Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > अक्षयकुमार सांगतोय त्याचं फिटनेस सिक्रेट- म्हणाला फिट रहायचं असेल तर जेवणाचं हे १ पथ्य पाळाच...

अक्षयकुमार सांगतोय त्याचं फिटनेस सिक्रेट- म्हणाला फिट रहायचं असेल तर जेवणाचं हे १ पथ्य पाळाच...

Diet Plan of Akshay Kumar: अभिनेता अक्षयकुमार त्याच्या तब्येतीची कशी काळजी घेतो, हे त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. त्याने सांगितलेलं फिटनेसचं सिक्रेट सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरणारं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 06:55 PM2023-01-10T18:55:52+5:302023-01-10T18:57:42+5:30

Diet Plan of Akshay Kumar: अभिनेता अक्षयकुमार त्याच्या तब्येतीची कशी काळजी घेतो, हे त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. त्याने सांगितलेलं फिटनेसचं सिक्रेट सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरणारं आहे.

Akshay Kumar shared his fitness secret, If you want to stay fit, then follow Akshay Kumar's diet plan | अक्षयकुमार सांगतोय त्याचं फिटनेस सिक्रेट- म्हणाला फिट रहायचं असेल तर जेवणाचं हे १ पथ्य पाळाच...

अक्षयकुमार सांगतोय त्याचं फिटनेस सिक्रेट- म्हणाला फिट रहायचं असेल तर जेवणाचं हे १ पथ्य पाळाच...

Highlightsअक्षय कुमारच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये तो तब्येत सांभाळण्यासाठी आहाराची कशी पथ्ये पाळतो, हे त्याने सांगितलं आहे.

बॉलीवूडचे बहुतांश कलाकार त्यांच्या तब्येतीबाबत, फिटनेसबाबत अतिशय जागरुक असतात. व्यायामाच्या बाबतीत तर ते अतिशय शिस्तबद्ध असतातच. पण काय खायचं, काय टाळायचं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कधी खायचं यासंबंधीच्या त्यांच्या वेळा अगदी ठरलेल्या असतात. आवडत्या पदार्थांचा कितीही मोह झाला तरी तो कसा आवरता घ्यायचा, हे खरोखरच या कलाकारांकडून शिकण्यासारखं आहे. अभिनेता अक्षय कुमारही (Diet Plan of Akshay Kumar) याबाबतीत अजिबातच मागे नाही. म्हणूनच तर त्याने सांगितलेलं त्याचं फिटनेस सिक्रेट (Akshay Kumar shared his fitness secret) सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरणारं आहे. 

तब्येतीची कशी काळजी घेतो अक्षयकुमार?
weareakkians_ या इन्स्टाग्राम पेजवरून अक्षय कुमारच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये तो तब्येत सांभाळण्यासाठी आहाराची कशी पथ्ये पाळतो, हे त्याने सांगितलं आहे.

संक्रांत स्पेशल रांगाेळी डिझाईन्स, छोट्या जागेतही झटपट काढता येईल आकर्षक- सुबक रांगोळी

अक्षयच्या फिटनेसचं एक सोपं आणि सुटसुटीत  रहस्य म्हणजे तो संध्याकाळी साडे सहानंतर सहसा काही खात नाही. कधी एखाद्या दिवशी खूपच भूक लागली तर सॅलेड किंवा  सूप असा हलका आहार घेतो. 

 

अक्षय पुढे असंही म्हणतो की रात्री आपण उशिरा जेवतो आणि त्यानंतर लगेचच झोपतो. आपण एवढ्या उशीरा खाल्लेलं जड अन्न पचवायला आपल्या पचनसंस्थेला पुढे ३ ते ४ तास लागतात.

बाळाला सांभाळत ऑफिसचं काम, सीईओ आईची कमाल! लेकरू सांभाळत कामाची कसरत..

म्हणजे आपलं सगळं शरीर झोपतं पण पचन संस्था मात्र कार्यरत राहतेच. पुन्हा सकाळी उठल्यानंतर आपण खातो आणि पुन्हा पचनसंस्थेला कामाला लावतो. खाल्लेल्या अन्नाचं योग्य पचन न होणं हे तब्येतीसाठी हानिकारक आहे. कारण बहुसंख्य आजाराचं मुळ हे पचनाशी संबंधित आहे. त्यामुळे दिवसभर तुमच्या आवडीचे पदार्थ खा, गोड पदार्थ खा, पण सायंकाळी साडे सहानंतर मात्र काहीही खाणं टाळा, हा अक्षय कुमारने सांगितलेला त्याचा फिटनेस फंडा आहे. आयुर्वेदानुसारही झोपण्याच्या आधी ३ तास रात्रीचं जेवण घ्यावं, असं सांगितलेलं आहेच. 

Web Title: Akshay Kumar shared his fitness secret, If you want to stay fit, then follow Akshay Kumar's diet plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.