Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > बदामापेक्षा दुप्पट प्रोटीन देते 'ही' भाजी; सद्गुरू सांगतात 'ताकदीचा खजिना'- हाडं होतील बळकट

बदामापेक्षा दुप्पट प्रोटीन देते 'ही' भाजी; सद्गुरू सांगतात 'ताकदीचा खजिना'- हाडं होतील बळकट

Add Protein Rich Vegetables (Protein Rich Vegetable) : हिरवे मटार खाल्ल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. यात कॅलरीजचे प्रमाणही कमी असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 11:09 AM2024-01-21T11:09:55+5:302024-01-21T11:14:40+5:30

Add Protein Rich Vegetables (Protein Rich Vegetable) : हिरवे मटार खाल्ल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. यात कॅलरीजचे प्रमाणही कमी असते.

Add Protein Rich Vegetables Green Peas In Your Diet for Bones Strong Suggest by Sadguru Jaggi Vasudev | बदामापेक्षा दुप्पट प्रोटीन देते 'ही' भाजी; सद्गुरू सांगतात 'ताकदीचा खजिना'- हाडं होतील बळकट

बदामापेक्षा दुप्पट प्रोटीन देते 'ही' भाजी; सद्गुरू सांगतात 'ताकदीचा खजिना'- हाडं होतील बळकट

प्रोटीन शरीराच्या विकासासाठी महत्वाचे असते. शरीरात प्रोटीन्सची कमतरता भासल्यास थकवा येणं, कमकुवतपणा येणं अशी लक्षणं जाणवू शकतात. (Add Protein Rich Vegetables Green Peas In Your Diet) प्रोटीन्सच्या सेवनाने मेटाबॉलिझ्म वाढते, भूक चांगली लागते आणि फॅट बर्न होण्यासही मदत होते. याशिवाय मसल्स रिपेअर होतात. हाडं मजबूत होऊन  क्रेव्हिंग्सही  कमी होतात. पचनक्रिया चांगली राहते. (Green Peas For Strong Bones)

मासांहाराच्या तुलनेत काही भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते. रोजच्या आहारात या भाज्यांचा समावेस केल्यास तब्येत चांगली राहते याशिवाय तब्येतीचे इतर विकारही उद्भवत नाहीत. यात सगळ्यात महत्वाचे ते म्हणजे हिरवे मटार, हिवाळ्यात हिरवे मटार सहज कुठेही मिळतात. मटार पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. (Protein Rich Vegetables)

युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चरच्या रिपोर्टनुसार १०० ग्राम हिरवे मटार खाल्ल्याने तुम्हाला ५ ग्राम प्रोटीन्स मिळतात. म्हणजेच मटार खाल्ल्याने तुमच्या शरीराची प्रोटीनची गरज पूर्ण होते. आहारात वेगवेगळ्या प्रकार तुम्ही याचा समावेश करू शकता.  प्रोटीन्सव्यतिरिक्त यात फायबर्स, व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, फॉलेट, आयर्न, जिंक आणि व्हिटामीन बी असते.

याशिवाय इतरही व्हिटामीन्स आणि मिनरल्स असतात. हिरवे मटार हे प्लांट बेस्ड प्रोटीन्सचा चांगला पर्याय आहे.  १०० ग्राम  मटारमध्ये जवळपास  ५ ग्राम प्रोटीन असते. यात फक्त प्रोटीन नाही तर वेगवेगळी पोषक तत्व असतात. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी हिरवे मटार फायदेशीर ठरतात.

सद्गुरू जग्गी वासुदेव सांगतात प्रोटीन्सचा खजिना  आहेत मटार (Green Peas Good Source Of Protein)

ईशा फाऊंडेशनचे फाऊंडर सद्गुरू जग्गी वासुदेव हिरव्या मटारला   प्लांट बेस्ड प्रोटीन्सचा सगळ्यात उत्तम स्त्रोत मानतात.  भाजी, सॅलेड किंवा हेल्दी स्टफींगच्या स्वरूपात तुम्ही मटार खाऊ शकतात. मटारच्या दाण्यांमध्ये जवळपास 20 ते 25 टक्के प्रोटीन असते. एक कप  हिरव्या मटारमध्ये जवळपास १० ग्राम प्रोटीन असते.

200 किलो वजनाच्या कोरोओग्राफरनं ९८ किलो घटवलं; डाएटमध्ये 'हे' ५ बदल करून मेंटेन केलंं

१) हिरवे मटार खाल्ल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. यात कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. यात फायबर्स जास्त असतात.  ज्यामुळे पोट भरलेलं राहतं. हाय फायबर्स आणि प्रोटीन्समुळे पोट जास्तवेळ भरलेलं राहतं.

२) हिरवे मटार खाल्ल्याने  ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते.  याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. मटारच्या भाजीच्या सेवनाने  ब्लड शुगर अचानक वाढणं कमी होतं. 

सकाळी की संध्याकाळी कधी चालल्याने वजन लवकर कमी होतं? बारीक होण्यासाठी तज्ज्ञ सांगतात....

३) हिरव्या मटारमध्ये एंटी ऑक्सिडेंट्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांसारखी तत्व असतात. ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. 

Web Title: Add Protein Rich Vegetables Green Peas In Your Diet for Bones Strong Suggest by Sadguru Jaggi Vasudev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.