्यासोबतच तिच्या आईची एक खास आठवणही शेअर केली आहे..(5 health benefits of eating Amaranth )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2024 03:40 PM2024-08-28T15:40:29+5:302024-08-28T15:41:30+5:30

Benefits Of Eating Rajgira: अभिनेत्री भाग्यश्री हिने राजगिऱ्याचे लाडू खाण्याचे ५ जबरदस्त फायदे तर सांगितले आहेच, पण त्यासोबतच तिच्या आईची एक खास आठवणही शेअर केली आहे..(5 health benefits of eating Amaranth )

actress bhagyashree explains the benefits of eating rajgira ladoo, 5 health benefits of eating Amaranth  | अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली तिच्या आईची खास आठवण; म्हणाली राजगिऱ्याचे लाडू खा कारण...

अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली तिच्या आईची खास आठवण; म्हणाली राजगिऱ्याचे लाडू खा कारण...

Highlightsभाग्यश्री म्हणते राजगिरा हे एकमेव असं धान्य आहे, ज्यामध्ये स्नायुंना बळकटी देणारे प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात.

अभिनेत्री भाग्यश्री सोशल मिडियावर अतिशय ॲक्टीव्ह आहे. ती तिच्या चाहत्यांना नेहमीच फिटनेसबाबत मोटीव्हेट करत असते. त्यामुळेच आठवड्यातून एकदा ती अशी एखादी पोस्ट जरूर शेअर करते जी सगळ्यांसाठीच खूप फायदेशीर असते. आता भाग्यश्रीने नुकतीच जी पोस्ट शेअर केली आहे, त्यामध्ये तिने राजगिऱ्याचे महत्त्व सांगितले आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळे उपवास करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींच्या आहारात सध्या राजगिरा असतोच. पण राजगिरा हा फक्त उपवासापुरताच मर्यादित न ठेवता इतरवेळीही तो तुमच्या आहारात आवर्जून असायलाच पाहिजे असं भाग्यश्री सांगते आहे. (actress Bhagyashree explains the benefits of eating rajgira)

 

राजगिरा खाण्याचे फायदे

१. राजगिऱ्यामध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

२. शरीरातली पोटॅशियम, मॅग्नेशियम, मँगनीज, कोलीन या पदार्थांची कमतरता भरून काढण्यासाठी नियमितपणे राजगिरा खावा.

करिना कपूरने सांगितला तिच्या दोन्ही मुलांचा मजेशीर किस्सा, म्हणाली खूप कठीण असतं जेव्हा.....

३. राजगिऱ्यामध्ये लायझिन नावाचा घटक असतो ज्यामुळे शरीरात कॅल्शियम व्यवस्थित शोषून घेण्यास मदत होते आणि हाडे मजबूत होतात. त्यामुळे कमी वयातच हाडांचं दुखणं मागे लागू नये म्हणून राजगिरा नियमितपण खावा.

४. राजगिऱ्यामध्ये लाेह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतं, जे गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त ठरतं.

५. भाग्यश्री म्हणते राजगिरा हे एकमेव असं धान्य आहे, ज्यामध्ये स्नायुंना बळकटी देणारे प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात.

 

भाग्यश्रीने सांगितली तिच्या आईची खास आठवण

राजगिऱ्याचे आहारातले महत्त्व सांगताना भाग्यश्री म्हणाली सध्या श्रावण महिना सुरू आहे. लहानपणी दरवर्षी श्रावणात आई राजगिऱ्याचे लाडू किंवा चिक्की आवर्जून खायला द्यायची.

बाल्कनीत वर्षभर रंगबेरंगी फुलं हवी? ५ रोपं लावा- सुंदर फुलांनी नेहमीच सजलेली राहील बाग

राजगिऱ्याचे लाडू किंवा चिक्की हा मुलांसाठीही एक उत्तम खाऊ ठरू शकतो. चाॅकलेट, बिस्किटांचे प्रमाण कमी होऊन मुलांना राजगिऱ्याच्या गोड पदार्थांची आवड लागली तर ती त्यांच्या तब्येतीसाठीही निश्चितच चांगली आहे. एवढंच नाही तर राजगिऱ्याचे थालिपीठ ही नियमितपणे खा, मिक्स मिलेटचा पराठा करताना त्यात राजगिरा अवश्य टाका, असा सल्लाही भाग्यश्रीने दिला आहे.


 

Web Title: actress bhagyashree explains the benefits of eating rajgira ladoo, 5 health benefits of eating Amaranth 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.