टोमॅटो हा आपल्या स्वयंपाकघरातला एक महत्त्वाचा पदार्थ. भाजी, वरण, कोशिंबीर अशा कोणत्याही पदार्थांमध्ये टोमॅटो अगदी सहज सामावून जातो. शिवाय बऱ्याचदा एखादी भाजी कमी असेल तर ती करताना त्याच्या जोडीला एखादा टोमॅटो घातला की भाजीचे प्रमाणही वाढते आणि चवही खुलते. पण टोमॅटो आवडत नसल्याने काही घरांमध्ये टोमॅटोचा वापर खूपच कमी प्रमाणात केला जातो (Use of tomato for beauty and health). म्हणूनच टोमॅटो कमी प्रमाणात खाणाऱ्या मंडळींसाठी किंवा मुळीच न खाणाऱ्या मंडळींसाठी अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree) हिने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने टोमॅटो खाण्याचे काही जबरदस्त फायदे (7 main benefits of eating tomato every day) समजावून सांगितले आहेत.
टोमॅटो खाण्याचे फायदे
१. वयाची पन्नाशी आली तरी या वयातही भाग्यश्री एवढी फिट कशी काय, याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. शिवाय तिची त्वचाही अतिशय सुंदर आणि चमकदार आहे. हे सगळं तिला कसं जमलं, हा प्रश्न अनेकांना पडतो. भाग्यश्रीने याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये दिलं आहे. ती म्हणते की टोमॅटोमध्ये असे काही पौष्टिक घटक आहेत, ज्यामुळे तुमचं आरोग्य आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टींची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यामुळे तिच्या रोजच्या आहारात कच्चा किंवा शिजवलेला अशा कोणत्याही माध्यमातून टोमॅटोचा वापर हमखास केलाच जातो.
थायरॉईडचा त्रास असेल तर खाण्याच्या बाबतीतली ७ पथ्ये पाळाच, आजार नियंत्रणात ठेवायचा तर....
२. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. महिलांना दिवसभरातून व्हिटॅमिन सी ची जेवढी गरज असते, त्यापैकी ७० टक्के गरज टोमॅटोमधून भागवली जाते.
३. टोमॅटोमध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि इतर काही घटक शरीरातील कोलॅजीन (collagen) शोषून घेण्यासाठी मदत करतात. त्याचा फायदा त्वचा नितळ आणि चमकदार होण्यासाठी होतो.
४. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि फोलेट हे घटकही मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठीही टोमॅटो अतिशय उपयुक्त ठरतो.
भर उन्हात रस्त्यावर बसून आजीबाई विकत होत्या पेरू, पोलिसांनी पाहिलं आणि मग... बघा व्हायरल व्हिडिओ
५. टोमॅटोमध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच त्याच्यातले लायकोपीन (lycopene) कॅन्सर होण्याचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
६. कोलेस्टरॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठीही टोमॅटोचा उपयोग होतो.
७. शिवाय टोमॅटो नियमितपणे खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित राहण्यास मदत होते.