Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > आलिया भटची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय पाणी पिण्याची योग्य पद्धत, पाणी पिताना नेमकं चुकतं काय?

आलिया भटची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय पाणी पिण्याची योग्य पद्धत, पाणी पिताना नेमकं चुकतं काय?

Common Mistakes While Drinking Water: पाणी कसं आणि किती प्यावं याचीही एक पद्धत आहे, काही नियम आहेत. त्याविषयीच माहिती देत आहे आलिया भट, करिना कपूरसारख्या सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Alia Bhat's fitness trainer Anshuka Parwani). 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2022 01:03 PM2022-12-10T13:03:56+5:302022-12-10T15:07:30+5:30

Common Mistakes While Drinking Water: पाणी कसं आणि किती प्यावं याचीही एक पद्धत आहे, काही नियम आहेत. त्याविषयीच माहिती देत आहे आलिया भट, करिना कपूरसारख्या सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Alia Bhat's fitness trainer Anshuka Parwani). 

Alia Bhat's fitness trainer Anshuka Parwani explains the proper method of drinking water | आलिया भटची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय पाणी पिण्याची योग्य पद्धत, पाणी पिताना नेमकं चुकतं काय?

आलिया भटची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय पाणी पिण्याची योग्य पद्धत, पाणी पिताना नेमकं चुकतं काय?

Highlightsही गोष्ट आपण इतकी दुर्लक्षित करतो की मग त्याच चुकीच्या सवयींमधून अनेक आजार मागे लागतात.

जेवण कसं करावं, जेवणात कोणते पदार्थ किती प्रमाणात असावेत, प्रत्येक घास किती वेळा चावून खावा, याचं प्रत्येकाचं जसं गणित असतं किंवा योग्य प्रमाण ठरलेलं असतं, तसंच काहीसं पाणी पिण्याच्या बाबतीतही असतं. पण पाणी कशा पद्धतीने प्यायला पाहिजे (How to drink water properly?), ही गोष्ट आपण इतकी दुर्लक्षित करतो की मग त्याच चुकीच्या सवयींमधून अनेक आजार मागे लागतात. म्हणूनच सेलिब्रिटी फिटनेस आणि योगा ट्रेनर अंशुका परवानी (Alia Bhat's fitness trainer Anshuka Parwani) यांनी पाणी पिण्याची योग्य पद्धत कशी असते, पाणी पिताना कोणत्या चुका टाळायला पाहिजे (Common Mistakes While Drinking Water), याविषयीची पोस्ट नुकतीच इन्स्टाग्रामला शेअर केली आहे. 

 

पाणी पिताना कोणत्या चुका टाळाव्या?
अनेक जणांना उभ्या उभ्या पाणी पिण्याची सवय असते. पण कितीही गडबड असली तरी पाणी नेहमी बसूनच प्यावे, असा सल्ला अंशुका यांनी दिला आहे. उभं राहून गटागट पाणी प्यायल्याने अपचन, छातीत जळजळ होणे, ॲसिडिटी असे त्रास होतात. त्याशिवाय अर्थरायटिस arthritis आणि फुफ्फुसाचे विकार होण्याचा धोकाही वाढते. कारण उभ्याने पाणी प्यायल्याने ते खूप वेगात शरीरात पसरते आणि पाण्याचा एवढा वेग आरोग्यासाठी चांगला नाही. 

 

पाणी पिण्याची योग्य पद्धत
१. मांडी घालून ताठ बसून शांतपणे पाणी पिणे, ही पाणी पिण्याची अचूक पद्धत असल्याचे अंशुका सांगतात.

मुलं अबोल, बुजरी होत आहेत? पालकांचं काही चुकतं की.. करा ३ गोष्टी, मुलं होतील हसरी!

यामुळे पाणी पित असल्याच्या संवेदना मेंदूपर्यंत जातात आणि त्यामुळे मेंदूच्या क्रिया वाढण्यासही मदत होते. यामुळे पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते. त्यामुळे ज्यांना पचनाचे त्रास आहेत, त्यांनी एकदा त्यांची पाणी पिण्याची पद्धत योग्य आहे की नाही हे तपासून पहावे.

 

२. तांब्याच्या भांड्यातले पाणी पिणे कधीही उत्तम. कारण तांब्यामध्ये असणारे गुणधर्म पाण्यात मिसळतात आणि त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शिवाय ॲनिमियाचा त्रासही कमी होतो. 

पीसीओएसचा खूपच त्रास होतो? तज्ज्ञ सांगतात ३ नियम पाळणं ठरेल फायदेशीर- त्रास होईल कमी 

३. एकदम मोठा घोट तोंडात घेण्यापेक्षा हळूहळू सावकाश पाणी प्यावे.  

 

Web Title: Alia Bhat's fitness trainer Anshuka Parwani explains the proper method of drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.