आजकाल सगळेच हेल्दी राहण्यासाठी ग्रीन टी पितात. ग्रीन टी हे आता जगभरात हेल्दी ड्रिंक म्हणून ओळखलं जात आणि तितक्याच आवडीने प्यायलही जात. ग्रीन टी पिण्याची प्रत्येकाची अशी वेगवेगळी कारणं असतात. कुणी हेल्दी आरोग्यासाठी तर कुणी चांगल्या त्वचेसाठी तर कुणी वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी (1 Ingredient to Add to Green Tea to Boost Antioxidants) पितात. ग्रीन टी मध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडेंट आणि इतर महत्वाचे घटक फार मोठ्या प्रमाणांत असतात(Amazing Health Benefits Of Green Tea With Lemon).
ग्रीन टी मध्ये असणाऱ्या पोषक तत्वांव्यतिरिक्त त्यात भरपूर दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे आपल्या चयापचय क्रियेचा वेग वाढतो. याचबरोबर त्वचा चमकदार होण्यासही मदत मिळते. तसेच ग्रीन टी (Add Lemon To Green Tea To Enhance Antioxidants) प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवता येते. इतके सगळे फायदे असलेल्या या ग्रीन टी मध्ये काही पोषक पदार्थ मिसळल्यास हा ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी आणखीनच फायदेशीर ठरू शकतो. परंतु ग्रीन टी मध्ये नेमकं कोणता पदार्थ मिसळायचा ते पाहूयात.
ग्रीन टी मध्ये लिंबाचा रस मिसळा...
आपण ग्रीन टी मध्ये लिंबाचा रस मिसळून पिऊ शकतो. ग्रीन टी मध्ये लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने त्या ग्रीन टी चे आपल्या शरीराला दुप्पट फायदे मिळतात. ग्रीन टीमध्ये लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास ग्रीन टी मधील अँटीऑक्सिडंट गुणधर्म अधिक वाढतात. लिंबाचा रस हा व्हिटॅमिन 'सी' चा उत्कृष्ट स्रोत आहे. लिंबामध्ये ऍस्कॉर्बिक अॅसिड, हेस्पेरिडिन आणि नॅनोनिक अॅसिड सारखे अँटिऑक्सिडंट असतात, जे ग्रीन टी मधील अँटिऑक्सिडंटसच्या गुणधर्मांना आणखी मजबूत करुन त्यांची गुणवत्ता आणि दर्जा वाढवतात. ग्रीन-टीला आधी थंड होऊ द्या आणि नंतरच त्यात लिंबाचा रस मिसळून ग्रीन टी प्यावी.
ग्रीन टी मध्ये लिंबाचा रस मिसळून पिण्याचे फायदे...
१. ग्रीन टी आणि लिंबू या दोघांमध्येही फार जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. हे अँटिऑक्सिडंट आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका बजावतात.
२. वजन कमी करण्यासाठीच्या आहारात लिंबू घातलेला ग्रीन टीचा आवर्जून समावेश करावा असं तज्ज्ञ सांगतात. अनेक अभ्यास हेच सांगतात की ग्रीन टी हा शरीरातील मेद जाळण्यास आणि वजन कमी करण्यास अतिशय फायदेशीर असतो.
३. ग्रीन टी सोबत लिंबू घेतल्यास 'क' जीवनसत्त्वं शरीरास मिळतं. त्याचा परिणाम श्वसनसंस्थेस होणाऱ्या संसर्गांना प्रतिबंधित करतो. ग्रीन टी आणि लिंबामधील अँटिऑक्सिडंट एकत्रितपणे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीस मजबूत करतात.
४. शरीरात ओलावा टिकून राहाण्यास लिंबू घातलेला ग्रीन टी मदत करतो. शरीरातील प्रत्येक अवयवासाठी ओलसरपणा महत्त्वाचा असतो. विशेषत: त्वचा ओलसर राखण्यासाठी, वजन नियंत्रित करण्यासाठी , मेंदूचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी, पचनसंस्थेचं आरोग्य नीट राखण्यासाठी आणि किडनीचं काम नीट होण्यासाठी शरीरात ओलावा राहणं गरजेचं असतं. हा ओलावा लिंबू टाकून ग्रीन टी घेतल्यास उत्तम राखला जातो. पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थ शरीरात गेल्यास किडनी स्टोन, डोकेदुखी, बध्दकोष्ठता या समस्यांपासून सुटका होते.
५. लिंबामधे असणाऱ्या सायट्रस फ्लेवोनॉइडस हा घटक दाह थांबवतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांचे काम सुधारतं आणि कोलेस्ट्रॉची पातळीही नियंत्रित राहाते.
उद्यापासून पहाटे लवकर उठायचंय? ६ टिप्स- गजर होण्यापूर्वी जाग येईल-तडक लागाल कामाला...
लिंबू घालून ग्रीन टी कसा कराल?
एक कप पाणी घ्यावं. ते चांगलं उकळावं. उकळलं की गॅस बंद करावा. दोन तीन मिनिटं वाफ निवळू द्यावी आणि मग ते पाणी कपात भरावं. आणि त्यात ग्रीन टी बॅग टाकावी.दोन तीन मिनिटं ती तशीच राहू द्यावी. जर ग्रीन टीची पावडर वापरणार असाल तर एक चमचा साधारणत: दोन ग्रॅम पावडर टाकावी. सर्वात शेवटी एक अर्ध्या लिंबाचा रस त्यात घालावा. स्वादासाठी त्यात मध, दालचिनी, आलं किंवा पूदिन्याची पानंही घालता येतात . दिवसातून तीन ते चार कप लिंबू घातलेला ग्रीन टी हा शरीर आतून ओलसर राखण्यास आणि शरीराला इतर फायदे मिळवून देण्यास उपयुक्त मानला जातो.