Join us  

वजन कमी करण्यासाठी रोज ३ पदार्थ पाण्यात टाकून प्या, ८ दिवसांतच दिसेल फरक- चरबी उतरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2024 1:33 PM

Add Just 3 Ingredients In Water For Fast Weight Loss: वजन झटपट कमी करायचं असेल तर त्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा... (best and most easy method of weight loss)

ठळक मुद्देया पाण्यामुळे आपल्या शरीरातील इन्सुलिन निर्मिती सुरळीत होते आणि वजन कमी करण्यासाठी किंवा आहे ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी त्याचा फायदा होतो. 

आपण जेव्हा वयाच्या ३०- ३५ वर्षे या टप्प्याच्या आत असतो, तेव्हा आपलं वजन खूप लवकर वाढत नाही. किंवा थोडा व्यायाम सुरू केला की वजन, वाढतं पोट लगेचच कंट्रोलमध्ये येऊन जातं. पण जसं आपण पस्तिशीच्या पुढे जातो, तसं तसं असं लक्षात यायला लागतं की वजनाचा काटा वाढतच चालला आहे. तो पुन्हा खाली आणण्यासाठी आपल्याला आधीपेक्षा खूप जास्त व्यायाम करावा लागत आहे. तरीही म्हणावं तसं वजन कमी होत नाही (add just 3 ingredients in water for fast weight loss). म्हणूनच आता वाढतं वजन कमी करण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. (best and most easy method of weight loss)

 

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय

वजन कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करायचा याचा उपाय सेलिब्रिटी पारस तोमर याने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने असं सांगितलं आहे की जर तुमचं वजन कमी होत नसेल तर तुमच्या शरीरातली इन्सुलिनची निर्मिती कमी प्रमाणात होत आहे.

आहारतज्ज्ञ सांगतात- 'या' गोष्टीमुळे डाएट, व्यायाम करूनही वजन कमी होत नाही, बघा कुठे चुकतं.. 

जर इन्सुलिन निर्मिती पुन्हा व्यवस्थित होऊ लागली, तर वजनाचा काटा कमी होण्यास निश्चितच मदत होते. म्हणूनच शरीरात योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करून वजन नियंत्रित करण्यासाठी त्याने हा उपाय सांगितला आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला मेथी दाणे, दालचिनी आणि मिरे हे ३ पदार्थ लागणार आहेत.

 

सगळ्यात आधी तर रात्री झोपण्यापुर्वी १ ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यात १ टीस्पून मेथी दाणे टाका. त्यानंतर त्यामध्ये अर्धा टीस्पून दालचिनी पावडर आणि अर्धा टीस्पून मिरेपूड टाका. हे सगळं मिश्रण आता रात्रभर झाकून ठेवा.

व्हिक्सचा वापर करून डास पळवून लावण्याचा भन्नाट उपाय! घरात शोधूनही डास सापडणार नाहीत..

दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून घ्या. त्या पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाका आणि रिकाम्या पोटी ते पाणी पिऊन घ्या.

या पाण्यामुळे आपल्या शरीरातील इन्सुलिन निर्मिती सुरळीत होते आणि वजन कमी करण्यासाठी किंवा आहे ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी त्याचा फायदा होतो. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सपाणीहेल्थ टिप्सहोम रेमेडी