Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > तिखट खायला आवडतं तर हिरवी मिरची खा, अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय हिरव्या मिरच्या खाण्याचे ५ फायदे

तिखट खायला आवडतं तर हिरवी मिरची खा, अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय हिरव्या मिरच्या खाण्याचे ५ फायदे

Benefits of eating green chillies: तिखट, झणझणीत जेवण आवडत असेल तर स्वयंपाकाता लाल मिरचीऐवजी हिरवं तिखट वापरा. त्यामुळे आरोग्याला भरपूर फायदे होतील, असं सांगतेय आपली अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree). 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 01:56 PM2022-08-24T13:56:06+5:302022-08-24T13:58:53+5:30

Benefits of eating green chillies: तिखट, झणझणीत जेवण आवडत असेल तर स्वयंपाकाता लाल मिरचीऐवजी हिरवं तिखट वापरा. त्यामुळे आरोग्याला भरपूर फायदे होतील, असं सांगतेय आपली अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree). 

Actress Bhagyashree is telling benefits of eating green chillies, Why to prefer green chilli instead of red mirch powder? | तिखट खायला आवडतं तर हिरवी मिरची खा, अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय हिरव्या मिरच्या खाण्याचे ५ फायदे

तिखट खायला आवडतं तर हिरवी मिरची खा, अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय हिरव्या मिरच्या खाण्याचे ५ फायदे

Highlightsहिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण चांगले असते. Capsaicin and Dihydrocapsaicin हे दोन घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास तसेच रक्तवाहिन्यांमधील फॅट्स कमी करण्यास मदत करतात.

जेवणात जर तिखट नसेल, तर जेवणाची मजाच कमी होते. कमी तिखटाचं जेवण अनेकांना मिळमिळीत वाटतं. त्यामुळेच भरपूर तिखट टाकून केलेले झणझणीत पदार्थ (spicy food lovers) अनेकांच्या आवडीचे असतात. चव मस्त जमून आली की आपण त्यावर यथेच्छ ताव मारतो खरे, पण नंतर मात्र त्या अतितिखटाचा त्रास व्हायला लागतो. जेवण झाल्यानंतर काही तासांनी पोटात- छातीत जळजळ (heartburn and ulcers) व्हायला लागते, खूप घाम येतो आणि अनेकांना नंतर अपचनाचाही (indigestion due to eating excess red mirch powder) त्रास होतो. आता असा त्रास होऊ द्यायचा नसेल आणि जेवणही छान तिखट, मसालेदार, झणझणीत करायचं असेल, तर अभिनेत्री भाग्यश्रीने दिलेला सल्ला एकदा बघायलाच पाहिजे. (benefits of eating green chillies)

 

भाग्यश्रीने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये तिने हिरवी मिरची खाण्याचे फायदे सांगितले आहेत.

फक्त ४ पदार्थ आणि चवदार बंगाली गरम मसाला तयार, शेफ कुणाल कपूर यांची खास रेसिपी 

एरवी हिरवी मिरची खाल्ल्याने तब्येतीला काही फायदा होऊ शकतो, असा विचारही आपण करत नाही. पण खरोखरंच हिरवी मिरची खाणे पौष्टिक आहे. त्यामुळे तिखट खाणं आवडत असेल तर स्वयंपाकात लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरचीचं फ्रेश तिखट वापरा. यामुळे जेवणाला चवही येईल आणि शिवाय अशा तिखट जेवणाचा त्रासही होणार नाही, असं ती सांगते आहे. 

 

लाल तिखटाऐवजी हिरवी मिरचीच का?
याविषयी सांगताना ती म्हणाली की तिखट करण्यासाठी मिरचीवर बरीच प्रक्रिया केली जाते. यामुळे जे पौष्टिक घटक हिरव्या मिरचीतून मिळतात, ते लाल मिरचीतून मिळत नाहीत. शिवाय लाल तिखटामध्ये भेसळ असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे अनेकांना लाल तिखट जास्त खाल्ल्यानंतर अल्सर, जळजळ असा त्रास होतो. 

 

हिरवी मिरची खाण्याचे फायदे
- हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण चांगले असते.
- हिरव्या मिरचीमध्ये असणारे बिटा कॅरोटीन डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

'हे' आहेत पावसाळ्यातले खरे इम्युनिटी बुस्टर, आजारपण टाळायचं तर रोजच्या जेवणात 'या' भाज्या खायलाच पाहिजेत
- Capsaicin and Dihydrocapsaicin हे दोन घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास तसेच रक्तवाहिन्यांमधील फॅट्स कमी करण्यास मदत करतात.
- हिरव्या मिरचीतून व्हिटॅमिन के मिळते.
- भरपूर ॲण्टीऑक्सिडंट्स असल्याने कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. 

 

 

Web Title: Actress Bhagyashree is telling benefits of eating green chillies, Why to prefer green chilli instead of red mirch powder?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.