Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट सुटलं-जाड झालो याची शरम वाटते? अन्न खाण्याचीही भीती वाटू लागते, कारण

पोट सुटलं-जाड झालो याची शरम वाटते? अन्न खाण्याचीही भीती वाटू लागते, कारण

वजन कमी असावं, आपली तब्येत चांगली राहावी म्हणून प्रयत्न करणं वेगळं पण त्यापायी स्वत:लाच छळणं मात्र चूक.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2024 07:00 AM2024-05-16T07:00:00+5:302024-05-18T18:36:40+5:30

वजन कमी असावं, आपली तब्येत चांगली राहावी म्हणून प्रयत्न करणं वेगळं पण त्यापायी स्वत:लाच छळणं मात्र चूक.

afraid of eating because fat? gaining weight? feeling fat? | पोट सुटलं-जाड झालो याची शरम वाटते? अन्न खाण्याचीही भीती वाटू लागते, कारण

पोट सुटलं-जाड झालो याची शरम वाटते? अन्न खाण्याचीही भीती वाटू लागते, कारण

Highlightsआनंदाने, सकस आणि मापात खाऊ. खाण्यासह जगण्यावरही प्रेम करु!

निकिता पाटील

स्वत:चा दुस्वास आणि उपासमार म्हणजे डाएट नव्हे! डाएट करायचं कितीही ठरवा, काही होत नाही. रोजच्या धावपळीत तर अनेकींना स्वत:साठी शिजवून खाणंही शक्य नसतं. मग डाएट मोडतं. वजन वाढतं. आपण स्लिम नाही, फिट नाही याचा गिल्ट येतो. सोशल मीडियाच्या काळात तर कुणीही भसकन कमेंट करतं की वजन वाढलं वाटतं.
फिट होण्यासाठी उत्तम जीवनशैली, आहार, विहार ही चांगली गोष्ट, पण डाएटचा अतिरेक करून उपासमार किंवा स्वत:च्या शरीराचाच दुस्वास करणं भयंकर. आणि आपण जसे आहोत तसं स्वत:ला स्वीकारा. बाजारपेठेनं लादलेलं डाएट कल्चर नाकारा असं म्हणत जगभरात  इंटरनॅशनल नो डाएट डे अलिकडेच साजरा झाला.

(Image :google)

हा दिवस साजरा करण्याचा अर्थ असा नाही की योग्य आहार घेऊ नये. डाएट करू नये. उलट हा दिवस असं म्हणतो की, स्वत:चा स्वीकारच न करता, आपली शरीरयष्टी जशी आहे तशी न स्वीकारता बाजारपेठ किंवा अन्य प्रेशर म्हणून, इतर लोकांना बरं वाटावं म्हणून क्रूर डाएट करणं. स्वत:ला खाण्यापिण्याचा आनंदच नाकारणं, वजन आणि दिसण्यावरून इतरांना ट्रोल करणं हे सारं नाकारा. आपल्या खाण्यापिण्यातलं वैविध्य स्वीकारून उत्तम आरोग्याचा विचार करा. केवळ डाएट आणि वजनाचा नाही.
त्यासाठीच जगभर हा दिवस साजरा होतो. खाण्यापिण्याचीच भीती वाटावी आणि चवीऐवजी फक्त कॅलरीचाच हिशेब डोक्यात यावा, हे वाईट आहे.
तब्येत सुदृढ हवी तशी मानसिकताही निकोप हवी.

आपणच आपले फोटो सतत फिल्टर लावून सोशल मीडियात टाकले. आपणच आपला मनापासून स्वीकार केला नाही तर आपण स्वत:त बदलही करु शकत नाही.
अन्नाची भीती वाटणे यासारखी वाईट गोेष्ट नाही.
आनंदाने, सकस आणि मापात खाऊ. खाण्यासह जगण्यावरही प्रेम करु!
 

Web Title: afraid of eating because fat? gaining weight? feeling fat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.