Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > चिंच म्हणताच तोंडाला पाणी सुटलं, मग ऐका भाग्यश्री सांगते ते चिंच खाण्याचे ७ फायदे

चिंच म्हणताच तोंडाला पाणी सुटलं, मग ऐका भाग्यश्री सांगते ते चिंच खाण्याचे ७ फायदे

Health tips: लहानपणी भरपूर चिंचा खाल्ल्या ना, मग आताही खा... कारण अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree) सांगते आहे चिंच खाण्याचे अफलातून फायदे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 05:30 PM2021-12-28T17:30:53+5:302021-12-28T17:32:40+5:30

Health tips: लहानपणी भरपूर चिंचा खाल्ल्या ना, मग आताही खा... कारण अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree) सांगते आहे चिंच खाण्याचे अफलातून फायदे.

Actress Bhagyashree told the benefits of eating tamarind, very useful for health | चिंच म्हणताच तोंडाला पाणी सुटलं, मग ऐका भाग्यश्री सांगते ते चिंच खाण्याचे ७ फायदे

चिंच म्हणताच तोंडाला पाणी सुटलं, मग ऐका भाग्यश्री सांगते ते चिंच खाण्याचे ७ फायदे

Highlightsज्या लोकांना नुसती चिंच म्हणजेच कच्ची चिंच खाल्ल्याने त्रास होतो, त्यांनी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा चिंचेचा सार पिण्यास हरकत नाही.

लहानपणी अनेक जणांनी कचाकच चावून हिरव्या किंवा पिकलेल्या चिंचा खाल्ल्या असणार. पण जसं वय वाढत जातं, तसं चिंच बघूनच दात अंबायला लागतात, असं काही जणं म्हणतात. पण असं असलं तरी चिंच खाण्याचा (benefits of eating tamarind in marathi) मोह मात्र काही आवरला जात नाही. चिंचेचं एक छोटंसं बुटूक आणि त्याला लावलेलं मीठ असा झकास पदार्थ जर तोंडात टाकला तर आ हा हा.... त्यातही जर ती चिंच गाभुळलेली म्हणजे अर्धी कच्ची अर्धी पिकलेली असेल, तर त्या चिंचेची (tamarind increases immunity) चव आणखीनच मजेदार असते..

 

आवडत असेल आणि चिंच खाऊन कोणताही त्रास होत नसेल म्हणजेच चिंचेची ॲलर्जी वगैरे नसेल तर बिनधास्त चिंच खा, असं सांगतेय बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री.भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवरून तिच्या चाहत्यांसाठी नुकत्याच फिटनेस टिप्स शेअर केल्या आहेत. यामध्ये तिने चिंच खाण्याचे फायदे समजावून सांगितले आहेत. त्यामुळे आंबट म्हणून किंवा खोकला येईल म्हणून चिंच खाणं टाळत असाल, तर भाग्यश्रीने सांगितलेले हे फायदे जरूर वाचा..

 

चिंच खाण्याचे फायदे
Benefits of eating tamarind

१.  चिंचेमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असतात.
२. चिंचेमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे चिंच खाणे हाडांच्या मजबुतीसाठी फायद्याचे ठरते.
३. चिंचेमध्ये लोह म्हणजेच आयर्नचे प्रमाण योग्य असल्यामुळे अशक्तपणा दूर करण्यासाठी चिंचेचा सार, चिंचेची चटणी हे पदार्थ उपयुक्त ठरतात.

हिरव्यागार चिंचेचा चटकमटक ठेचा! तिखट-आंबटगोड चवीची ही घ्या रसरशीत रेसिपी, तोंडाला पाणीच सुटेल..
४. चिंचेमुळे राेगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
५.  रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी चिंच मदत करते. 
६. चिंचेमध्ये फायबरचे प्रमाण तसेच हायड्रोसायट्रिक ॲसिडचे प्रमाण भरपूर असल्यामुळे चिंच फॅट बर्न करून वजन कमी करण्यासाठी मदत करते. 
७. चिंचेमध्ये पोटॅशियमचे योग्य प्रमाण असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी चिंचेचा उपयोग होतो. 

 

हे ही लक्षात घ्या...
- ज्या लोकांना नुसती चिंच म्हणजेच कच्ची चिंच खाल्ल्याने त्रास होतो, त्यांनी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा चिंचेचा सार पिण्यास हरकत नाही. चिंचेचा सार बनविताना त्यात मिरेपूड, गुळ, लसूण या पदार्थांचा वापर करावा. जेणेकरून सार अधिक पौष्टिक होतो.
- चिंचेचा ठेचा किंवा चटणी देखील आरोग्यासाठी पोषक ठरते.
- जेवण झाल्यानंतर मुखवास म्हणून चिंचेची कॅण्डी तोंडात टाकल्यास काहीच हरकत नाही. ती बाधत तर नाहीच उलट पचनासाठी अतिशय उपयुक्त ठरते. 

 

Web Title: Actress Bhagyashree told the benefits of eating tamarind, very useful for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.