Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > काय म्हणता? डाळी खाल्ल्याने वजन घटते? नियमित खा ३ पैकी १ डाळ, तज्ज्ञ सांगतात..

काय म्हणता? डाळी खाल्ल्याने वजन घटते? नियमित खा ३ पैकी १ डाळ, तज्ज्ञ सांगतात..

Add these 3 pulses to your diet for quicker weight loss : बारीक व्हायचं पण डाएट नको वाटतं? खा ३ प्रकारची डाळ-आरोग्य सुधारेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2024 02:35 PM2024-02-23T14:35:38+5:302024-02-23T15:11:12+5:30

Add these 3 pulses to your diet for quicker weight loss : बारीक व्हायचं पण डाएट नको वाटतं? खा ३ प्रकारची डाळ-आरोग्य सुधारेल

Add these 3 pulses to your diet for quicker weight loss | काय म्हणता? डाळी खाल्ल्याने वजन घटते? नियमित खा ३ पैकी १ डाळ, तज्ज्ञ सांगतात..

काय म्हणता? डाळी खाल्ल्याने वजन घटते? नियमित खा ३ पैकी १ डाळ, तज्ज्ञ सांगतात..

सध्या अनेक जण वजन वाढीच्या समस्येने त्रस्त आहे. वजन वाढलं की, फक्त शरीर बेढप दिसत नसून, गंभीर आजारांचा त्रास शरीराला छळतो. वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. जिम, महागडे डाएट प्लॅन, यासह विविध औषधांचा वापर करून वजन घटवण्याचा शॉर्ट कट मार्ग अवलंबतो (Fitness). पण याचा दुष्परिणाम शरीराला सहन करावा लागू शकतो. वजन कमी करताना आपण हेल्दी आहार स्किप करतो (Weight Loss).

चपाती-भाजी, भात-डाळ खाणं टाळतो. पण आपल्याला माहित आहे का, की डाळींचे सेवन केल्याने वजन कमी होते. आहारात डाळींचा समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात (Pulses). पण कोणत्या प्रकारची डाळ कधी खाल्ल्याने वजन घटते? याची माहिती दिल्लीस्थित भाग्य आयुर्वेदामधील पोषणतज्ज्ञ पूजा सिंह यांनी दिली आहे(Add these 3 pulses to your diet for quicker weight loss).

वजन कमी करण्यासाठी कोणती डाळ खावी?

मूग डाळ

जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, आहारात मूग डाळीचा नक्कीच समावेश करा. मूग डाळीमध्ये व्हिटॅमिन बी-६, व्हिटॅमिन सी, लोह, फायबर, पोटॅशियम, कॉपर, फॉस्फरस, फोलेट, रिबोफ्लेविन, मॅग्नेशियम, नियासिन आणि थायामिन यांसारखे पोषक घटक असतात. यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यात यासह वजन घटवण्यात मदत होते. शिवाय मूग डाळीचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

जिम-डाएट करूनही वजन घटत नाही? मग कोमट पाण्यात मिसळा एक रस-मिळतील फायदेच फायदे

ब्लॅक बीन्स

काळ्या बिया ज्याला काही ठिकाणी ब्लॅक बीन्स देखील म्हणतात. या बिया खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. प्रथिने समृद्ध ब्लॅक बीन्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. काळ्या बियांमध्ये रेसिसेंट स्टार्च आढळते. यासह त्यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे आपले पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय उलट-सुलट पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते.

कार्तिक आर्यनने सोडली वर्षभरासाठी साखर, साखर सोडल्याने खरंच ब्लड शुगर आणि वजन कमी होते की..

मटार डाळ

झपाट्याने शरीरातील चरबी घटवण्यासाठी आपण मटार डाळीचा आहारात समावेश करू शकता. मटार डाळीमध्ये फायबरसह एमायलोज नावाचे स्टार्च असते. यामुळे भूक कण्ट्रोलमध्ये राहते. यासह त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह, झिंक आढळते. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

Web Title: Add these 3 pulses to your diet for quicker weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.