Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > अंग दुखतं - कॅल्शियम कमी झालंय? उन्हाळ्यात ५ पदार्थ खा; बळकट हाडांसाठी भरपूर कॅल्शियम

अंग दुखतं - कॅल्शियम कमी झालंय? उन्हाळ्यात ५ पदार्थ खा; बळकट हाडांसाठी भरपूर कॅल्शियम

Add These Calcium Foods in Your Diet : तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंट घेत असाल तर जास्त प्रमाणात घेऊ नका कारण हे हानिकारक असू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:18 AM2024-04-10T11:18:43+5:302024-04-10T15:06:50+5:30

Add These Calcium Foods in Your Diet : तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंट घेत असाल तर जास्त प्रमाणात घेऊ नका कारण हे हानिकारक असू शकते.

Add These Calcium Foods in Your Diet : High Calcium Summer Foods In Your Diet To Make Bones Health And Strong | अंग दुखतं - कॅल्शियम कमी झालंय? उन्हाळ्यात ५ पदार्थ खा; बळकट हाडांसाठी भरपूर कॅल्शियम

अंग दुखतं - कॅल्शियम कमी झालंय? उन्हाळ्यात ५ पदार्थ खा; बळकट हाडांसाठी भरपूर कॅल्शियम

गरमीच्या दिवसांत (Summer Health Tips) थंड पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. काही पदार्थांच्या सेवनाने फक्त शरीर थंड राहत नाही तर हाडं आणि सांधे मजबूत राहण्यासही मदत होते. (Foods For Strong Bones) ऊन्हाळ्याच्या दिवसात आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकता. (Calcium Foods) 

नॅशनल हेल्थ सर्विसच्या रिपोर्टनुसार आहारात  हिरव्या भाज्यांचा समावेश करा. केल, ओकरा, पालक, ड्रिंक्सचा समावेश करा.  (Foods For Calcium) १९ ते  ६४ वयोगटातील लोकांना ७०० मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते.  वैविध्यपूर्ण आणि संतुलित आहार घेऊन तुम्हाला आवश्यक असलेले सर्व कॅल्शियम मिळवता आले पाहिजे. (Weight Loss Tips) तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंट घेत असाल तर जास्त प्रमाणात घेऊ नका कारण हे हानिकारक ठरू शकते. दैनंदिन गरजेनुसार १ हजार  ५०० कॅल्शियमची आवश्यकता असते. (Calcium Rich Foods To Make Bones Stronger)

1) दही

ऊन्हाळ्याच्या दिवसांत दह्याचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. १०० ग्राम दह्यात जवळपास ८५ मिलीग्राम कॅल्शियम असते. याव्यतिरिक्त प्रोटीन्सचाही चांगला स्त्रोत आहे. हाडं मजबूत होण्यासाठी दही आवर्जून खा. 

2) काकडी

पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे  काकडी ऊन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ली जाते. ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि वजन कमी होण्यातही मदत होते. वजन कमी करण्यासाठी हाडं आणि सांध्यांना मजबूत ठेवण्यासाठी काकडीचे सेवन फायदेशीर ठरते. 

3) टोमॅटो

टोमॅटोमध्ये व्हिटामीन, मिनरल्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो. टोमॅटो मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत आहे हाडांसाठी हे महत्वाचे मिनरल आहे.  टोमॅटो तुम्ही सॅलेडच्या स्वरूपात खाऊ शकता. 

4) लिंबू

लिंबू आणि संत्र्यांचा आंबट फळांमध्ये समावेश होतो. व्हिटामीन सी  युक्त फळं हाडांचा कमकुवतपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. लिंबाचा रस ऊन्हाळ्यात पिण्यासाठी एक उत्तम पेय आहे ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास  मदत होते. 

विंचरताना गळतात-केस पातळ झाले? तेलात १ पदार्थ मिसळून हेअर टॉनिक लावा; लांब होतील केस

5) कलिंगड

ऊन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगडाचे सेवन तब्येतीसाठी  उत्तम ठरते. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासही मदत होते. व्हिटामीन सी युक्त कलिंगड हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 

६२ व्या वर्षी तरूण-हॉट दिसणारा सुनिल शेट्टी खातो तरी काय? पाहा साधं-सोपं फिटनेस रूटीन

६)  आंबा

आंबा हाडांचे घनत्व आणि मजबूती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. एंटी ऑक्सिडेंट्स आणि पोषक तत्वांनी परीपूर्ण  आंबा रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरते. ज्यामुळे इंफेक्शनपासून लढण्यास मदत होते. 

Web Title: Add These Calcium Foods in Your Diet : High Calcium Summer Foods In Your Diet To Make Bones Health And Strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.