Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > बघा दूध घालून केलेला चहा पिण्याचे ५ जबरदस्त फायदे- चहा आवडतो तर बिंधास्त प्या, पण .... 

बघा दूध घालून केलेला चहा पिण्याचे ५ जबरदस्त फायदे- चहा आवडतो तर बिंधास्त प्या, पण .... 

Amazing Benefits Of Having Tea With Milk: बघा दुधाचा चहा पिण्याचे तुमच्या तब्येतीवर नेमके कसे परिणाम होऊ शकतात...(health benefits of milk tea)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2024 03:22 PM2024-06-19T15:22:40+5:302024-06-19T15:23:29+5:30

Amazing Benefits Of Having Tea With Milk: बघा दुधाचा चहा पिण्याचे तुमच्या तब्येतीवर नेमके कसे परिणाम होऊ शकतात...(health benefits of milk tea)

amazing benefits of having tea with milk, health benefits of milk tea | बघा दूध घालून केलेला चहा पिण्याचे ५ जबरदस्त फायदे- चहा आवडतो तर बिंधास्त प्या, पण .... 

बघा दूध घालून केलेला चहा पिण्याचे ५ जबरदस्त फायदे- चहा आवडतो तर बिंधास्त प्या, पण .... 

Highlights तुम्हाला दूध घालून केलेला चहाच आवडत असेल तर तो बिंधास्त प्या. कारण असा दुधाचा चहा पिण्याचेही अनेक फायदे आहेत, असं काही अभ्यासक सांगतात.

लेमन टी, ब्लॅक टी असे वेगवेगळे चहा अनेकजण आवडीने पितात. काही जण वजन कमी करायचं किंवा तब्येतीच्या बाबतीत अधिक जागरुकता म्हणून पितात. पण बहुतांश लोक असे आहेत की त्यांना दूध घालून केलेला आपला पारंपरिक धाटणीचा चहाच जास्त आवडतो. असा मस्त दुधाचा फक्कड चहा समोर आला की त्याच्या सुगंधानेच कशी तरतरी येते. आता लेमन टी, ब्लॅक टी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण तरीही तुम्हाला दूध घालून केलेला चहाच आवडत असेल तर तो बिंधास्त प्या (amazing benefits of having tea with milk). कारण असा दुधाचा चहा पिण्याचेही अनेक फायदे आहेत, असं काही अभ्यासक सांगतात. (health benefits of milk tea)

 

दूध घालून केलेला चहा पिण्याचे फायदे

१. दुधामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मुळे हाडे मजबूत होण्यास फायदा होतो. त्यामुळे खासकरून वयस्कर व्यक्तींनी हाडांच्या मजबुतीसाठी दूध घालून केलेला चहा प्यावा, अशी माहिती आहारतज्ज्ञ इप्सिता चक्रवर्ती यांनी दि इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. 

लोणच्यासाठी कैरी घेताना फक्त करकरीतपणाच पाहू नका, ४ गोष्टी तपासून घ्या- २ वर्षे टिकेल लोणचं

२. baanimilk.com यांनी दिलेल्या माहितीनुसार सी. एस. लुईस असं सुचवतात की कोरा चहा पचवणं हे आपल्या पचनशक्तीसाठी बऱ्याचदा कठीण ठरतं. पण चहा जर दुधासोबत घेतला तर तो अधिक पाचक ठरतो. 

३. काही अभ्यासानुसार हृदयाच्या आरोग्यासाठीही दूध घातलेला चहा पिणं उत्तम आहे, असं सांगण्यात आलं आहे.

 

४. चहामध्ये अनेक प्रकारचे ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. जर चहामध्ये दूध असेल तर हे ॲण्टीऑक्सिडंट्स आपल्या शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषून घेतले जातात. 

५० वर्षांची असुनही भाग्यश्रीच्या चेहऱ्यावर तिशीचा ग्लो! कारण साबण, फेसवॉशऐवजी वापरते 'हा' फेसपॅक

५. दूध घालून केलेला चहा हे एक खूप चांगलं स्ट्रेस घालविणारं पेय आहे. कारण चहामध्ये असणारं amino acid L-theanine जेव्हा दुधातल्या घटकांसोबत मिसळलं जातं तेव्हा ते पेय स्ट्रेस घालविण्यासाठी, थकवा घालवून शरीर रिलॅक्स करण्यासाठी उपयुक्त ठरतं.  पण दुधाचा चहा पिण्याचे एवढे फायदे असले तरी चहाचा अतिरेक करू नये. जास्तीतजास्त २ कप चहा पिणे ठिक आहे. 

 

Web Title: amazing benefits of having tea with milk, health benefits of milk tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.