Join us  

विद्या बालनने ' असे ' केले वजन कमी; ती सांगते, वजन कमी करणं शक्य झालं कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2024 11:46 AM

actress Vidya Balan weight loss tips : सोशल मिडीयावर सध्या विद्याच्या वेटलॉसची चर्चा चांगलीच गाजत आहे...

विद्या बालन ही बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्री. विद्या तिच्या अभिनयासाठी तर प्रसिद्ध आहेच. पण जाड असूनही तिला कधीच आपल्या जाडीविषयी न्यूनगंड वाटला नाही. सुरूवातीचे काही चित्रपट सोडले तर विद्या बालन अचानक खूप जाड झाल्याचे बघायला मिळाले. त्यावर तिला बरेच ट्रोलिंगही सहन करावे लागले. पण तिने मात्र साडी आणि मॉडर्न कपड्यांमध्ये ती कायमच स्वत:ला छान कॅरी करते. अभिनेते किंवा अभिनेत्रींचे व्यायामप्रकार, आवडीचे पदार्थ किंवा डाएट जाणून घेणे त्यांच्या चाहत्यांना कायमच आवडते. एखाद्या अभिनेत्रीने वाढलेले वजन कसे कमी केले याबाबत तर आपल्याला खूप उत्सुकता असते. सध्या अभिनेत्री विद्या बालन हिने अचानक बरेच वजन कमी केल्याने ती स्लिम ट्रिम झालेली दिसते. त्यामुळे तिच्या या वेटलॉसची बरीच चर्चा झाल्याचे पाहायला मिळते (actress Vidya Balan weight loss tips). 

आता विद्याने हे वजन घटवले तरी कसे असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला असेल. तर या वजन कोणताही व्यायाम न करता किंवा भोपळा, पालक न खाता तिने वजन घटवल्याचे ती सांगते. गॅलट्टा इंडियाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या बारीक होण्याविषयी संगितले आहे.  आपल्या पुन्हा बारीक होण्याविषयीचे सीक्रेट सांगताना विद्या म्हणाली, “तुम्हाला माहीतच आहे मला कायमच बारीक होण्यासाठी स्ट्रगल करावे लागले. त्यासाठी प्रचंड व्यायाम आणि डाएट सगळं कायम केलं. पण त्यामुळे कधी वजन कमी झालं तर कधी नाही. या वर्षाचा सुरूवातीला चेन्नईच्या अमुरा हेल्थ या न्यूट्रिशन ग्रुपशी माझी भेट झाली. त्यांनी मला सांगितलं की माझ्या शरीरात दाहकता वाढलेली आहे. हे फॅट्स नाहीत. त्यामुळे शरीरातील ही उष्णता नियंत्रित केली तर वजनही नियंत्रित होईल. त्यानुसार काय खावे, काय नाही याचे त्यांनी मार्गदर्शन केले. याचा मला फारच फायदा झाला.”

(Image : Google)

“मी कायम शाकाहारी होते तरीही मला हे माहीत नव्हते की पालक आणि दुधी भोपळा माझ्यासाठी चांगले नाही. आपल्याला वाटते सगळ्या भाज्या खाणे उपयुक्त असते. पण तसे नसते, आपल्या शरीर प्रकृतिनुसार काय खावे काय नाही याची माहिती करून घेणे गरजेचे असते. जे एकासाठी चांगले असेल तेच दुसर्‍यासाठीही चांगलेच असेल असं नाही.” असंही विद्याने संगितले. आपल्या आजूबाजूचे लोकही आपले वजन वाढण्यासाठी कारणीभूत होते असे म्हणताना ती सांगते की, “ हे माझे पहिलेच वर्ष असेल जेंव्हा मी अजिबात वर्क आऊट केले नाही. 

मी व्यायाम करायचं थांबवलेलं होतं तरीही माझ्या शरीरयष्टीत एवढा फरक पडला. याचं कारण म्हणजे आपले शरीर हे फक्त आपण काय खातो हेच रिफ्लेक्ट करत नाही तर आपल्या भावनात्मक गोष्टींचेही रिफ्लेक्शन आपल्या शरीरावर पडत असते. आजवर मला सगळे जाड जाड म्हणत आले आणि त्याचा परिणाम माझ्या शरीरावरही झाला. आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा कायम आदर करायला हवा. त्याचे सकारात्मक परिणाम नक्कीच जाणवतात.” असंही विद्या आवर्जून सांगते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सविद्या बालन