Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > डाएट करायचं ठरवता, पण काही दिवसांतच बारगळून जातं? ३ टिप्स, वेटलॉससाठी होईल फायदा

डाएट करायचं ठरवता, पण काही दिवसांतच बारगळून जातं? ३ टिप्स, वेटलॉससाठी होईल फायदा

Diet and Weight Loss Tips: तुमचंही असंच होत असेल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा. डाएट प्लॅन व्यवस्थित सुरू राहून वजन कमी होण्यासही फायदा होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2022 08:15 AM2022-12-21T08:15:48+5:302022-12-21T08:20:01+5:30

Diet and Weight Loss Tips: तुमचंही असंच होत असेल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा. डाएट प्लॅन व्यवस्थित सुरू राहून वजन कमी होण्यासही फायदा होईल.

Always planning for weight loss diet but get failed in few days? 3 tips for diet and weight loss | डाएट करायचं ठरवता, पण काही दिवसांतच बारगळून जातं? ३ टिप्स, वेटलॉससाठी होईल फायदा

डाएट करायचं ठरवता, पण काही दिवसांतच बारगळून जातं? ३ टिप्स, वेटलॉससाठी होईल फायदा

Highlightsमोठ्या तयारीनिशी सुरू केलेलं आपलं डाएटिंग अगदी महिना भरातच बारगळून जातं. असं होऊ नये, यासाठी या काही गोष्टी लक्षात ठेवा.  

असं अनेक जणांच्या बाबतीत होतं. मोठ्या उत्सााहाने आता डाएटिंग करायचं असं आपण ठरवतो. त्यासाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ आणतो. छान प्लॅनिंग करतो. सुरुवातही अगदी उत्साहात होते. डाएटचं जे रुटीन आहे, त्याच्या किंचितही बाहेर जायला आपण तयार नसतो. पण नंतर काय होतं काही समजत नाही. त्या डाएटिंगचा कंटाळा येऊ लागतो आणि मग मोठ्या तयारीनिशी सुरू केलेलं आपलं डाएटिंग (Diet and Weight Loss Tips) अगदी महिना भरातच बारगळून जातं. असं होऊ नये, यासाठी या काही गोष्टी लक्षात ठेवा.  

१. डाएट म्हणजे उपासमार नव्हे
डाएट आणि उपाशी राहणे यात फरक असतो, हे बरेच जण विसरून जातात. त्यामुळे मग पोटाला खूप ताण देतात. उपाशी राहिल्याने मग सातत्याने खाण्याविषयीचेच विचार डोक्यात येतात.

थंडीमध्ये प्यायलाच हवं मुगाच्या डाळीचं हेल्दी सूप.. पाहा जुही परमारने शेअर केलेली सोपी रेसिपी

खूप भूक लागलेली असल्याने जे पदार्थ खायचे नसतात, तेच आवडीचे पदार्थ डोळ्यासमोर येतात. आणि काही दिवसांतच मग संयम संपून जातो. त्यामुळे सगळ्यात आधी तर आपण डाएटिंग करणार म्हणजे उपाशी राहणार नाही, हे मनाशी पक्कं गाठ मारून ठेवा. 

 

२. साखर कमी करताना..
वजन कमी करण्यासाठी साखर टाळावी, हे अगदी बरोबर आहे. पण अनेक जणांना भरपूर साखर खाण्याची सवय असते. अशा लोकांनी एकदमच साखर खाणं पुर्णपणे बंद केलं तर ते जास्त दिवस टिकू शकणार नाही.

नवजात बाळं रात्री जागतात आणि दिवसा झोपतात.. असं का? त्यावर उपाय काय? वाचा डॉक्टरांचा सल्ला

त्यामुळे दिवसभरातून समजा ४ चमचे साखर पोटात जात असेल तर सुरुवातीला ती निम्म्यावर आणा. नंतर आणखी निम्मं प्रमाण करा आणि हळूहळू बंद करा. त्यामुळे साखर बंद करणं सोपं जाईल. 

 

३. भाज्या आणि प्रोटिन्सचं प्रमाण वाढवा
वेटलॉस करायचं असेल तर भाज्या अधिकाधिक प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा. ताटातलं पोळीचं प्रमाण कमी तर भाजीचं प्रमाण वाढवण्यावर भर द्या. शिवाय प्रोटिन्सचं प्रमाण वाढवा. त्यामुळे शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते आणि आपोआपच भुकेवर नियंत्रण येतं. 
 

Web Title: Always planning for weight loss diet but get failed in few days? 3 tips for diet and weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.