Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > तुम्हीही बटाटे सोलून भाजी करता? भाग्यश्री सांगते सालांसकट बटाटे खा- 'या' आजारावर रामबाण उपाय

तुम्हीही बटाटे सोलून भाजी करता? भाग्यश्री सांगते सालांसकट बटाटे खा- 'या' आजारावर रामबाण उपाय

Actress Bhagyashree Says Benefits Of Eating Potato Peels: बहुसंख्य घरांमध्ये बटाटे सोलूनच त्याची भाजी किंवा इतर पदार्थ केले जातात. म्हणूनच आता बटाट्याच्या साली आरोग्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत ते बघा..(is it good to eat potato peel?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2024 12:58 PM2024-08-07T12:58:41+5:302024-08-07T12:59:36+5:30

Actress Bhagyashree Says Benefits Of Eating Potato Peels: बहुसंख्य घरांमध्ये बटाटे सोलूनच त्याची भाजी किंवा इतर पदार्थ केले जातात. म्हणूनच आता बटाट्याच्या साली आरोग्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत ते बघा..(is it good to eat potato peel?)

actress bhagyashree says benefits of eating potato peels, is it good to eat potato peel, best food for getting relief from cramps | तुम्हीही बटाटे सोलून भाजी करता? भाग्यश्री सांगते सालांसकट बटाटे खा- 'या' आजारावर रामबाण उपाय

तुम्हीही बटाटे सोलून भाजी करता? भाग्यश्री सांगते सालांसकट बटाटे खा- 'या' आजारावर रामबाण उपाय

Highlightsबटाट्याच्या सालींमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसदेखील मिळते. त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठीही ते चांगले आहेत.

बटाट्याची भाजी हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. कोणाला ती उकडून आवडते तर कोणाला परतून केलेली. बटाटा लहान मुलांच्याही अतिशय आवडीचा. त्यामुळे घरात बऱ्याचदा बटाट्याची भाजी होतेच. पण बटाट्याची भाजी करताना बहुसंख्य लोक एक मुख्य चूक करतात. ती म्हणजे बटाट्याची सालं आधी सोलून घेतात आणि मग त्याची भाजी करतात. अशा पद्धतीने बटाट्याची भाजी करणे अतिशय चुकीचे आहे. बटाट्याची भाजी करायची असेल तर ती सालांसकट करावी. कारण त्याच्या साली अतिशय पौष्टिक असतात (is it good to eat potato peel?), अशी माहिती सांगणारा एक व्हिडिओ अभिनेत्री भाग्यश्रीने नुकताच सोशल मिडियावर शेअर केला आहे. (Actress Bhagyashree says benefits of eating potato peels)

 

बटाट्याच्या सालींचे आरोग्यासाठी असणारे फायदे

बऱ्याच जणांना पायात गोळे येण्याचा त्रास होतो. मासिक पाळीच्या काळात किंवा पाळी येण्याच्या आधी तर हा त्रास बहुसंख्य महिलांना जाणवतोच. यामागचं एक कारण असं असतं की आपल्याला डिहायड्रेशन झालं आहे आणि दुसरं कारण म्हणजे आपल्या शरीरात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या दोन्ही घटकांची कमतरता आहे.

नकळतपणे पालकांकडूनच मुलांना लागू शकतात ५ चुकीच्या सवयी, बघा तुमच्याकडूनही नेमकं तेच होतंय का

आता जर आपल्याला क्रॅम्प येण्यामागे दुसरं कारण असेल तर पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे दोन्ही पदार्थ भरभरून देणारा एक पदार्थ म्हणजे बटाट्याच्या साली. आणि नेमक्या त्याच आपण काढून टाकून देतो. म्हणूनच इथून पुढे बटाट्याची भाजी करताना ती त्याच्या सालांसकट करा.

 

बटाट्याच्या सालींमध्ये असणारे पौष्टिक घटक

१. बटाट्याच्या सालींमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे दोन्ही घटक भरपूर प्रमाणात असतात.

२. बटाट्याच्या सालींमधून लोह, फायबर, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी देखील चांगल्या प्रमाणात मिळते. 

घरातल्या प्लास्टिकच्या वस्तूंना तडे गेले? फक्त २ पदार्थ लावून करा दुरुस्ती- होईल नव्यासारखं दणकट 

३. बटाट्याच्या सालींमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसदेखील मिळते. त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठीही ते चांगले आहेत.

४. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी बटाट्याच्या साली उपयुक्त ठरतात. 


 

Web Title: actress bhagyashree says benefits of eating potato peels, is it good to eat potato peel, best food for getting relief from cramps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.